निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
876 subscribers
50 photos
1 video
10 files
21 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
मराठी माध्यमातून #UPSC ची तयारी करतांना येणार्‍या विविध अडचणीच्या बाबतीत सोबत जोडलेल्या ब्लॉग मध्ये मांडणी केली आहे. आता #MPSC ने देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पध्दत अवलंबली असल्याने यातील काही समस्यांवर नक्कीच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

त्यातील काही समस्या कमी व्हाव्या यासाठी @UPSCin_Marathi @PSIRin_Marathi आणि @EssayInMarathi
हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहेत. इथून पुढे या सर्व चॅनल वर नियमित संवाद साधला जाईल. ब्लॉग नक्की वाचा आणि कमेन्ट मध्ये सांगा आणखी काय समस्या वाटतात. धन्यवाद!

http://mauliwrites.blogspot.com/2019/11/Upsc-In-Marathi-Medium.html
फक्त #MPSC चा अभ्यास करणार्‍या अनेकांच्या मनात #MPSC च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे भीती निर्माण झाली असेल, ती साहजिक देखील आहे. परंतु आता खचून जाण्यापेक्षा येणार्‍या काळातील जुन्या पद्धतीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे.

2023 च्या मुख्य परीक्षेच्या तणावात येणार्‍या परीक्षा वरून लक्ष विचलित होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. वर्णनात्मक परीक्षेच्या संदर्भात दर्जेदार इंग्रजी अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. मराठी मध्ये या संदर्भात असलेली कमतरता भरून काढण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात लवकरच YouTube आणि टेलिग्रामच्या माध्यमातून आपला संपर्क चालू राहील. तसेच या संदर्भात एका वेबसाईटचे देखील काम आपण हाती घेणार आहोत.

तसेच #UPSC ची मराठीत तयारी करणार्‍यांना या निर्णयामुळे जरी आनंद झाला असेल तरी तुमची स्पर्धा आता आणखी वाढणार आहे, याचा विसर पडू देवू नका. सांगायचा मुद्दा एवढाच की कमी जास्त फरकाने सर्वांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत, तशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवा.

तुम्ही निबंधाच्या तयारी साठी @EssayInMarathi तसेच राज्यशास्त्राच्या तयारी साठी आपले @PSIRin_Marathi हे टेलिग्राम चॅनल सोबत जोडले जाऊ शकता.

धन्यवाद!

Join @UPSCin_Marathi
बहुतांश upsc करणार्‍यांना mpsc च्या नवीन परीक्षा पद्धती बद्दल बोलतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्यांना वाटतंय आपण सहज पास होऊ.

परंतु ते खरंच तस आहे का?

मी आजूबाजूच्या upsc करणार्‍यांचे निरीक्षण केले असता, मला असे दिसून आले की बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासातील 60-70% वेळ हा पूर्व परीक्षेची तयारी करण्यात घालवतात. त्यामुळे त्यांचे मुख्य परीक्षेकडे दुर्लक्ष झालेले असते. त्यात वैकल्पिक विषयाची तयारी, मुख्य परीक्षेसाठी लागणारे शासन प्रणाली, भारतीय समाज, जगाचा इतिहास, अंतर्गत सुरक्षा, नीतीशास्त्र या विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले असते.

त्यामुळे नवीन पद्धतीने मुख्य परीक्षेला सामोरे जातांना सध्या #upsc करणार्‍यांनी गाफील राहू नये. तसेच जे #mpsc करताय आणि त्यांना आता नव्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे, त्यांनी देखील खचून जाऊ नये. थोड्याफार फरकाने सर्वांनाच या आवाहनाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अभ्यासाला लागले पाहिजे.

(ही पोस्ट कोणाला भीती घालवण्यासाठी किंवा निराशावादी बनवण्यासाठी नसून सत्य परिस्थिती काय आहे, याची जाणीव करून देण्यासाठी आहे.)

Join 👇🏾

@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
@EssayInMarathi
मला_माणसाला_शोधायचे_आहे_!.pdf
2 MB
युपीएससीच्या प्रचलित पद्धती नुसार सुमारे 1000-1200 शब्दांत दोन निबंध लिहणे अनिवार्य असते. कदाचित एमपीएससीचा देखील निबंधाचा पेपर याच पद्धतीचा असेल. आपण जर सुरुवातीला थेट 1000+ शब्द एखाद्या विषयावर लिहायला सुरवात केली तर आपल्याला ते अशक्यप्राय वाटायला लागते.

त्यामुळे आता निबंधाची तयारी करतांना सुरुवातीला आपल्याला टप्या टप्प्याने शब्द मर्यादा वाढवली पाहिजे. जस की तुम्ही सुरवातीला 200-300 शब्द लिहू शकता आणि नंतर ती वाढत नेऊन 1000+ पर्यन्त घेऊन जाऊ शकता.

सुरुवातीला निबंधाचा विषय हा तत्त्वज्ञानात्मक असायला नको कारण ते लिहता येणार नाही आणि आपण परत प्रयत्न करणार नाहीत. मी तीन वेळा #upsc मुख्य परीक्षा लिहिली आहे आणि तिन्ही वेळा माझे निबंधाचे गुण 128, 132 आणि 133 आले आहेत. त्यामुळे निबंधाच्या बाबतीत ज्या गोष्टी #upsc मध्ये चांगले गुण मिळवून देतात, त्या मी आपल्या सोबत या टेलिग्राम चॅनलच्या (@EssayInMarathi) माध्यमातून शेअर करणार आहे.

(1/2)

@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
मला_माणसाला_शोधायचे_आहे_!.pdf
2 MB
युपीएससीच्या प्रचलित पद्धती नुसार सुमारे 1000-1200 शब्दांत दोन निबंध लिहणे अनिवार्य असते. कदाचित एमपीएससीचा देखील निबंधाचा पेपर याच पद्धतीचा असेल. आपण जर सुरुवातीला थेट 1000+ शब्द एखाद्या विषयावर लिहायला सुरवात केली तर आपल्याला ते अशक्यप्राय वाटायला लागते.

त्यामुळे आता निबंधाची तयारी करतांना सुरुवातीला आपल्याला टप्या टप्प्याने शब्द मर्यादा वाढवली पाहिजे. जस की तुम्ही सुरवातीला 200-300 शब्द लिहू शकता आणि नंतर ती वाढत नेऊन 1000+ पर्यन्त घेऊन जाऊ शकता.

सुरुवातीला निबंधाचा विषय हा तत्त्वज्ञानात्मक असायला नको कारण ते लिहता येणार नाही आणि आपण परत प्रयत्न करणार नाहीत. मी तीन वेळा #upsc मुख्य परीक्षा लिहिली आहे आणि तिन्ही वेळा माझे निबंधाचे गुण 128, 132 आणि 133 आले आहेत. त्यामुळे निबंधाच्या बाबतीत ज्या गोष्टी #upsc मध्ये चांगले गुण मिळवून देतात, त्या मी आपल्या सोबत या टेलिग्राम चॅनलच्या (@EssayInMarathi) माध्यमातून शेअर करणार आहे.

(1/2)

@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
मराठी अभ्यास साहित्याची यादी या video मध्ये आपण शेअर केली आहे नक्की बघा.

यात कोणते पुस्तक कसे वाचावे, तसेच त्यातील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने सुसंगत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिरिक्त काय वाचवं लागेल देखील यात discuss केलेले आहे.

#mainsbooklist

Join @UPSCin_Marathi

https://youtu.be/v7GLbsqW8ys
MPSC & UPSC GS Marathi Booklist.pdf
6 MB
मराठी माध्यमातून #UPSC आणि #MPSC च्या नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करतांना जी मुख्य समस्या येते, ती म्हणजे मराठीत नेमके कोणते साहित्य उपलब्ध आहेत. त्यावर तोडगा म्हणुन कोणते पुस्तके वाचता येतील या संदर्भात यादी सोबत जोडली आहे.

जर त्यात कोणत्या पुस्तकातून नेमके काय वाचावे हे समजून घ्यायचे असेल तर खाल्ली दिलेल्या लिंक वर आपण ते बघू शकता.

Link -

https://youtu.be/v7GLbsqW8ys

धन्यवाद 🙏🏾

Join
@UPSCin_Marathi
तसं माझं मूळ तर इंजीनियरिंगचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (#PSIR) या विषयाला जवळून अभ्यासायची संधी मिळाली.

कालांतराने पोस्ट ग्रॅज्युएशन पार पडले व नेटची परीक्षा देखील दिली. त्याच काळात upsc मुख्य परीक्षा असल्यामुळे नेटचा अभ्यास काही करता आला नाही. Upsc च्या अभ्यासावर माझी नेट तर आरामशीर निघाली पण JRF (Junior Research Fellowship) 1.07 percentile ने हुकली. अर्थातच तेव्हा संमिश्र भावना होत्या, कारण एका बाजूला नेट निघाल्याचे सुख तर दुसर्‍या बाजूला JRF न मिळाल्याचे दुःख.

त्यामुळे तेव्हाच ठरवले की एकदा तरी थोडा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊया. यंदा शिकवण्याच्या प्रक्रियेतून मिळेल तसा वेळ काढून अभ्यास केला व परीक्षा दिली. कालच या परीक्षेचा निकाल लागला आणि मी 99.50% percentile मिळवून JRF पास झालो.☺️ यासर्व प्रक्रियेत अर्थातच #upsc च्या तयारीचा खूप मोठा फायदा मला झाला. तसेच या निकालाच्या नंतर शिकवण्यासाठी आणखी जास्त हुरूप देखील आले आहे.🤩

या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असलेले माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र-मैत्रिणींचे मी या सुखद क्षणी आभार मानतो. धन्यवाद 🙏🏾

- ज्ञानेश्वर