https://marathiveda.in/heart-touching-love-poem-in-marathi/
तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे जमेल तितके बोलायचे टाळत जा माझ्याशी प्रेमामध्ये तू पुन्हा पडण्याची दाट शक्यता आहे गडद रात्री आकाशीचा चंद्र पाहिल्यावरती जुन्या रात्री आठवण्याची दाट शक्यता आहे