🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
स्वामी रामानंद तीर्थ
Rajyaseva 2017 All Interview.pdf
8.4 MB
राज्यसेवा मुलाखत-2018 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 2017 ची मुलाखत दिलेल्या काही उमेदवारांच्या मुलाखतींच्या transcripts उपलब्ध करून देत आहोत.
मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप कसे असते,सर्वसाधारपणे कोणत्या topic वर प्रश्न विचारले जातात इत्यादी बाबतचा मुलाखतीसंबंधी एक अंदाज यावा व तयारीला योग्य दिशा मिळावी याकरिता या transcripts नक्कीच फायदेशीर ठरतील.तुमचे कोणी मित्र मुलाखतीची तयारी करत असतील तर त्यांनाही हि pdf अवश्य share करा.👆👆👆

- कैलास पिकवने
उपशिक्षणाधिकारी
♦️अर्जुन पुरस्कार 2018 जाहीर

✔️नीरज चोप्रा, जिन्सन जॉन्सन, हिमा दास -अॅथलेटिक्स
✔️राही सरनोबत, अंकुर मित्तल, श्रेयांसी सिंग-नेमबाजी
✔️रोहन बोपन्ना-टेनिस
✔️स्मृती मानधना-क्रिकेट
✔️सिक्की रेड्डी-बॅडमिंटन
✔️मनिका बात्रा,साथियान (टे.टे)
✔️शुभंकर शर्मा-गोल्फ
✔️मनप्रीत सिंग, सविता पुनिया-हॉकी

@eMPSCguidance
सागरमाथा - II हा नेपाळ-चीन मधील दुसरा संयुक्त लष्करी सराव अभ्यास (JME) चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात सुरूवात झाली. #CA

👆👆

● 12 दिवसीय दीर्घ संयुक्त सराव दहशतवाद आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणांवर लक्ष केंद्रित करतो.

● सागरमाथा हे दोन्ही देशांमध्ये असणारे माउंट एव्हरेस्टचे नेपाळी नाव आहे.

● एप्रिल 2017 मध्ये काठमांडू (नेपाळची राजधानी) मधील महाराजगंज येथे नेपाळ सैन्याच्या पॅरा ट्रेनिंग स्कूलमध्ये पहिला सागरमाथा फ्रेंडशिप सराव आभ्यास 2017 आयोजित करण्यात आला होता.
🔻काक्रापार अणुऊर्जा केंद्राच्या दुसऱ्या युनिटचे निहित वेळेपूर्वी नवीकरण आणि आधुनिकीकरण पूर्ण 

काक्रापार अणुऊर्जा केंद्राच्या  (केएपीएस -2 - 220 मेगावॅट) च्या दुसऱ्या  युनिटने आज (सोमवार) 02:22 वाजता नवीकरण आणि आधुनिकीकरण पूर्ण केल्यानंतर काठिण्य पातळी   (रिएक्टरमध्येनियंत्रित स्व-निरंतर परमाणु फिशन चेन रिएक्शनची सुरुवात) गाठली. यात एन-मास कूलंट चॅनलरिप्लसमेंट (ईएमसीसीआर), एन मास फीडर रिप्लेसमेंट  (ईएमएफआर) आणि इतर सुरक्षा दर्जासुधारण्याचा समावेश आहे.  हे कार्य  नियोजित वेळेच्या साडेतीन महिने आधी  पूर्ण झाले. या प्रयत्नात, परमाणु ऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल), परमाणू इंधन कॉम्प्लेक्स  (कूलंट चॅनेलचे निर्माते), भाभाअणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) आणि विविध विक्रेते / कंत्राटदार  या प्रसंगी उपस्थित होते.

सर्व नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर काठिण्य पातळीचा निर्णय घेण्यात आला. यानंतर वेगवेगळ्या चाचण्या, ग्रिडशी जोडणे आणि विजेच्या पातळीत  निर्धारित  प्रक्रिया आणि नियामक मंजुरीनुसार पूर्ण क्षमतेपर्यंत  वाढ केली जाईल.

गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील केएपीएसमध्ये 220 मेगाव्हॅट  पीएचडब्लूआरएस (केएपीएस -1 आणि 2) ही  दोन स्वदेशी युनिट्स समाविष्ट आहेत ज्यांनी 1993 आणि 1995 मध्ये व्यावसायिक परिचालन  सुरू केले. या  ठिकाणी 700 मेगावॅट क्षमतेचे पीएचडब्लूआरएस (केएपीपी -3 व 4) चे आणखी दोन युनिट्स निर्माणाधीन आहेत.

एनपीसीआयएल 6780 मेगावॅट  क्षमतेसह २२ परमाणु ऊर्जा अणुभट्ट्या (अणुऊर्जा विभागाच्या  मालकीच्या 100 मेगावॅटच्या आरएपीएस -1 सह ) चालविते  आणि त्यांच्याकडे   6200 मेगावॅट क्षमतेच्या आठ निर्माणाधीन अणुभट्ट्या आहेत. सरकारद्वारे प्रशासकीय मंजूरी आणि आर्थिक मंजुरी देण्यात आलेल्या आणखी बारा अणुभट्ट्यांवर (9 000 मेगावॅट्स) देखील काम सुरू आहे.
♦️DMA नगरपरिषद मुख्य परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा👍👍💐💐
मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यकाच्या ९९ पदांची भरती

👉 पद - स्वीय सहाय्यक
• मुंबई उच्च न्यायालयात- ६८ पदे
• नागपूर खंडपीठात - २५ पदे
• औरंगाबाद खंडपीठात - ६ पदे

👉 वेतनश्रेणी- १५६००-३९१०० ग्रेड पे ५४०० रुपये.

👉 वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमाती, इमाव, विशेष मागास वर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 शैक्षणिक पात्रता –
• कोणत्याही शाखेची पदवी
• १२० शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघुलेखनाची आणि ५० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन शासकीय परीक्षा उत्तीर्ण

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ सप्टेंबर २०१८

👉 सविस्तर माहितीसाठी - https://goo.gl/L1fbsq

👉 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rCczm8
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने निमलष्करी दलात कॉन्स्टेबल्सच्या ५४९५३ जागांची महाभरती. अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
महापरिक्षा करनिर्धारण परीक्षेत झालेले गैरप्रकार

सर्वांना पाठवा