🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Current
🚦‘M777 हॉविट्झर’, ‘K-9 वज्र’ स्वचलित तोफा भारतीय लष्कराच्या सेवेत

🎯भारतीय लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी ‘M777 A2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर’, ‘K-9 वज्र’ स्वचलित तोफा सेवेत समर्पित केल्या आहेत.

या तोफा तैनात झाल्यानंतर पश्चिम सीमेवरील भारताच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

155 मिलीमीटरच्या 39 क्षमतेच्या अल्ट्रा लाईट (अती हलक्या) हॉविट्झर तोफा अमेरिकेकडून विकत घेतल्या असून भारतात महिंद्रा डिफेन्स आणि BAE सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून या तोफांची जुळणी करण्यात आली आहे. 155 mm/52 कॅलिबरच्या पहिल्या दहा ‘K-9 वज्र’ तोफा दक्षिण कोरियाच्या हानवा तेचविन कंपनी आणि लार्सन अँड टुब्रो यांनी पुरविल्या. उर्वरित 90 तोफा मुख्यत्वेकरून भारतात निर्मित केल्या जातील
रेरा हक्क जागृती - 1 मे 2016 रेरा कायदा
PRE.GS.strategy.pdf
291.6 KB
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चे नियोजन

@empscguidance
#Current
🚦 राष्ट्रीय शिक्षण दिन: 11 नोव्हेंबर

📌देशात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

📌मौलाना अब्दुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते.

📌त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 या काळात शिक्षण मंत्री म्हणून सेवा दिली.
🔰CDPO च्या कोणत्याही जागा वाढणार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नये .

@empscguidance
MSO M 2018 PSI P2 Final key.pdf
481.5 KB
PSI मुख्य पेपर - 2

अंतिम उत्तरतालिका

Join @empscguidance
5_6294232679176994902.pdf
530.5 KB
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (मुख्य) परीक्षा-2018 ( Ex.PSI)
प्रथम उत्तर तालिका, पेपर- 2
🌀मानव विकास निर्देशांक अहवाल 2018
👇👇👇

📌 Human Development Index (HDI) report 2018

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमद्वारा (UNDP) जाहीर
भारताचा क्रमांक :- 189 देशांच्या यादीत 130 वा
मागील वर्षी भारताचा क्रमांक :- 131
भारताची HDI किंमत :- 0.640 (2017) (0.624=2016)
भारताचा समावेश मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये
59 देशांचा अति उच्च मानव विकास गटामध्ये समावेश
38 देशांचा सर्वांत कमी मानव विकास गटामध्ये समावेश
1990 पासून 2017 पर्यन्त भारताच्या HDI मध्ये सातत्याने 50% वृद्धी झाली

🍀 जागतिक क्रमवारी :-
💕 पहिले पाच देश :-
1) नॉर्वे
2) स्वित्झर्लंड
3) ऑस्ट्रेलिया
4) इयर्लंड
5) जर्मनी

💕 शेवटचे पाच देश :-
1) नायजर (189)
2) मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक (188)
3) दक्षिण सुदान (187)
4) चाड (186)
5) बुरुंडी (185)

T.me/empscguidance
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
#current

🚦पणजीमध्ये ‘सार्वजनिक आरोग्यासाठी योग विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’चे आयोजन

📌दिनांक 12 नोव्हेंबर 2018 रोजी पणजी (गोवा) येथे ‘सार्वजनिक आरोग्यासाठी योग विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ (International Conference on Yoga for Public Health) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

📌दोन दिवसीय या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या AYUSH मंत्रालयातर्फे करण्यात आले. 50 देशांमधील प्रतिनिधींनी परिषदेत भाग घेतला होता.
#current

🚦“समुद्र शक्ती”: भारत-इंडोनेशिया यांचा द्वैपक्षीय सागरी सराव

📌इंडोनेशियाच्या सुराबया बंदराजवळ भारत आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांचा “समुद्र शक्ती 2018” या शीर्षकाखाली द्वैपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.
👉हा कार्यक्रम 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात चालत आहे.

📌दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाचे ‘INS राणा’ या जहाजाने या सरावात भाग घेतला आहे.

📌द्वैपक्षीय संबंध बळकट करणे, सागरी सहकार्य वाढवणे आणि सर्वोत्तम पध्दतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.

इंडोनेशिया (दिपांतर प्रजासत्ताक) आग्नेय (दक्षिण पूर्व) आशिया आणि ओशिनिया येथील एक देश आहे. हा 17508 बेटांचा बेट राष्ट्र आहे
आणि सुमारे 109 कोटी लोकसंख्येसह जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे.
जकार्ता या देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिआह हे चलन आहे.
#current

🚦अमेनेस्टी इंटरनॅशनलने म्यानमारच्या आंग सान सू की यांना दिलेला सन्मान परत घेतला

📌लंडन (UK) येथील अमेनेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवाधिकार संघटनेनी म्यानमारच्या आंग सान सू की यांना 2009 साली बहाल केलेला ‘अॅम्बेसेडर ऑफ कोन्सायन्स अवॉर्ड’ हा सन्मान परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

📌गेल्यावर्षी रोहिंग्या सशस्त्र गटाने पोलीस ठाण्यांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या संघर्षात म्यानमारच्या सुरक्षा दलावर हत्याकांडाचा आरोप करण्यात आला. तेव्हापासून सुमारे 700,000 रोहिंग्या मुस्लीम लोकांनी बांग्लादेशकडे स्थलांतरण केले. अश्या आरोपांना म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार मंत्री आंग सान सू की यांनी फेटाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.

म्यानमार हा आग्नेय आशियातला एक देश आहे. नॅयपिडॉ हे देशाचे राजधानी शहर असून बर्मीज क्याट राष्ट्रीय चलन आहे.
CDPO Test 7.pdf
5.1 MB
🎯महिला व बालविकास अधिकारी/CDPO
सराव चाचणी क्रमांक ०७

@eMPSCguidance
🚩मराठा आरक्षण🚩

राज्य मागासवर्गीय आयोग सकारात्मक.
आता येणाऱ्या सर्व जाहिराती मध्ये आरक्षण असणार

सर्व 37 हुतात्म्यांना स्मरण करूया
🙏🙏🙏🙏

@empscguidance
🚩मराठा आरक्षण
📌समांतर आरक्षण संबधित आयोगाची घोषणा

@empscguidance
#current

🚦ISROचे GSAT-29 दळणवळण उपग्रह

📌दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) आंध्रप्रदेशाच्या श्रीहरिकोटा तळावरून 3,423 किलोग्राम वजनी GSAT-29 दळणवळण उपग्रहाला अवकाशात पाठविण्यात आले आहे.

📌चार टन भार वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या GSLV-Mk 3-D2 अग्निबाणाच्या सहाय्याने उपग्रहाला पृथ्वीपासून 36,000 किमी अंतरावर भूस्थिर कक्षेत पाठवले जात आहे.

👉उपग्रहाद्वारे Ka/Ku-बँड हाय थ्रुपुट कम्युनिकेशन ट्रांसपॉन्डर पाठविण्यात आले आहे, ज्यामुळे डोंगराळ आणि दुर्गम भागात वापरकर्त्यांना उच्च-गती संपर्क सेवा पुरविण्यासाठी मदत मिळणार.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
👉याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.

👉1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

👉 ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
👉1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.

👉22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.

👉 त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.