🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Current
🚦 अखिलेश रंजन: नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी असलेल्या कृती दलाचे प्रमुख

📌1961 सालच्या प्राप्तीकर कायद्याचा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक गरजांशी सुसंगत असा नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एका कृती दलाची स्थापना केली आहे.

📌केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) सदस्य असलेले अखिलेश रंजन यांची कृती दलाचे संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. कृती दलाच्या इतर सदस्यांबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे कृती दल येत्या 28 फेब्रुवारीला आपला अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे.

📌केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) भारतात प्रत्यक्ष करविषयक धोरणे आणि नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रदान करते.

CBDT हे केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम-1963 च्या अंतर्गत दि. 1 जानेवारी 1964 पासून कार्यरत असलेले एक वैधानिक प्राधिकरण आहे.
#Current
🚦 केशव गिंडे यांना यंदाचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

राज्य शासनातर्फे दिला जाणारा यंदाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे.

📌या पुरस्काराचे स्वरुप :-

● राज्य शासनातर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

● या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.

📌यापूर्वी पुरस्कारप्राप्त व्यक्ती :-

● गानसरस्वती किशोरी आमोणकर,
● पं.जसराज,
● श्रीमती प्रभा अत्रे,
● पं. राम नारायण,
● श्रीमती परवीन सुलताना,
● श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

📌केशव गिंडे (वेणू विद्वान) यांच्याबाबत :-

● जन्म :- ५ सप्टेंबर, १९४२ (पुणे)

● शिक्षण :- संगीतामध्ये पी. एच. डी.

● गुरू :- स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी

सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगद्गुरू शंकराचार्य श्रृंगेरी महापीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे.
5_6264692864777715764.pdf
85.5 KB
प्रताप आसबे सर यांचा लेख।।।नक्की वाचा
स्त्री शिक्षण पुरस्कर्ते ,पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
महात्मा फुले मला का भावतात ? (१० कारणे आहेत )
**********************************************************************
महात्मा फुले मला भावतात कारण
१) ते विचारही करतात आणि कृतीही करतात.जग जेव्हा उत्तर शोधील तेव्हा शोधील पण आज मला जे सुचते आहे ती कृती मी माझ्यापुरती करील ही त्यांची मनोभूमिका मला भावते. त्याअर्थाने ते one man army आहेत.
२) ते एकाचवेळी व्यवस्था बदलाचे लांबचे उत्तर सांगतात आणि जवळची करायची ती कृतीही करतात think globally act locally चे ते प्रतिक आहेत.
३ )ते एकाचवेळी शिक्षण, धर्म, परंपरा, शेतकरी, स्त्रिया, राजकारण, शोषण ,साहित्य या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर भाष्य आणि कृती करतात
४) हंटर कमिशन ते आसूड पर्यंत वंचित समूह हाच त्यांच्या सर्व मांडणीचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक मुद्दा ते शेवटच्या माणसापर्यंत नेतात. वंचित हाच त्यांच्या चिंतनाचा गाभा आहे
५)एका वर्तुळात अडकलेले शिक्षण त्यांनी मुक्त केले त्यामुळे आज बहुजन आणि स्त्रिया यांचा सहभाग वाढून आजचा समाज अधिक एकजिनसी झाला.याचे श्रेय त्यांना आहे.
६)एखाद्या प्रश्नावर ते बोलून थांबत नाहीत किंवा आपल्यासारखी फेसबुक पोस्ट टाकून कृतीचे खोटे समाधान ते मिळवत नाहीत. ते लगेच कृती करीत होते. साहित्य संमेलनावर मोर्चा, राजपुत्राला निवेदन, न्हाव्यांचा संप,अशा कितीतरी छोट्या मोठ्या या प्रत्येक बाबतीत ते कृती करतात . क्रियावान या पंडित: या उक्तीप्रमाणे ते खरे पंडित आहे
७) आज शिक्षणानेच विकास होईल ही सर्व तळातल्या जातीत निर्माण झालेल्या आकांक्षा,दलित आदिवासी भटके यांच्यात झालेली जाणीव जागृती, तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलने हे त्यांनी मांडलेल्या तर्कावर विकसित झालेल्या प्रक्रिया आहेत
८) डावे धर्माला झोडपतात आणि सामान्य माणसापासून तुटतात.कार्यकर्ते समुहापासून तुटणे शोषक असलेल्या व्यवस्थेला हवेच असते.. महात्मा फुलेचे वैशिष्ट्य हे की त्यांनी धर्माचे ठेकेदार झोडपले आणि माणसातील आदिम धर्माची भूक जाणून सत्यधर्म ही दिला. हा विवेक आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवा
९) कार्यकर्ते लेखनाला महत्व देत नाहीत पण फुलेंनी इतक्या गर्दीच्या आयुष्यात लेखन ही केले.कविता ,नाटक वैचारिक सर्वप्रकारे लिहिले. वेळ नाही हे सांगणाऱ्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे
११)आपल्याला एखादी गोष्ट पटली असेल तर जगाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता उभे राहण्याची हिंमत त्यांनी मला दिली. त्यासाठी सामाजिक बदनामी ,हल्ले याचा विचारही मनात आणला नाही. ही हिंमत फुले मला देतात.
१० ) विचार करा पण कृती त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हे फुलेंनी मला शिकवले ...कृती करण्याची आणि जगाविरुद्ध ठाम उभे राहण्याची धमक ते आपल्याला देतात म्हणून महात्मा फुले मला खूप भावतात
📌महापरिक्षेच्या गोंधळाची दखल कोण घेणार??
- पंकज राठी ,औरंगाबाद

@eMPSCguidance
राज्यसेवा मुख्य परीक्षा GS विश्लेषण व स्ट्रटजी
🔹 GS 1 to GS 4
👆👆👆👆👆👆
PRE.GS.strategy.pdf
291.6 KB
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चे नियोजन

@empscguidance
◆ मुख्य निवडणूक
आयुक्त
:- सुनील अरोरा
:- क्रमांक :- 23
नासा ची मंगळवारी : इनसाइट लँडर