Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.9K photos
14.7K videos
3K files
8.08K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸 CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding various schemes and initiatives of the Energy Department
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची आढावा बैठक
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ऊर्जा विभाग की विभिन्न योजनाओं व उपक्रमों के संदर्भ में समीक्षा बैठक

🕧12.20pm | 13-6-2025 📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.२० वा. | १३-६-२०२५ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #EnergyDepartment
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding development projects in the Murbad Assembly Constituency
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मुरबाड विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विकास प्रकल्पों के संदर्भ में समीक्षा बैठक

🕑 2.05pm | 13-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.०५ वा. | १३-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Murbad
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the 'Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji 350th Martyrdom Anniversary Committee and the Shri Guru Gobind Singh Ji 350th Guru ta Gaddi Anniversary Committee, Maharashtra State' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र…
CMO Maharashtra Tweets:

शहीद शताब्दी व गुरु ता गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी तसेच गुरु गोविंदसिंह जी 350 वी गुरू ता गद्दी समागम समिती, महाराष्ट्र राज्य’ची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित संत-महंतांसमवेत संवाद साधला.

यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा 350 वा शहिद समागम आणि गुरुगोविंद सिंग जी यांचा 350 वा गुरु ता गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात तीन ठिकाणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. समागमाचे आयोजन नांदेड येथे 15 व 16 नोव्हेंबर, नागपूर येथे 6 डिसेंबर, नवी मुंबई येथे 21 व 22 डिसेंबर 2025 दरम्यान करण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, संघर्षाच्या काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी ते शहीद झाले, हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादुर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, संस्कृती आणि देशाच्या मजबुतीकरणासाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे. वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा समागम कार्यक्रम होणार आहे. या सर्वांच्या एकजुटीतून देश घडविण्याची आणि आपला इतिहास समागमाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही एक संधी असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिंह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्य जी महाराज तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अभिजात मराठी भाषेवरील 'वृत्तभाषा' या स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे व श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding development works and welfare schemes in the Arvi Assembly Constituency
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि कल्याणकारी योजनांबाबत आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में आर्वी विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विकास कार्य एवं कल्याणकारी योजनाओं के संदर्भ में समीक्षा बैठक

🕒 3pm | 13-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३ वा. | १३-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Arvi