🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Government Job Express
5_6190588491189977162.pdf
793.8 KB
🔰पुरवठा निरीक्षक भरती 2018
अंतिम निकाल व प्रतीक्षा यादी



@NaukriExpress
Forwarded from Government Job Express
♦️मेगाभरती जाहिरात♦️

◆महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ◆

पदांचे नाव - चालक व वाहक
पद संख्या - 4416

जॉईन करा @NaukriExpress
#oneliner

रणवीरसिंह:-
जम्मू -काश्मीरचे कर्नल रणवीरसिंह जम्वाल जगातील सात बेटातील सर्वात उंच डोंगर फत्ते करणारे देशातील पहिले लष्करी अधिकारी ठरले आहेत


केरळ:-
खेळाडूंवर उपचार करण्यासाठी आशियातील पहिले क्रीडा आयुर्वेदिक रुग्णालय केरळातील त्रिशूरमध्ये सुरु झाले


अरुनिमा सिन्हा:-
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंटार्क्टिकातील माऊंट विन्सन मोहिमेसाठी अरुनिमा सिन्हाकडे तिरंगा सुपूर्द केला.

* अरुनिमा सिन्हाने यापूर्वी पाच खंडांमधील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली दिव्यांग महिला बनली आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेने गाठला 6 कोटींचा टप्पा:-
• प्रधानमंत्री उज्वला योजनेने स्वयंपाकाच्या सहा कोटी गॅस जोडण्या देण्याचा टप्पा गाठला आहे. आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जस्मिना खातून या महिलेला गॅस जोडणी प्रदान करून सहा कोटीचा टप्पा पूर्ण झाला.
योजनेचा उद्देश:-
• देशातल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली.
• दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबातल्या 5 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नियोजित वेळेपूर्वीच ते गाठण्यात यश आले. त्यानंतर हे उद्दिष्ट 8 कोटी पर्यंत वाढविण्यात आले

विजया, देना आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलीनीकरण:-

● केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये विजया बँक आणि देना बँक यांचे विलीनीकरण होणार आहे
● भारतातील बॅंकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलीनीकरण असेल. विलीनीकरणांनंतर बँक ऑफ बडोदा ही बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल.
● या बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार आहे

@eMPSCguidance
कन्या वन समृद्धी योजना

कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत लागली २१ हजार ७७० झाडे; पुणे विभागात सर्वाधिक ९ हजार ७१० रोपांचे वाटप

शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेअंतर्गत राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली आणि रोप लावून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

@eMPSCguidance
​​सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना

सिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.

मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अशा प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.

या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्‍या दिल्या गेल्या.

केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत.

शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्‍यांना सर्वाधिक वेतन देते.
​​‘2019 खेलो इंडिया युथ गेम्स’ची सांगता झाली; महाराष्ट्र अव्वल ठरले

9 ते 13 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या पुणे शहरात बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या ‘2019 खेलो इंडिया खेळ’ या क्रिडा महोत्सवाची सांगता झाली.

स्पर्धेअंती, पदकतालिकेत अग्रस्थानी महाराष्ट्र राहले.

🌷महाराष्ट्र -

59 सुवर्ण, 48 रौप्य आणि 59 कांस्य
एकूण 166 पदकांची कमाई करीत प्रथम क्रमांकावर.

🌷दिल्ली -

43 सुवर्ण, 41 रौप्य आणि 41 कांस्य
एकूण 115 पदकांची कमाई करीत द्वितीय क्रमांकावर.

🌷 हरियाणा -

36 सुवर्ण, 34 रौप्य आणि 37 कांस्य
एकूण 107 पदकांची कमाई करीत तृतीय क्रमांकावर.

खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात विजय मिळविला.

पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने 10 वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत 10 मीटर एयर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले.

10 वर्षांच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवण्याची ही पहिलीच कामगिरी आहे.
🔸उशीर पंडित - दुरांत - न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश🔸

◆भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या पहिल्या अमेरिकन न्यायाधीश

◆15 वर्ष डिस्ट्रिक्ट ऍटर्नी

◆2015 मध्ये क्वीनस जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश
★हवामान विभागाचे - मोबाईल 'दामिनी'अँप★

◆शहरात होणारी अतिवृष्टी असो की उष्णतेची लाट , एखादे वादळ असो की थंडीचा कडाका यांची माहिती व हवामानाशी निगडित सर्व अपडेट नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होणार ◆
#google_doodle
सकेदिन मोहम्मद हे इंग्रजी मध्ये पुस्तक लिहिणारे प्रथम भारतीय होते.