🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मंत्रिमंडळ निर्णय
📌शक्तीकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर:-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

● शक्तीकांत दास आरबीआयचे  25 वे गव्हर्नर ठरले आहेत.

● शक्तीकांत दास यांनी केंद्रीय वित्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

● नोटाबंदीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

● शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवहार सचिव, भारताचे राजस्व सचिव पदी काम केलं आहे.

● शक्तीकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत.

● गेल्या निवृत्तीनंतर दास भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य आहेत.

 ● याआधी दास यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केलं आहे.
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
5 राज्ये विधानसभा निवडणूक निकाल
सध्या देशातील परिस्थिती #राज्ये आणि सत्ताधारी पक्ष
बौद्धिक संपदा अधिकार

का आणि कसे?
बँकिंग पुनर्रचना
शशिकांत दास RBI चे नवीन गव्हर्नर
⁉️आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल?

या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?

२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

1⃣जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

2⃣सहभाग घ्या
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

3⃣थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

4⃣भूमिका घ्या
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

5⃣ फोकस
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

6⃣मित्र जरा जपून निवडा.
नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

7⃣ स्वत:वर विश्वास ठेवा
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

8⃣कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

9⃣ जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

1⃣0⃣ दिवसाची सुरुवात आनंदी.
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

T.me/eMPSCguidance
टाईम पर्सन ऑफ द इअर