Devendra Fadnavis
4.21K subscribers
95.2K photos
17.8K videos
3.78K files
9.66K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
#Pune
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक येथे 'सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी एकूण ₹5657.89 कोटींच्या 44 विकास प्रकल्पांचे भूमिपूजन!

#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhaMela
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the Bhoomipujan Ceremony of various development projects for 'Simhastha Kumbh Mela 2027' DCM Eknath Shinde, Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Adv Manikrao Kokate and other dignitaries…
CMO Maharashtra Tweets:

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक होत आहे सज्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यावेळेचा कुंभ विशेष आहे, 75 वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आला आहे. हे कुंभपर्व 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत चालणार आहे. पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ₹25,000 कोटींची कामे करावी लागणार असून यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू दिली जाणार नाही. स्वच्छ आणि निर्मळ गोदावरीसाठी सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार केला जात आहे. यासोबतच चांगले घाट, मंदिरांचे पारंपरिक दृष्य न बदलता जीर्णोद्धार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

नाशिकमध्ये केलेली कामे पुढची 25 वर्ष नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत असे नियोजन आम्ही केले आहे. तसेच जास्त भाविक येणार असल्याने आऊटर(बाह्य) रिंगरोड तयार करत आहोत. या मार्फत नाशिकला मोठी कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. सगळी कामे पारदर्शी पद्धतीने होतील असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आज उदघाटन करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीबद्दल मुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, राज्यातील सर्वात मोठी इमारत नाशिकला प्राप्त झाली आहे. या इमारतीच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम होईल.

या सर्व कामांना प्रभू श्रीराम यांनी बळ द्यावे, साधू महंतांनी मार्गदर्शन करावे, सर्वांचे आशीर्वाद पाठीशी रहावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhaMela
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Simhastha Kumbh Mela 2027: A New Era of Spiritual Infrastructure

Blessed to perform the bhoomipujan of various development projects for 'Simhastha Kumbh Mela 2027' in Nashik today. This time’s Kumbh holds a special significance, as the Trikhand Yog cosmic alignment has arrived after 75 years. This Yog will last from 31st October 2026 to 24th July 2028.

The Prayagraj Kumbh held this year under the leadership of Hon PM Narendra Modi Ji showcased a strong cultural reawakening across the country. In the same spiritual tradition, the Nashik–Trimbakeshwar Kumbh will attract a vast number of devotees. Nashik is the sacred land where Prabhu Shri Ram, Mata Sita, and Lakshman Bhagwan lived, where Anjaneri stands, and where Jyotirlinga Trimbakeshwar is the origin point of the Godavari. Planning is in progress to develop Nashik both as a pilgrimage and tourism destination.

This year, after the grand Prayagraj Kumbh, Nashik is expected to witness almost five times more footfall, creating an enormous responsibility for management, safety, and seamless coordination. To enhance connectivity in the area, both the Central Government and the State Government will work on developmental projects worth approximately ₹25,000 crore. All infrastructural work will be carried out transparently with the cooperation of all stakeholders.

Also inaugurated the new administrative building of Nashik Zilla Parishad, which is the largest Zilla Parishad building in the state. This will further support our efforts to aid the common people.

May Prabhu Shri Ram bless our efforts and lead this Kumbh to great success, and may the Sadhus-Mahants guide us and bestow their divine blessings.

DCM Eknath Shinde ji, Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Adv Manikrao Kokate were present.

#Maharashtra #KumbhaMela #Nashik

https://x.com/Dev_Fadnavis/status/1988991883066867776?s=20
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

त्रिखंड योगामुळे अनेक भाविकांना घडणार अमृत स्नान.
त्रिखंड योग के कारण अनेक भक्तों को अमृत स्नान का अवसर प्राप्त होगा।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराजमध्ये घडला जगातील सगळ्यात मोठा आस्थेचा महाकुंभ.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में प्रयागराज में दुनिया का सबसे बड़ा आस्था का महाकुंभ आयोजित हुआ।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

2015 पेक्षा किमान 5 पट अधिक भाविक त्र्यंबकेश्वरच्या या कुंभाला येतील आणि त्याचे नियोजन करण्यास आम्ही तयार आहोत.
2015 की तुलना में कम से कम 5 गुना अधिक श्रद्धालु इस त्र्यंबकेश्वर कुंभ में आएंगे और उसके नियोजन के लिए हम पूरी तरह तैयार हैं।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'कुंभ' हे असे पर्व आहे, जे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे नाव जगात पोहोचवते.
'कुंभ' ऐसा पर्व है, जो नासिक और त्र्यंबकेश्वर का नाम पूरी दुनिया में पहुँचाता है।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नाशिक नगरी ही अशी नगरी आहे, जिथे प्रभू श्रीराम आणि सीतामाईंचे सर्वाधिक वास्तव्य...
नासिक नगरी ऐसी नगरी है, जहाँ प्रभु श्रीराम और माता सीता का सबसे अधिक निवास रहा था।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषदेची इमारत लोकाभिमुख बनेल हा विश्वास आहे.
राज्य की सबसे बड़ी जिला परिषद की इमारत जनहितैषी बनेगी, ऐसा विश्वास है।

('सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विकास कामांचे भूमिपूजन | नाशिक | 13-11-2025)
#Maharashtra #Nashik #kumbhmela