Maharashtra स्पर्धा परीक्षा व्हिडीओ
428 subscribers
64 photos
2 files
371 links
💐 सब पढेंगे सब बढेंगे

सिर्फ video के जरिए जानकारी

फक्त video द्वारा मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनल
Download Telegram
🛑 महत्वाचे 🛑

प्रती,
मा. सचिव ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,
मुबई.

विषय :- राज्यसेवा २०१९ अनुषंगाने झालेला परीक्षा बैठक व्यवस्थे बाबत...

महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करतो कि, येत्या १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ ही परीक्षा होऊ घातलेली असून आपल्या द्वारे नुकतेच उमेदवारांना परीक्षा प्रवेशप्रत्र अदा करण्यात आले आहे. सदरील प्रवेश पत्रानुसार दिलेल्या परीक्षा बैठक क्रमांकाचे अवलोकन केले असता, सदर बैठक क्रमांक हे उमेदवारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकच्या आधारे देण्यात आल्याचे लक्षात येते. भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे परीक्षा बैठक क्रमांक देण्याची पद्धत मा. आयोगा द्वारे २०१७-२०१८ सालात घेण्यात आलेल्या बऱ्याच परीक्षांच्या करिता अवलंबवण्यात आली होती, असेही लक्षात येते.
सदर बाबीचा गैरफायदा करून घेण्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ करिता अर्ज करण्यापूर्वी जाणिवपूर्वक एका पाठोपाठ येणारे भ्रमणध्वनी क्रमांक खरेदी केले व तेच भ्रमणध्वनी क्रमांक आपल्या प्रोफाईल मध्ये अद्यावत केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वस्तुस्थिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगास भ्रमनध्वनी बद्दलण्या बाबत प्राप्त झालेल्या ई-मेल संदेशावरून लक्षात येऊ शकेल. त्या मुळे मोठ्या प्रमाणत अश्या समुहाने अभ्यास करणाऱ्या (विशेषता खाजगी क्लास च्या उमेदवारांचे) बैठक क्रमांक हे आयोगाच्या प्रचलित बैठक व्यवस्था पद्धती नुसार एकमेकांच्या मागे-पुढे आले आहेत. त्या मुळे सदर विद्यार्थी वर नमूद परीक्षेच्या वेळी “समुहाने कॉपी” करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणत बसू शकतो. आयोगाच्या परीक्षांसाठी असलेली जीव घेणी स्पर्धा लक्षात घेता, ७-८ प्रश्नांची देवघेव झाल्यास विशेषता C-SAT च्या पेपर मध्ये त्याचा परिणाम अंतिम गुणवत्ता यादी वर होण्याची दाट शक्यता आहे. जरी प्रश्न पत्रिकांचे वेगवेगळे चार संच असले तरी, उताऱ्यावरील प्रश्नांचा क्रम व पर्याय बदलत नसल्याने उत्तरांची देवघेव करणे त्या मानाने सोपे आहे, ही बाब मा. आयोगाने लक्षात घ्यावी.
मागील काही वर्षात आयोगाने केलेल्या विविध सुधारणा व उपाययोजनांमुळे, आयोगाने घेतलेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. त्यामुळे जर “मास-कॉपी” (समुहाने कॉपी) सारख्या घटना घडल्या तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होवू शकतील. तरी सदर बाब टाळण्या साठी दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तात्काळ पावले उचलून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होतील या बाबत योग्य ती कार्यवाही करावी.
तरी सदर बैठक व्यवस्थेमुळे होणारे गैर प्रकार टाळण्याकरिता आयोगाने बैठक व्य वस्था निश्चित करण्यासाठी इतर पर्यायी निकषांचा (उदा. आधार क्रमाक, जन्म दिनांक इ.) वापर करावा, ही नम्र विंनती.


आपला विश्वासू
..................................................

वरील संदेश आयोगाला mail करावा
support@mahaonline.gov.in

sec.mpsc@maharashtra.gov.in

मित्रानो हा मेल करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिन लागतील। संभाव्य घोटाळा थांबवण्यासाठी आपण सर्वांनी हा मेल केला पाहिजे हे सर्व आपल्यासाठीच आहे।
Mpsc समन्वय समिती नेहमी विध्यार्थ्याच्या हितासाठीच काम करते त्यामुळे नक्की मेल करा!!

Join us @mpscandolan
Forwarded from Tricks Guru राजेश मेशे सर (Rajesh Meshe)
😃 15 फेब्रुवारी 2019 पासून बाजारात उपलब्ध होत आहे

📚 इतिहास ट्रिक्स बुक 📚

🖌 लेखक : राजेश मेशे सर

😎 बी स्मार्ट पब्लिकेशन 😎

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आपले इतिहास ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध होत आहे
Forwarded from Tricks Guru राजेश मेशे सर (Rajesh Meshe)
👆👆 इतिहास ट्रिक्स बुक मधील काही ट्रिक्स 👆👆

📚 इतिहास ट्रिक्स बुक 📚

🖌 लेखक : राजेश मेशे सर

😎 बी स्मार्ट पब्लिकेशन 😎

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

😃 हसत खेळत अभ्यास करायचा असेल तर इतिहास ट्रिक्स बुक नक्की वाचून पहा 😃

😃 स्वतः वाचा स्वतः अनुभव घ्या 😃
What is your total score in pre exam 2019
anonymous poll

140+ – 114
👍👍👍👍👍👍👍 26%

160+ – 61
👍👍👍👍 14%

170+ – 56
👍👍👍 13%

220+ – 50
👍👍👍 11%

180+ – 47
👍👍👍 11%

150+ – 40
👍👍 9%

200+ – 40
👍👍 9%

190+ – 33
👍👍 7%

👥 441 people voted so far.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चा प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती?

(हा पोल केवळ विद्यार्थी मागणीवरून बनवण्यात आलेला आहे.)
Anonymous Poll
31%
150 व 150 पेक्षा कमी
10%
151 ते 160
9%
161 ते 170
10%
171 ते 180
9%
181 ते 190
8%
191 ते 200
7%
200 ते 210
4%
211 ते 220
3%
221 ते 230
9%
231 व 231 पेक्षा जास्त