🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात.
आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे, मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे.
~ वपु काळे # vapu # रंगपंचमी
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे


– सोलापूर, चंद्रपूर, अमरावती विमानतळांच्या विकासासाठी ५० कोटींची तरतूद
– पंतप्रधान सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५७० कोटींची तरतूद
– पुढील दोन वर्षांत १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार
– राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर २९,६२१ रूपयांचे कर्ज. थकीत कर्ज फेडण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार २०० कोटींची तरतूद
– जलयुक्त शिवार योजनेमधून ५ हजार गावे पाणी टंचाईमुक्त करणार
– यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) येथे कृषि महाविद्यालय उभारणार
– रस्ते बांधकाम आणि डागडुजीसाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद
– मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला २५ कोटींचा निधी
– वीज आणि पाणी वाचविण्यासाठी हरित इमारतींच्या निर्मितीवर भर देणार
– राज्यातील प्रलंबित तीन रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून १५० कोटी रुपयांची तरतूद
– राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार
– पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प
– महाराष्ट्राचा विकास दर ९.४ टक्के
– पुढच्या आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर दोन आकडी करण्याचा संकल्प
– मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण करणार
– सन २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा सरकारचा संकल्प
– मुंबई आणि नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ७०० कोटींची तरतूद
– ‘डायल ११२’ प्रकल्प राबविणार. पोलिस दल, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड या सेवा एकच नंबरवर मिळणार