🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🆕विदर्भात झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने

▶️ १) १९ वे संमेलन - १९३३ - नागपूर

☑️ अध्यक्ष - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

▶️ २) ४८ वे संमेलन - १९६९ - वर्धा

☑️ अध्यक्ष - पुरुषोत्तम शिवराम रेगे

▶️ ३) ४९ वे संमेलन - १९७३ - यवतमाळ

☑️ अध्यक्ष - ग. दि. माडगूळकर

▶️ ४) ५३ वे संमेलन - १९७९ - चंद्रपूर

☑️ अध्यक्ष - वामन कृष्ण चोरघडे

▶️ ५) ६२ वे संमेलन - १९८९ - अमरावती

☑️ अध्यक्ष - प्राचार्य के. ज. पुरोहित

▶️ ६) ८० वे संमेलन - २००७ - नागपूर

☑️ अध्यक्ष - अरुण साधू

▶️ ७) ८५ वे संमेलन - २०१२ - चंद्रपूर

☑️ अध्यक्ष - वसंत आबाजी डहाके

▶️ ९) ९२ वे संमेलन -२०१९ - यवतमाळ
➡️अध्यक्ष : अरुणा ढेरे

T.me/empscguidance
#geography
प्राकृतिक भारत
#geography भारतातील प्रमुख नद्या
#science मानवी कानाची अंतर्गत रचना
#science रोगप्रसार व प्रतिबंध
🚦1 फेब्रुवारीला जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम पद सोडणार

📌जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी अचानकपणे राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. ते दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी पद सोडणार.

📌58 वर्षीय किम सहा वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. 2017 साली ते दुसर्‍यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आले आणि ते या पदावर 2022 सालापर्यंत होते. जवळजवळ तीन वर्षांच्या कारकि‍र्दीनंतर त्यांनी अचानकपणे राजीनामा दिला आहे.

👉1 फेब्रुवारीपासून जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) क्रिस्टलिना जॉर्जिव्हा या अंतरिम अध्यक्ष म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारणार.

जागतिक बँक (WB) 

ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
🚦 इराणमध्ये चाबहार बंदराच्या भागाचा कार्यभार भारताने स्वीकारला

📌भारताने दि. 7 जानेवारी 2019 रोजी इराणमधील चाबहार बंदऱ्याचा कार्यभार भारताने आपल्या ताब्यात घेतला आहे. पहिल्यांदाच भारत आपल्या क्षेत्राबाहेर एक बंदर चालवत आहे.

चाबहार बंदराच्या ठिकाणी भारताबाहेरून व्यापार चालविण्यासाठी ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ या भारतीय कंपनीने आपले कार्यालय उघडले आणि चाबहार येथे शाहीद बेहेस्ती बंदरावरील कार्यभार आपल्या हातात घेतला आहे.

📌दि. 24 डिसेंबर 2018 रोजी चाबहार येथे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चाबहार बंदराच्या संदर्भात भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामधील बैठक पार पडली. या बैठकीत भारत, अफगाणिस्तान, इराण या देशांमधील व्यापार करण्यासाठी ठरविलेल्या मार्गांना आणि वाहतुकीच्या मार्गिकांना सहमती देण्यात आली.

चाबहार हा इराणमधील सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांताचा एक शहर आहे. हे एक मुक्त बंदर आहे आणि ओमानच्या खाडीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. हे बंदर इराणमध्ये पर्शियन आखाती प्रदेशाच्या बाहेर स्थित आहे आणि या प्रदेशामध्ये सागरी व्यापार विस्तारीत करण्यामध्ये मदत करेल.

भारताने पाकिस्तानमधून जाणारा मार्ग वगळत अफगाणिस्तानाशी थेट संपर्क साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाबहार येथील शाहीद बिहेष्टी बंदर येथे भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. भारताच्या जलवाहतुक मंत्रालयाने चाबहार बंदर विकास प्रकल्प आणि अनुषंगिक कामे यांच्या अंमलबजावणीसाठी इराणमध्ये एक कंपनी तयार केली आहे.
🚦गिता गोपीनाथ: IMFमधील मुख्य अर्थतज्ञ

गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund -IMF) मुख्य अर्थतज्ञपदी रूजू झाल्या आहेत.

👉आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होणार्‍या गीता गोपीनाथ या प्रथम भारतीय महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद यापूर्वी रघुराम राजन यांनी बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.

👉मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपी गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.

देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.
🚦नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची बैठक पार पडली

📌नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग हे भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. यानिमित्त  दि. 8 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची चौथी बैठक पार पडली.

"ए वर्ल्ड रिऑर्डर: न्यू जियोमेट्रीज; फ्लुईड पार्टनरशिप्स; अनसर्टेन आऊटकम्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

📌या बैठकीचे आयोजन ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने केले. हा कार्यक्रम एक वार्षिक भौगोलिक आणि धोरणात्मक परिषद आहे. या कार्यक्रमात 93 देशांमधून 600 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
🚦नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ लोकसभेत संमत

लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे.

📌अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.

📌हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतेच मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार.

बदल करण्यामागची पार्श्वभूमी 

जुलै 2018 मध्ये आसाममधील सुमारे दोन कोटी नागरिकांची नावे असलेला ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या मसुद्यात राज्याच्या 2,89,83,677 नागरिकांच्या नावांची नोंद आहे. NRC अद्ययावत करावयाच्या प्रक्रियेतून एकूण 3,29,91,384 व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी मसुद्यामध्ये 40,07,707 लोकांची नावे यात नव्हती. 2.48 लक्ष शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस आणि असे व्यक्ती ज्याचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत अश्यांना यातून वगळण्यात आले होते.
​​15 वा प्रवासी भारतीय दिवस वाराणसीमध्ये होणार

15 वा प्रवासी भारतीय दिवस समारोह 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2019 दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित केला जाणार आहे.

यावर्षी प्रवासी भारतीय दिनाची मुख्य विषय Theme : 'Role of Indian Diaspora in building a New India' (नवीन भारताच्या उभारणीमध्ये प्रवासी भारतीयांची भूमिका)
हा आहे.

या समारोहाची सुरुवात काश्मिर मधील 11 घाटांवर गंगा आरतीने केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने विदेश मंत्रालय (MEA) मंत्रालयाद्वारे हा समारोह आयोजित केला जाईल. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जग्नाथ हे करतील.

2019 पासून प्रवासी भारतीय दिवस उत्सव हा एक द्विवार्षिक कार्यक्रम असेल म्हणजे प्रत्येक दोन वर्षांतून एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

🔴 प्रवासी भारतीय दिवस पार्श्वभूमी :-

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 09 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये होते.
#science उतींचे व स्नायूंचे प्रकार