चालू घडामोडी 2025
77.9K subscribers
14.8K photos
111 videos
2.12K files
7.77K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
😢 निशब्द...😢

#Phalgam Attack
Photo from Deva Jadhavar
Photo from Deva Jadhavar
बिरदेव ची चित्तर कथा

नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास.
जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.
भग्न सप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही.!
मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही.!
त्याला भविष्याच्या गरुडपंखांच वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं....
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागणं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे.

मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं...!!❤️

-अमृतवेल (वि. स. खांडेकर)

जागतीक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे मोठे निर्णय...

📌 पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत सिंधू जल कराराला स्थगिती.
📌 वाघा - अटारी चेक पोस्ट बंद होणार. वैध कागदपत्रांसह सीमेपार गेलेल्यांना 1 मेपूर्वी तिथून परत येता येईल.
📌 पाकिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा मिळणार नाही.
📌 भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांत भारत सोडून जावं.
सिंधू पाणी करार :

▪️19 सप्टेंबर 1960 रोजी करारावर स्वाक्षरी
▪️पंतप्रधान पंडित नेहरू व आयुब खान यांच्या करारावर सह्या.
▪️कराराच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक स्थायी सिंधू आयोग स्थापन करण्यात आला.
▪️6 नद्यांवर सिंधू पाणी करार झाला.
▪️पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारताला मिळते.
▪️सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिम नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळते.
▪️80 टक्के पाणी पाकिस्तानात जाते.
▪️20 टक्के पाणी भारताला मिळते.
🏆 Meet UPSC Topper Adiba Anam (AIR 142 | IAS) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over

🎙️Join us for a powerful session with UPSC CSE 2024 Topper Adiba Anam (AIR 142 | IAS), as she shares her journey, strategies, and motivation with all future aspirants.

🧮 Adiba, a student of The Unique Academy’s UPSC 3 Years & 1 Year Integrated Batch, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🏷️ This Sunday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Date : Sunday, 27th April 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Symbiosis Vishwabhavan, Symbiosis College, Opp. Balbharti, Senapati Bapat Road, Chh. Shivajinagar, Pune - 411016

📍 https://g.co/kgs/gDAPsNH

📞 Contact - 8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.

#UniqueToppersTalk #AdibaAnam #AIR142 #UPSC2024 #UPSC #UniqueToppersTalk #TheUniqueAcademy #UPSCMotivation #TopperTalk #IASJourney #UPSCRankers #IAS2024 #StudyWithUnique #CivilServicesExam #UniqueSuccess #ToppersTalkPune #BestUPSCInstitute #UPSCMarathi #UPSCPreparation #LiveSession #MentorMotivation #TopperSeminar