Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.3K photos
17.6K videos
3.72K files
9.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari chaired a review meeting regarding development works of Nagpur city.

Minister Chandrashekhar Bawankule, MP Maya Ivnate, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, Nagpur Mayor Neeta Thakre and GoM, NMC senior officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहराच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे व शासन आणि नागपूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी अध्यक्षता में नागपुर शहर के विकास कार्यों के संदर्भ में समीक्षा बैठक।

इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, सांसद माया इवनाते, विधायक कृष्णा खोपडे, विधायक मोहन मते, नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं नागपूर मनपा के संबंधित अधिकारी उपस्थित थे।

12-4-2026📍 Nagpur | वा. | १२-४-२०२६📍 नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत.
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)

#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis welcomed the first-ever coal railway rake from MAHAGENCO’s Gare Palma Sector-2 coal mine in Chhattisgarh, arriving at the Koradi Thermal Power Station. This historic moment marks a decisive step in strengthening Maharashtra’s energy security and developing Vidarbha as a powerhouse of the state.
Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगड येथील महानिर्मितीच्या मालकीची गारे पालमा सेक्टर- 2 कोळसा खाण येथून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे स्वागत केले. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि विदर्भाला राज्याचे ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने छत्तीसगढ़ के महानिर्मिती के स्वामित्व वाली गारे-पालमा सेक्टर-2 कोयला खदान से कोराडी थर्मल पावर स्टेशन तक आने वाली पहली कोयला रेल रेक का स्वागत किया। यह ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र की ऊर्जा सुरक्षा को सुदृढ़ करने और विदर्भ को राज्य की ऊर्जा शक्ति के रूप में विकसित करने की दिशा में एक निर्णायक कदम है।
इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

12-4-2026📍Koradi, Nagpur | १२-४-२०२६📍कोराडी, नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #MAHAGENCO #ThermalPower
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari chaired a review meeting regarding development works of Nagpur city. Minister Chandrashekhar Bawankule, MP Maya Ivnate, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, Nagpur Mayor Neeta…
CMO Maharashtra Tweets:

नागपूरच्या आधुनिक व शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे नागपूर शहराच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी महानगर पालिका, एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नागपूर महानगरपालिकेअंतर्गत 1 लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट, फूड मॉल व हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा केली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यासाठी 'एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली'चा आधार घ्यावा व आवश्यक बदल करावे अशा सूचनाही दिल्या.

नागपूर शहराचा विकास करताना येथील शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या, पानमसाल्याची दुकाने तातडीने हटवावी, मुख्य रस्त्याच्या शेजारी करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढावे आणि महामार्गावरील बेकायदेशीर व्यवसाय बंद करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.

सक्करदरा बाजार, सोख्ता भवन बुधवार बाजार आणि 5व्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची शहरातील कामे पूर्ण करताना आधी समस्या पुढे ठेवून त्या सोडविण्याच्या दिशेने कार्य करण्या बाबत यावेळी निर्देश देण्यात आले. 5व्या टप्प्या अंतर्गत शहरातील 9 झोनमध्ये 89 की.मी.चे 135 रस्ते प्रस्तावित आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याविषयी झालेल्या चर्चेत पाणी गळती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत राज्यातील अन्य शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आदर्श पद्धतींचा अभ्यास करून त्या आधारे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डीग दवाखाना यांचा पुनर्विकास करताना घ्यावयाच्या काळजी बाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

दाभा येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरच्या स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच विभागीय क्रीडा संकुला बाबत सौर ऊर्जेचा वापर करणे, वेळोवेळी कामाची गुणवत्ता तपासणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, प्रशासकीय इमारत, क्रीडांगण उभारणे आदी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली व काही मागण्या सादर करण्यात आल्या.

यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्प, नाग व पोहरा नदी प्रकल्पांची प्रगती, वाढत्या लोकसंख्येसाठी भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाळी नाले व सांड पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली. काचीपुरा कृषी महाविद्यालय परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.

या बैठकीत शहरातील विकास कामाशी संबंधित महानगर पालिका, महाराष्ट्र -राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. नागपूर (मिहान), क्रीडा विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis welcomed the first-ever coal railway rake from MAHAGENCO’s Gare Palma Sector-2 coal mine in Chhattisgarh, arriving at the Koradi Thermal Power Station. This historic moment marks a decisive step in strengthening…
CMO Maharashtra Tweets:

ऊर्जा सुरक्षिततेकडे महाराष्ट्राची वाटचाल, गारे पालमा कोळसा प्रकल्प देणार विकासाला नवे बळ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगड येथील महानिर्मितीच्या मालकीची गारे पालमा सेक्टर- 2 कोळसा खाण येथून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे स्वागत केले. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि विदर्भाला राज्याचे ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी केली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गारे पालमा या कोळसा खाणीतून अत्यंत उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होत असल्याने ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे आणि ऊर्जा निर्मितीसाठी आधीपेक्षा कमी कोळसा लागणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासोबत विजेचे दर कमी होण्यास मदत होईल. राज्यातील लोडशेडिंग कमी होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सुलभ होईल, तसेच भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होईल व या खाणीमुळे पुढील 77 वर्ष उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या कोळसा खाणीतून कोराडी, चंद्रपूर आणि परळी येथे दीर्घकालीन कोळसा पुरवठा होणार आहे. महाऊर्जाला उपलब्ध झालेल्या या खाणीमुळे कोळशाच्या गुणवत्तेवर नियंत्रण राखता येणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणार आहे. यामुळे भविष्यातील वीज तुटवड्याचा धोका कमी होणार असून दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MAHAGENCO #ThermalPower