एक दिवस विद्यार्थ्यांसाठी
680 subscribers
1.64K photos
10 videos
174 files
151 links
Download Telegram
🌌🎇पी. व्ही. सिंधू - - BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय🎇🌌

🏆 बासेल (स्वीत्झर्लंड) येथे भारताच्या पी. व्ही. सिंधू ह्या बॅडमिंटनपटूने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

👉 या विजयासह, 24 वर्षीय पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय ठरली आहे.

👉 25 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात सिंधूने जापानच्या नोझोमी ओकुहाराचा एकतर्फी धुव्वा उडवला.

👉 तसेच या स्पर्धेत तिने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकासह एकूण पाच पदकांची कमाई करताना चीनची बॅडमिंटनपटू झांग नींग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

👉 ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे अन्य विजेते -

👉 भारताच्या बी. साई प्रणीत ह्याने पुरुष एकेरी गटात कास्यपदक जिंकले.

👉 बी. साई प्रणीत गेल्या 36 वर्षांत जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.

👉 पुरुष एकेरी गटाचा विजेता - केंटा मोमोटा (जापान)

✍🏻 पुरुष दुहेरी (सुवर्ण) - मोहम्मद अहसान व हेंद्रा सेतीवन (इंडोनेशियाची जोडी)

✍🏻 महिला दुहेरी (सुवर्ण) - मायू मत्सुमोटो आणि वाकाना नागाहारा (जापानी जोडी)

✍🏻 मिश्र दुहेरी (सुवर्ण) - झेंग सिवेई आणि हुआंग याकियांग (चिनी जोडी)
📚 Chandrayaan-2 आता चंद्रापासून फक्त एक टप्पा दूर; ISRO चं आणखी एक मोठं यश



🔺 चांद्रयान मोहिमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वी झाला. आता ऐतिहासिक यशापासून भारत फक्त 7 दिवस आणि शंभर किलोमीटर दूर आहे.


◾️बेंगळुरू, 30 ऑगस्ट : चांद्रयान मोहिमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वी झाला. चांद्रयान 2 चंद्राच्या आणखी जवळ जाऊन पोहोचलं आहे. ISRO ने या यशाची माहिती त्यांच्या Twitter हँडलवरून दिली. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी कक्षा बदलली. भारताच्या अंतराळ मोहिमेतलं महत्त्वाकांक्षी चांद्रयान2 ठरल्याप्रमाणे चौथ्या कक्षेत पोहोचलं आहे. आता शेवटची कक्षा बाकी आहे. चंद्रापासून भारताचं हे यान आता फक्त 100 किलोमीटर येईल. येत्या 7 सप्टेंबरला ऑरबिटपासून वेगळं होत चंद्राच्या भूमीवर यान उतरणार आहे. आतापर्यंतचा चांद्रयान 2 चा प्रवास अपेक्षेप्रमाणे झाला आहे. आता ऐतिहासिक यशापासून भारत फक्त 7 दिवस आणि शंभर किलोमीटर दूर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ISRO ने चांद्रयान 2 मोहिमेच्या ताज्या अपडेट्सविषयी माहिती दिली आहे.

🔻 चार महत्त्वाचे टप्पे


चांद्रयान 2 आणखी 4 टप्पे आणि कक्षा पार करायच्या आहेत. इस्रोच्या मते चांद्रयान 2 ची दिशा वेग वेगळ्या दिवशी बदलली जाईल. नियोजित तारखेनुसार 21, 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 ची दिशा बदलली जाईल. त्यानंतर चांद्रयान 2 चंद्रापासून केवळ 100 किलो मीटरवर असेल. 7 सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल.
ते 15 मिनिट असतील कळीचे
चांद्रयान 2 मोहिमेतील लँडिंगच्या वेळी 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चंद्राच्या भूमीपासून 30 किलो मीटर अंतरावर लँडिंगच्या आधी चांद्रयान 2चा वेग अंत्यत कमी केला जाईल. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत जर यशस्वी ठरला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा देश ठरेल. अशी कामगिरी आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केली आहे.

चांद्रयान 2चा संपूर्ण प्रवास; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल ISROला सॅल्यूट!
चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर 6 चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे.


🇮🇳चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये


1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.
भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल असतील.सी. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती, त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला.

भगत सिंह कोश्यारी
● भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेतबागड गावात झाला. झाला.
● उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे.
● उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
● 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला.
● 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
● 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते.
● भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
● त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
● 1975 मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.

◆ महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवीन राज्यपाल
● भगत सिंह कोश्यारी : महाराष्ट्र
● कलराज मिश्रा : राजस्थान
● बंडारू दत्तात्रय : हिमाचल प्रदेश
● आरीफ मोहम्मद खान : केरळ
● तमिलीसाई सौंदराजन : तेलंगणा


कालराज मिश्रा
● कालराज मिश्रा काही काळापूर्वीपर्यंत हिमाचलचे राज्यपाल होते.
● कालराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही आहेत.ते केंद्र आणि यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.
● सन २०१० ते २०१२ पर्यंत ते प्रदेश भाजपाचे प्रभारी होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी होते.
● ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि एकदा देवरियाचे लोकसभेचे सदस्य होते.

बंडारू दत्तात्रेय
● बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त आंध्र प्रदेश युनिटचे अध्यक्ष राहिले आहेत.
● मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कामगार आणि रोजगार मंत्री होते.
● 1965 मध्ये ते आरएसएसमध्ये दाखल झाले. आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगातही गेले होते.

आरिफ खान
● आरीफ खान दोनदा कॉंग्रेसमध्ये,तसेच जनता पक्ष व बसपाकडून प्रत्येकी एकदा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.
● शाह बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करण्याच्या कायद्याच्या विरोधात राजीव गांधी सरकार ला त्यांनी राजीनामा दिला होता.
● 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2007 मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि राजकारणापासून अलिप्त झाले.
● तिहेरी तालक तसेच कलम 370 वर आरिफ खान यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

तमिलीसाई सौंदराजन
● या व्यवसायाने डॉक्टर आहेत.
● यापूर्वी त्यांनी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
● या नियुक्तीपूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव होत्या.
● त्यांना ‘तमिळनाडूच्या सुषमाजी’ म्हणून ओळखले जाते.
सह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे तर्फे पूरग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणेबाबत.
◼️मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे.


✔️लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

✔️ विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.

✔️तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

✔️तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते.

✔️ 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.
◼️चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा


● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा
शिरीन मॅथ्यू : अमेरिकेत न्यायाधीशपदी भारतीय वंशाची महिला.


● भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित शिरीन मॅथ्यू यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयात न्यायाधीशपदासाठी नियुक्त केले आहे.

● मॅथ्यू या पहिल्या आशियन पॅसिफिक अमेरिकन महिला ठरल्या आहेत.तसेच, त्या अमेरिकेतील एका मोठ्या कायदा फर्म 'जोन्स डे'याच्याशी संलग्न आहे.

● यापूर्वी त्या कॅलिफोर्नियात एका सहायक संघीय वकील होत्या.

● सॅन डिएगोमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणी जिल्हा संघीय न्यायालयात त्यांचे नामांकन बुधवारी व्हाइट हाऊसद्वारे घोषित करण्यात आले.

● आता त्यांच्या नियुक्तीला सिनेटद्वारे अनुमोदन करण्यात आले आहे.

● अमेरिकेतील संघीय न्यायालयात ट्रम्प यांच्या द्वारे घोषित करण्यात आलेल्या नामांकनात मॅथ्यू या सहाव्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित नागरिक ठरल्या आहेत.

● दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) चे अध्यक्ष अनिश यांनी याला ऐतिहासिक नामांकन म्हटले आहे.