🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2018 | 16 नोव्हेंबर

समाविष्ट पिके - ज्वारी , बाजरी , नाचणी , राळा , वरई , कोद्रा , राजगिरा
#current

🚦NITI आयोगाने ‘हिमालय राज्य प्रादेशिक परिषद’ची स्थापना केली

📌राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोगाने 'हिमालय राज्य प्रादेशिक परिषद' (Himalayan State Regional Council) याची स्थापना केली आहे.

📌परिषदेच्या अध्यक्षपदी NITI आयोगाचे डॉ. व्ही. के. सारस्वत हे असतील. अन्य सदस्यांमध्ये हिमालय प्रदेशातील राज्यांचे मुख्य सचिव तसेच प्रमुख केंद्रीय मंत्रालयांचे सचिव, NITI आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही विशेष व्यक्ती असतील.

📌भारतीय हिमालयाच्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ही परिषद तयार करण्यात आली आहे. हिमालयाच्या क्षेत्रात चालवल्या जाऊ शकणार्‍या कार्यांसाठी विषयनिहाय एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने 2017 साली स्थापन केलेल्या पाच कार्यगटांच्या अहवालांवर आधारित ओळखल्या गेलेल्या कृतींचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

📌परिषद 12 राज्यांचा आढावा घेणार आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड , हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा, आसामचे दोन जिल्हे (दिमा हसाओ आणि कार्बी अंगलोंग) आणि पश्चिम बंगालचे दोन जिल्हे (दार्जिलिंग आणि कलिमपोंग) यांचा समावेश आहे.
#current

🚦पंकज अडवाणीने सलग तिसरा IBSF बिलियर्ड्स किताब जिंकला

📌भारताच्या पंकज अडवाणी ह्याने यंगून येथे खेळली गेलेली ‘IBSF बिलियर्ड्स’ ही क्रिडास्पर्धा जिंकली आहे.

📌स्पर्धेच्या अंतिम सामन्यात म्यानमारच्या नाय थ्वॉय ओ ह्याला पराभूत केले.

📌 अडवाणीने जिंकलेल्या एकूण जागतिक स्पर्धांची संख्या 20 इतकी झाली आहे.

👉आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे,
जी जगभरात बिगर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स खेळांचे आयोजन करते.
👉या महासंघाची स्थापना 1971 साली करण्यात आली.
👉महासंघाचे दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे मुख्यालय
#current

🚦'धम्म चक्का’: आंध्रप्रदेश राज्याचे राज्य चिन्ह

📌आंध्रप्रदेश राज्य सरकारने 2014 साली राज्य विभाजीत झाल्यानंतर पाच वर्षांनी अधिकृत वापरासाठी ‘धम्म चक्का’ किंवा ‘द व्हील ऑफ लॉं’ चित्रित असलेले बोधचिन्ह राज्याचे राज्य चिन्ह म्हणून निश्चित केले आहे.

📌हे बोधचिन्ह अमरावती स्कूल ऑफ आर्ट या संस्थेनी तयार केले आहे.
चिन्हात ‘धम्म चक्का’ (पाली भाषेत) म्हणजेच ‘धर्म चक्र’ (संस्कृत भाषेत) याने सर्वाधिक जागा व्यापलेली आहे.
सोबतच त्यात ‘त्रिरत्नाचे वलय’, देठाच्या दोन्ही बाजूंना पाने असणारे चित्र आणि मौल्यवान रत्ने चित्रित आहेत. सजावटीसाठी चढत्या क्रमाने आतले 48, मध्यभागी 118 आणि बाह्य वर्तुळ 148 मि.मी.चे तीन वर्तुळे काढलेली आहेत आहेत.
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/empscguidance
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
#Forest Services Mains Cutoff


#Forest Services मुख्य
जागा अतिशय कमी असल्यामुळे,

👉सर्वप्रथम एकूण #Score 160+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-

1. आपले नाव,

2.एकूण गुण - दोन्ही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित

3. बैठक क्रमांक ( Seat number) @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..

4. Category ( प्रवर्ग)

जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🌀प्रादेशिक पुरस्कार:- २०१८
----------------------------------

* लता मंगेशकर पुरस्कार:-
२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )
२०१७:- पुष्पा पागधरे
२०१६:- उत्तमसिंग

* जनस्थान पुरस्कार:-
२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष
२०१५:- अरुण साधू

* राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१८:- पुष्पा भावे
२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर
२०१६:- शरद पवार

* पुण्यभूषण पुरस्कार :-
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७ :-डॉ.के.एस.संचेती
२०१६:-भाई वैद्य

* ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे
२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते
२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख

* चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
२०१८ :-सुहास बाहुळकर
२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर
२०१६ :- सदाशीव गोरसकर

* यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा
२०१६:- नंदन निलकेणी
२०१५ :- विजय केळकर

* कुसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश
२०१६ :- विष्णू खरे

* व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- विजय चव्हाण
२०१७ :- विक्रम गोखले
२०१६:-व्ही.एन. मयेकर

* व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
२०१८:- मृणाल कुलकर्णी
२०१७ :- अरुण नलावडे
२०१६:- अलका कुबल

* राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- श्याम बेनेगल
२०१७ :-सायरा बानो
२०१६ :- जितेंद्र कपूर

* राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
२०१८:- राजकुमार हिरानी
२०१७ :- जॅकी श्राॅप
२०१६:- अनिल कपूर

* नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- जयंत सावरकर
२०१७ :-बाबा पार्सेकर
२०१६:-लीलाधर कांबळी

* संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८ :-विनायक थोरात
२०१७ :-निर्मला गोगटे
२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर

* विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- मधुकर नेराळे
२०१७ :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)
२०१६:- गंगाराम कवठेकर

* टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
२०१८:- के. सिवन
२०१७ :-पी.साईनाथ
२०१६:- शेखर गुप्ता

* लोकमान्य टिळक सन्मान:-
२०१७ :-आचार्य बाळकृष्ण
२०१६:- शरद पवार

* लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)
२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )
२०१५:- उत्तम कांबळे
२०१४:- डॉ मुजफ्फर हुसेन

* वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- मधु मंगेश कर्णिक
२०१७ :-मारुती चितमपल्ली
२०१६ - प्रा. रा.ग. जाधव

* विष्णुदास भावे पुरस्कार:-
२०१८ :- डॉ .मोहन आगाशे
२०१७ :- मोहन जोशी
२०१६ :- जयंत सावरकर

* भीमसेन जोशी पुरस्कार :-
२०१७ :- माणिक भिडे
२०१६ :- बेगम परविन रुसताना

* धन्वतरी पुरस्कार:-
२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान
२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी
२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य
🔰PSI 2016 Batch Waiting List Letter

@empscguidance