🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
📄मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका
-गुट्टे अकॅडेमी
👆👆👆👆👆👆👆👆
@eMPSCguidance
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
💡IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची भरती

🔅 लिपिक - ७७२ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी २० ते २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 परीक्षा -

👉 पूर्व परीक्षा - ८,९,१५ आणि १६ डिसेंबर २०१८

👉 मुख्य परीक्षा - २० जानेवारी २०१९

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2NHEot5

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2NSqQej
♦️महापरिक्षा पोर्टल रद्द करणार- आ. बच्चू कडू ।
27 sep रोजी शनिवारवाडा-जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा..

Mahapariksha portal चा भ्रष्ट कारभार, 72 हजार जागांचे गाजर आणि संयुक्त परीक्षा रद्द करण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शनिवार वाडा येथे जमायचे आहे. तेथून आमदार बच्चू कडू यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहोत। आपल्या हक्काच्या न्याय मागण्यांसाठी सर्वानी शनिवारवाडा येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती...

https://youtu.be/gvHIMjpAwjs
#Current

🎯राष्ट्रीय

📌AMRUT अंतर्गत ‘2018 जीवनमान सुलभता’ निर्देशांकाच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेले राज्य - आंध्रप्रदेश.

📌राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 अनुसार, वय वर्ष 5 खालील बालकांमध्ये इतके कुपोषणाच्या विळख्यात आहेत - 7.5% (सुमारे 8 दशलक्ष).

📌देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकाराच्या ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या अंतर्गत या शहरात 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे – मुंबई.

🎯आंतरराष्ट्रीय

📌23 सप्टेंबर 2018 रोजी या शहरात 'गांधी मार्च' या दोन वर्ष चालवल्या जाणार्‍या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला - हेग, नेदरलँड्स.

📌संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयी दक्षिण आफ्रिकेच्या या माजी राष्ट्रपतीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले - नेल्सन मंडेला.

📌संयुक्त राष्ट्रसंघाने हा कालावधी "नेल्सन मंडेला शांती दशक” म्हणून घोषित केला - सन ‘2019-2028’.

📌या ठिकाणी ‘कम्यूनिटी सेक्युरिटी अँड चिल्ड्रेन्स ऑनलाइन सेफ्टी’ या विषयाखाली 19 आणि 20 नोव्हेंबर 2018 रोजी ‘इंटरफेथ अलायन्स फोरम’च्या बैठकीचे आयोजन केले जाणार - अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात (UAE).

🎯क्रिडा

📌‘सर्बिया ज्युनियर व कॅडेट ओपन 2018’ या टेबल टेनिस स्पर्धेच्या मुली व कॅडेट मुले गटात सांघिक जेतेपद विजेता देश – भारत.

📌FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’ मधील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (महिला) – मार्टा (ब्राझील   आणि ऑरलांडो प्राइड).

📌‘FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’ मधील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (पुरुष) - ल्यूका मोड्रिक (क्रोएशिया).

🎯व्यक्ती विशेष

📌या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची निवड झाली – मालदीव.

📌या मोबाइल अॅपचे सह-संस्थापक केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रेगर यांनी कंपनीमधील त्यांच्या पदांचा राजीनामा घोषित केला - इंस्टाग्राम.

📌“राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड 2018” इतक्या लोकांना दिला गेला - सौदी अरबचे तीन आणि दोन लॅटिन-अमेरिकन.

🎯सामान्य ज्ञान

📌भारत सरकारने या साली अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) सुरू केली - सन 2015.

📌नेदरलँड्स देशाचे राजधानी शहर - अ‍ॅमस्टरडॅम.

📌संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे स्थापना वर्ष – सन 1945(24 ऑक्टोबर).

📌संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे मुख्यालय – मॅनहॅटन,न्यूयॉर्क शहर, अमेरिका.

📌मालदीव देशाचे राजधानी शहर – माले.

📌मालदीव देशाचे राष्ट्रीय चलन - मालदीवी रुफिया.

📌आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) याचे स्थापना वर्ष - सन 1904.

📌1980 सालापासून दिला जाणारा हा वार्षिक सन्मान नोबेल पुरस्काराला पर्यायी पुरस्कार म्हणून ओळखला जातो - राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड.
♦️मुलाखतीला सामोरे जाताना:

नुकतीच राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली आता बरेच विध्यार्थी आतापर्यंत self study करतात आणि मुलाखतीची तय्यारी म्हणून mock interview देतात आणि आपल्या कष्टाचे श्रेय दुसर्या लोकांना देऊन टाकतात. खर तर मुलाखतीची तय्यारी घरी सुद्धा करता येईल. त्यासाठी पुण्यात येण्याची पण गरज नाही. आणि जे लोक स्वतः तय्यारी करतात त्या लोकांसाठी एक लेखमाला सुरु करत आहे. पहिल्या भागात मुलाखातीची एक रूपरेखा सांगून प्रत्येक घटकावर नंतर सविस्तर चर्चा करण्यात येईल.

मुलाखत ही राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतील १०० मार्कांची होते यामध्ये चांगले गुण मिळविणारे यशस्वी ठरतात. मुलाखतीत ज्ञानाची कसोटी घेतली जाते, असे नाही तर आपल्या भोवताली घडणाऱ्या घडामोडी याविषयी उमेदवाराचे मत काय आहे, याची तपासणी केली जाते.

तय्यारी कोठून करावी याबाबत:
१.पूर्व परीक्षेचा अर्ज भरताना ‘बायोडाटा’ भरलेला असतो तो प्रमाण त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. आजकाल आपले नाव विचारले जात नाही त्यामुळे आपली जन्म तारीख आणि त्या दिवस आणि त्या वर्षाचे महत्त्व जाणून घ्यावे.
२. कायमचा पत्ता- ज्या गावी आपण राहता त्या गावाची भौगोलिक वैशिष्टे तसेच इतर माहिती आपणास असावी. आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपल्या गावचे प्रश्न जाणून घ्यावेत तसेच त्यावरील उपाय योजना यांची तय्यारी करावी.
वरील प्रमाणे सध्याचे राहण्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य याबाबत माहिती घ्यावी.
3.शैक्षणिक पात्रता – शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती विचारली जाते. ज्या विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना माहित असणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थांचे नाव वेगळे असेल तर त्याबाबत तय्यारी करावी. उदा. जवाहर नवोदय विद्यालय असेल तर जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे कार्य माहित असणे आवश्यक आहे.
4.अवांतर उपक्रम-
छंद, क्रीडाप्रकारामधील सहभाग, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके याबाबत तय्यारी करावी.
५. चालू घडामोडींविषयी माहिती–
आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. या मुद्दय़ांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.
६. पदांचा पसंतीक्रम–
दिलेल्या पसंतीक्रमांतील पदांची माहिती, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या भूमिका याबाबत जाणून घ्यावे.
७.अनुभव–
नोकरी करत असल्यास त्याविषयक तयारी करणे अत्यावश्यक ठरते. ज्या पदावर काम करत आहात त्या पदाची कार्ये व जबाबदारी या विषयक प्रश्न विचारले जातात.
.................................................................................................
✔️आधारकार्ड कशासाठी अनिवार्य असेल ??
@eMPSCguidance
♦️ नगरपरिषद मुख्य परीक्षा Answerkey

https://mahapariksha.gov.in/dmamainsanswerkey/#
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महापरिक्षावाल्यांच्या माज बघा
दि . 27 सप्टेंबर
स्थळ : शनिवारवाडा येथे
सर्वांनी एकत्र या

@eMPSCguidance