🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मंत्रिमंडळ #polity
वैभव शिंदे #notes
राजीनामा पद्धत #polity
वैभव शिंदे #notes
बालकांसाठी विशेष तरतुदी #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes
#Geography
🔹भारताची ‘मिसाईल पॉवर’

◾️गेल्या आठवड्यात भारताने पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्या. आपल्या संरक्षण सिद्धतेची ताकद जगाला खासकरून चीन आणि पाकला दाखवण्यासाठी या चाचण्या आवश्यक होत्या. या निमित्ताने भारताच्या या ताकदीचा घेतलेला हा आढावा. एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.


🔺पृथ्वी-1

सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.

🔺अग्नि-1

अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.

🕸आकाश

जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.

🐍नाग

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.

🔸त्रिशूल

जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

🔻अग्नि 2

एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

🔻पृथ्वी 3

नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.

⚫️ब्राह्मोस

भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

🔴सागरिका

समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.

♻️धनुष

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

🔺अग्नि-3

अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

🔺अग्नि-4

पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

🔺अग्नि-5

भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

🔘निर्भया

जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.

🔺प्रहार

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.
new rajyaseva ad.pdf
228.2 KB
राज्यसेवा सुधारित अॅड👆
पदांची संख्या वाढून 360 झाली💕

@empscguidance
Forwarded from Government Job Express
👉 आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद

🔅 पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब अराजपत्रित २८२ पदे

🔅 शैक्षणिक पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (कालावधी ३ वर्ष) किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून / महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची पदविका (कालावधी ३ वर्ष)

🔅 कमाल वयोमर्यादा : २५ डिसेंबर २०१८ रोजी ३८ ते ४३ वर्षे

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/9Ljv3H

🔅 ऑनलाईन अर्जासाठी :- https://goo.gl/yZC6A3


👉 मत्स्यव्यवसाय विभाग

🔅 पदाचे नाव : सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी (७९ पदे)

🔅 शैक्षणिक पात्रता : द्वितीय श्रेणीतील मत्सविज्ञान विषयाची पदवी

🔅 कमाल वयोमर्यादा : १९ जानेवारी २०१९ रोजी ३८ ते ४३ वर्षे

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/wXRkPt

🔅 ऑनलाईन अर्जासाठी :- https://goo.gl/yZC6A3

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
👍1
🔰PSI-STI-ASO Combine Prelim Target Batch

"रयत प्रबोधिनी"

👉75 दिवस दररोज 4 तास
👉दि 1 जानेवारी पासून सुरुवात

✌️मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

संपर्क
9075582728
9762131361
"रयत प्रबोधिनी"

रयतची "Test series"

फक्त वर्ग -२ साठीच dedicated असणारी एकमेव संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी"

टेस्ट सिरीज हे प्रकरण आम्ही खुप गंभीर पणे घेतो.
स्वतः विषय तज्ञ यासाठी काम करत असतात.
टेस्ट चे प्रश्न काढायचे काम outsource न करता प्रत्येक जण स्वतः Trends नुसार Question Frame करतो.

एकुण १० Test मधे
१००० प्रश्न त्यांचे ४००० पर्याय म्हणजेच एकुण ४००० बिट्स ची व्यवस्थित तयारी असा हा प्रपंच आम्ही पाहतो.

यासाठी विश्लेषण ,चर्चा ,संभाव्य प्रश्न असा क्रम असणार आहे.

नक्की विचार करा ,
आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर नक्की शेअर करा..

नावनोंदणी साठी
9762131361/9607058001 वर
test /call करा.


जॉईन करा @eMPSCguidance
🌀टेनिस स्पर्धा २०१८ :-

■ अमेरिकन ओपन :-
● हार्डकोर्ट
● स्थळ ;- न्यूयॉर्क, अमेरिका में संपन्न (27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर, 2018)
■ पुरुष एकेरी :-
● विजेता-नोवाक जोकोविक (सर्बिया)
● उपविजेता-जुआन मार्टिन डेल पोत्रो (अर्जेंटीना)
◆ महिला एकेरी
● विजेता-नाओमी ओसाका (जापान)
● उपविजेता-सेरेना विलियम्स (संयुक्त राज्य अमेरिका)
● नोवाक जोकोविक चे हे 14वे ग्रॅड स्लॅम विजेतपद आहे त्याने पीट सम्प्रास च्या 14 व्या ग्रॅड स्लॅम बरोबरी केली
● रोजर फेडरर आणि राफेल नदाल ने क्रमशः 20 ग्रॅड स्लॅम आणि 17 ग्रॅड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत
● नाओमी ओसाका ग्रॅड स्लॅम जिंकणारी जपान ची पहेली महिला टेनिस खेळाडू ठरली

■ फ्रेंच ओपन, 2018;-
● स्थळ:- पॅरिस, फ्रांस (21, मे 2018 ते 10 जून, 2018)
पुरुष एकेरी
● विजेता-राफेल नदाल (स्पेन)
● उपविजेता-डोमिनिक थिएम (ऑस्ट्रिया)
◆ महिला एकेरी
● विजेता-सिमोना हालेप (रोमानिया)
● उपविजेता-स्लोन स्टीफेंस (अमेरिका)
● राफेल नदाल ने फ्रेंच ओपन ही स्पर्धा ११ व्यांदा जिंकली
● सिमोना हालेप ने फ्रेंच ओपन ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली ख्रिस एवर्ट (7 वेळा ) ने जिंकली

■ विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2018;-
● स्थळ:- ऑल इंग्लंड टेनिस क्लब,लंडन (21 जून - 4 जुलै)
◆ पुरुष एकेरी
● विजेता :- नोवाक जोकोविक (सर्बिया)
● उपविजेता:- केव्हिन एंडरसन ( दक्षिण अफ्रीका)
◆ महिला एकेरी
● विजेता :- एंजलिक कर्बर (जर्मनी )
● उपविजेता:सेरेना विलियम्स (अमेरिका )

■ ऑस्ट्रेलियन ओपन, 2018
● स्थळ:- मेलबर्न, ऑस्ट्रेलिया (15-28 जानेवारी, 2018)
◆ पुरुष एकेरी
● विजेता-रोजर फेडरर (स्विझरलॅंड)
● उपविजेता-मारिन सिलिच (क्रोएशिया)
◆ महिला एकेरी
● विजेता-कैरोलीन वोज्नियाकी (डेनमार्क)
● उपविजेता-सिमोना हालेप (रोमानिया)
● फेडरर चे हे 20 ग्रॅड स्लॅम पदक (पुरुषामध्ये सर्वात जास्त ) सर्वात जास्त
● जर्मनीची स्टेफी ग्राफ (22), अमेरिकेची सेरेना विलियम्स (23) आणि ऑस्ट्रेलियाची मार्गेट कोर्ट (24) यांनी ग्रॅड स्लॅम पदक जिंकले आहे