🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महत्वाच्या घटनादुरुस्त्या #polity
🚦महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
☑️विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक) आणि
☑️रमेश पतंगे(साप्ताहिक विवेकचे संपादक)यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार..
भारत :एक दृष्टिक्षेप
#current

📌गंगेच्या 'पावित्र्या'साठी सलग ११२ दिवस उपोषण करणारा तपस्वी काळाच्या पडद्याआड 


🔸प्रदीर्घ कालखंडापासून गंगा नदी स्वच्छता आणि सुरक्षेसाठी सर्वस्व झोकून दिलेला अवलिया काळाच्या पडद्याआड गेला आहे.

🔸आयआयटी कानपूरमध्ये प्रोफेसर राहिलेले आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी जीडी अग्रवाल यांचे आज निधन झाले.  ते  ८६ वर्षांचे होते.

🔸 त्यांना स्वामी सानंद असे म्हटले जात होते. 

🔸स्वामी सानंद गेल्या ११२ दिवसांपासून उपोषणावर होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी पिणे सुद्धा सोडून दिले होते. स्वामी सानंद गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिले. त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिले होते. ऋषिकेश येथील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
♦️आंतरराष्ट्रीय बालिका दिवस: 11 ऑक्टोबर

2012 पासून 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 2018 चा विषय #Theme: 'With Her: A Skilled Girl Force'.
#नियुक्ती
♦️ भारताचे नवे सॉलिसिटर जनरल :तुषार मेहता:
#Current
✔️तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता(Solicitor General of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

✔️रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर-17 पासून हे पद भरण्यात आले नव्हते. ज्येष्ठ विधी तज्ञ तुषार मेहता सध्या 2014 सालापासून अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. मेहता यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000,कलम 66(अ) प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

✔️भारत सरकारचे मुख्य कायदा सल्लागार असलेले भारताचे महा न्यायप्रतिनिधी (Attorney General) यांच्या खाली भारताचे महाधिवक्ता (Solicitor General) यांचे पद येते.

✔️महाधिवक्ता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधील त्याचे प्राथमिक वकील असतात आणि पदाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. ते देशाचे द्वितीय कायदा अधिकारी आहेत. ते ‘विधी अधिकारी (नियम व अटी) विनियम-1972’ अन्वये केंद्रीय भारताचे प्रतिनिधी आहेत. भारताचा महा न्यायप्रतिनिधी हे भारतीय संविधानाच्या कलम 76 अन्वये एक संवैधानिक पद आहे आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. महाधिवक्ता पदाची नियुक्ती मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती करते.
जांभूळबेट : राज्यातील एकमेव नदीपात्रातील बेट परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील गोदावरी पात्रात आहे
#geography @eMPSCguidance
भूगोल नोट्स 3 ,कैलास भोई सर ,जळगाव
🌷नियम : 6

🌷काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.

      उदा : 1. वर - वधू        2. पिता - माता

             3. राजा - रानी      4. पाती - पत्नी

             5. दीर - जाऊ        6. सासरा - सासू

             7. बोकड - शेळी      8. मोर - लांडोर


🌷नियम : 7

🌷मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.

       उदा : 1. वेळ - वेळ         2. बाग - बाग

              3. वीणा - वीणा      4. मजा - मजा

              5. टेकर - टेकर       6. तंबाखू - तंबाखू


🌷नियम : 8

🌷परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.

      उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी            

2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी

    3. पेन्सिल (लेखनी) - स्त्रीलिंगी  

 4. कंपनी(मंडळी) - स्त्रीलिंगी

       
 5. बूक(पुस्तक) - नपुसकलिंगी


🌷नियम : 9

🌷सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.

 उदा : 1. साखरभात - पुल्लिंगी    
       
2. मिठभाकरी - स्त्रीलिंगी

  3. भाजीपाला - पुल्लिंगी           

4. भावूबहीन - स्त्रीलिंगी

           
5. देवघर - नपुसकलिंगी


🌷नियम : 10 

🌷काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.

     उदा .1. गरुड      2. मासा       3. सुरवड

           4. साप       5. होळ         6. उंदीर


🌷नियम : 11


🌷काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.

   उदा  1. घुस     2. पिसू      3. माशी

        4. ऊ         5. सुसर     6. खार

       7. घार        8. पाल

@eMPSCguidance
✔️"मराठवाड्याचे गांधी" गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन