Devendra Fadnavis
✔
4.11K subscribers
102K photos
19.3K videos
4.3K files
10.7K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of the Nagpur Skill Centre at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre…
CMO Maharashtra Tweets:

भविष्यातील उद्योगांसाठी कौशल्यसंपन्न युवा घडविण्याचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे नागपूर स्किल सेंटरचे उदघाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एआयडी आणि टाटा यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या नागपूर स्किल सेंटरमध्ये उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यसंपन्न व रोजगारक्षम मनुष्यबळ घडविण्याचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेच्या अग्रस्थानी नेण्यात अशा स्किल सेंटर्सची महत्त्वाची भूमिका आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. आज एखाद्या व्यक्तीने किती डिग्र्या घेतल्या आहेत, हे महत्त्वाचे नाही; तर त्याच्याकडे कोणते कौशल्य आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आज एम्प्लॉयबिलिटी ही केवळ डिग्रीच्या आधारावर मिळत नाही, तर ती कौशल्याच्या आधारावर मिळते. म्हणूनच राज्यात स्वतंत्र कौशल्य विकास विभाग स्थापन करून शासन, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर स्किलिंगचे काम सुरू असून, उद्योगांच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

आरोग्य क्षेत्रातही शासन, खासगी संस्था आणि गृहआरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. योग्य कौशल्य आणि प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असून, या क्षेत्रात प्रशिक्षित व्यक्ती बेरोजगार राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रात सौरऊर्जेची मोठी इकोसिस्टीम उभी करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र ॲग्री सोलर कंपनी स्थापन करून 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा जाळे विकसित करण्यात आले असून, कृषी वीज सौरऊर्जेद्वारे पुरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील 2000 सोलर फीडर्सच्या दैनंदिन देखभालीसाठी किमान 50,000 प्रशिक्षित सोलर तंत्रज्ञांची आवश्यकता असून, त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ईव्ही आणि अल्टरनेट फ्युएल क्षेत्रात देशात मोठी क्रांती घडत असून, 2017-18 मध्ये 2030 पर्यंत 50% मोबिलिटी ईव्ही किंवा अल्टरनेट फ्युएलवर येईल, ही संकल्पना अशक्य वाटत होती. मात्र, आज टू-व्हीलर क्षेत्रातील जवळपास 50% नोंदणी ईव्हीची होत आहे. सीएनजी, सीबीजी, इथेनॉल आणि फ्लेक्स इंजिनसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे वाहतूक क्षेत्रात मोठी इकोसिस्टीम निर्माण होत असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. बजाज आणि टाटा यांच्या माध्यमातून सुरू असलेले स्किल डेव्हलपमेंट सेंटर या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून, महाराष्ट्र शासनानेही टाटा समूहासोबत भागीदारी करून अधिकाधिक युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. राज्यात रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून बेसिक स्किल्सपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटमसारख्या प्रगत तंत्रज्ञानातील कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात स्मार्ट इंडस्ट्री आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगला मोठे महत्त्व असल्याने स्किल अपग्रेडेशन अत्यावश्यक असून, बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांना वेळोवेळी कौशल्यवृद्धीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर अशा अधिकाधिक स्किल सेंटर्स उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर येथे भवानी माता, अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसरात स्किल युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. शासनाने त्यास मान्यता दिली असून, एआयडीच्या माध्यमातून जागेची मागणी करण्यात आली आहे. पुढील एका महिन्यात जागेचा निर्णय घेऊन ती उपलब्ध करून दिली जाईल. ही स्टेट-ऑफ-द-आर्ट स्किल युनिव्हर्सिटी सेंट्रल इंडियासाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र ठरेल. येथे 11 विशेष स्कूल्स सुरू करण्यात येतील आणि 11 अग्रगण्य कॉर्पोरेट्स व संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांच्या सहकार्याने प्रत्येक विद्यार्थी रोजगारक्षम होईल व प्लेसमेंटसह बाहेर पडेल. मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्वोत्तम स्किल युनिव्हर्सिटी विक्रमी वेळेत उभारण्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर आणि विदर्भात सोलर मॉड्युल, ईव्ही, कोल गॅसिफिकेशन आणि भविष्यातील कार्बन कॅप्चरसारख्या उद्योगांची मोठी इकोसिस्टीम विकसित होत असून, या क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्यसंपन्न मनुष्यबळ तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of the Nagpur Skill Centre at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre…
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of the 'WhatsApp Ticketing Service and Appointment Letter Distribution Ceremony' organised by the Nagpur Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari.
Minister Chandrashekhar Bawankule, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, Nagpur Mayor Nita Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairperson Shivani Dani-Wakhare, Chairman of the Maharashtra State Commission for Safai Karmacharis Shersingh (Satish) Dagor and other dignitaries were present.

A total of 579 candidates received appointment letters. The following beneficiaries were presented with appointment letters on a representative basis:

✅ Ragini Shrirame
✅ Komal Baksare
✅ Rahul Parihar
✅ Kalash Dhananjay
✅ Vitthal Shinde
✅ Aniket Kale
✅ Neha Khirwar
✅ Vikram Rakh

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिका आयोजित 'नियुक्तीपत्र वितरण सोहळा व व्हॉट्सॲप तिकीटिंग सेवे'चे लोकार्पण.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह (सतीश) डागोर व इतर मान्यवर उपस्थित होते.

एकूण 579 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले, त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले लाभार्थी:

✅ रागिणी श्रीरामे
✅ कोमल बक्सरे
✅ राहुल परिहार
✅ कलश धनंजय
✅ विठ्ठल शिंदे
✅ अनिकेत काळे
✅ नेहा खिरवार
✅ विक्रम राख

🕠 5.15pm | 26-7-2026📍Nagpur | संध्या. ५.१५ वा. | २६-७-२०२६📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur