Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.3K photos
17.6K videos
3.72K files
9.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जल यात्रेसंदर्भात बैठक. यावेळी मंत्री गिरीष महाजन…
CMO Maharashtra Tweets:

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जल यात्रेसंदर्भात बैठक पार पडली. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चौंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवी यांच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहेत. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.

25 एप्रिल 2026 रोजी चौंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून या यात्रांचा शुभारंभ होईल, तर, शिर्डीत या यात्रांचा संगम होईल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर व धुळे या मार्गाने इंदूर येथे 29 एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान यात्रेच्या मार्गावरील गावे व शहरांमध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जलदृष्टीचा गौरव

लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण व जलसंवर्धन, शेतीपूरक विकास, स्थानिक रोजगार व कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवी यांचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.

🔸 स्मारक नाणे व टपाल तिकीट प्रकाशन

🔸 महिला सक्षमीकरण, सुशासन व वारसा संवर्धनाशी निगडित उपक्रम

🔸 प्रदर्शने, प्रकाशने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम.

🔸 विविध राज्ये, संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #JalAbhiyan
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis presided over the MoU signing between Government of Maharashtra (Water Resources Dept) and Novarion Energy for the development of the 'Ranavadi off-stream close-loop Pumped Storage Project' in Pune and Raigad…
CMO Maharashtra Tweets:

महाराष्ट्रात ऊर्जा क्रांती! 1200 मेगावॅटच्या रानवाडी जलविद्युत प्रकल्पाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र शासन (जलसंपदा विभाग) व नोव्हॅरियन एनर्जी यांच्यात पुणे व रायगड जिल्ह्यात 'रानवाडी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन जलविद्युत प्रकल्प' उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या (पीएसपी) माध्यमातून सुमारे एक लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र हे पीएसपीच्या माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल असे प्रतिपादन केले.

विविध करारांद्वारे आत्तापर्यंत राज्यात एकूण 78,218 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार असून यासाठी ₹4,22,461 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1,27,000 रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. विशेषतः अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.

राज्य शासनाने आत्तापर्यंत ऊर्जा निर्मितीसाठी विविध कंपन्यांसोबत ऊर्जा क्षेत्रात 55 सामंजस्य केले आहेत. या करारांमध्ये टाटा पॉवर कंपनी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी ग्रीन एनर्जी, टोरंट पॉवर लिमिटेड यासह विविध उद्योग समूहांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये

उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील 56 वा सामंजस्य करार

या प्रकल्पाद्वारे 1200 मेगावॅट वीजनिर्मिती

या प्रकल्पासाठी सुमारे ₹5760 कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे 1500 रोजगारनिर्मिती

या कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी ता. महाड जि. रायगड येथे प्रकल्प उभारणी होणार

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #PumpedStorageProject #Raigad
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Energising Growth: Transforming Maharashtra’s Power Landscape

Presided over the MoU signing between Government of Maharashtra (Water Resources Dept) and Novarion Energy for the development of the 'Ranavadi off-stream close-loop Pumped Storage Project' in Pune and Raigad districts.

This is the 56th MoU in the Pumped Storage sector. The project will generate 1200 MW of power, with an estimated investment of around ₹5760 crore and the potential to create approximately 1500 jobs. Significant efforts are underway to substantially enhance the state’s power generation capacity, with a strong focus on creating nearly 1 lakh MW of energy through Pumped Storage Projects. With this push, Maharashtra is poised to emerge as the state with the highest energy generation capacity through Pumped Storage Projects (PSP), strengthening long-term energy security and sustainability.

Through multiple MoUs, the state is set to add a total power generation capacity of 78,218 MW, attracting investments of approximately ₹4,22,461 crore and generating around 1,27,000 employment opportunities. With a strong emphasis on renewable energy projects, Maharashtra is steadily progressing towards energy self-reliance, driving industrial growth while promoting environmentally sustainable and future-ready power generation.

Minister Girish Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji and other dignitaries were present.

#Maharashtra #PumpedStorageProject #Raigad

https://x.com/Dev_Fadnavis/status/2043755738775114027?s=20
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 13 एप्रिल 2026

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197489/

गोदा ते नर्मदा या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026' उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197485/

मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/197430/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to the architect of the Indian Constitution, an extraordinary scholar, visionary economist and a towering champion of social justice, Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on his Birth Anniversary!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसाधक, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Salutations to Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar, the great economist and a guiding force behind the democratic ideals of justice, liberty, equality and fraternity, on his Birth Anniversary!
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim #Maharashtra
CMO Maharashtra Tweets:

जगातील सर्वोत्कृष्ट संविधान भारताला प्रदान करणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
CMO Maharashtra Tweets:

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन!

🌸 Hon Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar on his birth anniversary at ChaityaBhoomi, Dadar, today.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Sanjay Shirsat, Minister Chhagan Bhujbal, Mumbai Mayor Ritu Tawde, and other dignitaries were present.

🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज चैत्यभूमि, दादर में महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर उनके पुतले पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबल, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕤 9.35am | 14-4-2026📍Dadar, Mumbai | स. ९.३५ वा. | १४-४-२०२६📍दादर, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
CMO Maharashtra Tweets:

मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti