Umesh Kudale
102K subscribers
2.02K photos
132 videos
398 files
855 links
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..
Download Telegram
महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाची नागरी असनाऱ्या जेजुरी गावाचा मी रहिवासी.
ज्या गावात आपण लहानाचे मोठे होतोत्या गावाने केलेले कौतुक खूप अभिमानाचे आणि ताकद वाढवणारे आहे..

जेजुरी मध्ये उद्या 'जेजुरी भूषण' म्हणून सन्मान होतोय.
माझ्या गावामध्ये होणारा माझा पहिला सन्मान आहे. या वर्षी पासून सुरू झालेल्या जेजुरी भूषण सन्मानासाठी मला पात्र समजल्याबद्दल तमाम जेजुरीकरांचा मी आजन्म आभारी राहीन ..


जय मल्हार 🙏🙏
915👍171🔥84👏81💯33
Departmental PSI ची तयारी करण्यासाठी रयत प्रबोधिनी चा Dedicated Telegram चॅनेल ..

https://t.me/Psidepartmental
👍96💯1
Dept. PSI साठी आता रयत प्रबोधिनी

Dept PSI ची जोरदार तयारी करुन घेण्यासाठी रयत प्रबोधिनी सज्ज आहे..
तज्ञ मार्गदर्शक, अभ्यासक्रमाची खोली, नेमक्या नोट्स, क्लास टेस्ट आणि सगळा अभ्यासक्रम एकाच कोर्समध्ये घेवून तुमच्या यशाचा प्रवास सोपा करूयात..
जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यत नक्की पोहचवा 🙏

(मराठी +इंग्रजी+ GS असा सगळा अभ्यासक्रम या मध्ये कवर होणार आहे.)

https://awtbs.courses.store/395717?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp


कोर्स घेण्यासाठी 🙏🙏
👍5810🔥3
शाहुंच्या_अध्यक्षतेखालील.pdf
600.7 KB
✓ राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली/उपस्थित असणाऱ्या सर्व परिषदा एका ठिकाणी संकलित करून दिलेल्या आहेत.

✓यातील माणगाव आणि मुंबई कामगार परिषद नुकत्याच परीक्षेला येऊन गेलेल्या आहेत. एकदा वाचून घ्या✌️


@umeshkudale
👍7717💯8👏6
✓इतिहासाचा अभ्यास करताना ही पुस्तके नेहमी वाचण्यात आली असतील पण ऐन परीक्षेत प्रश्न आला की confusion होऊन जाते. एकदा पाहून घ्या म्हणजे अडचण येणार नाही.✌️

@umeshkudale
👍19049🔥12💯8
सत्यनिष्ठा
***

भारतातील मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांनी केलेली धर्मांतरे सत्तेच्या जोरावर झाली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्याविषयी अप्रीती होती, असे विनोबांचे मत होते. स्वतः विनोबांना गोऱ्या माणसाचा तिटकारा वाटे. त्यांचा खुद्द ख्रिस्ताविषयीच पूर्वग्रह होता.

एकदा सेवाग्राम आश्रमात अँड्र्यूज नावाच्या गृहस्थांचे व्याख्यान झाले. त्यांच्या मनाच्या निर्मळपणाने विनोबा प्रभावित झाले. भाषण संपल्यावर विनोबांनी, ' माझ्या मनात ख्रिस्ताविषयी पूर्वग्रह होता त्याबद्दल मी तुमची माफी मागतो ', अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केली.

अँड्र्यूज थक्क झाले. जमनालालजी बजाज यांना ते म्हणाले, ' गांधींनी मला या माणसाबद्दल पूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे हा मोठा विलक्षण आहे. याच्या मनात काय होते हे मला कसे कळणार ? तरीही माझी माफी मागितली. ' यावर जमनालालजी उत्तरले, ' माणूस सत्यनिष्ठ आहे. मनाचा काना-कोपरा स्वच्छ असावा यासाठी तो धडपडणारच. माझ्यासाठी हे सत्यनिष्ठेचे उदाहरण झाले. '

याच विनोबांनी पुढे ' ख्रिस्तधर्मसार ' लिहिले.' नवा करार ', संस्कृत सूत्रांमधे गुंफला. आधार म्हणून स्कोफिल्डची प्रत घेतली. तयार झालेला ग्रंथ त्यावेळच्या पोपकडे पाठवला. त्यांची प्रशस्ती मिळवली. हे धर्मसार, प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यात समन्वय साधणारे आहे ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही.

त्यांनी ख्रिस्ताविषयी अतीव श्रद्धा बाळगली. प्रभू येशूत तुकोबा पाहिले. ख्रिस्ती बांधवांनीही त्यांच्यावर प्रेम केले. भूदानयज्ञाकडे प्रेषिताचे कार्य म्हणून पाहिले.

अनादर ते धर्मसाधना असा या सत्यनिष्ठेचा प्रवास होता.

अतुलजी सुलाखे🙏🙏

विनोबांची माहितीदेणारा एक माहितीपट नक्की पहा..
(अधिक च्या माहितीसाठी चॕनेलवर विनोबा भावे सर्च करा)


https://youtu.be/zEo8P9bNqh8
👍9621💯2
Departmental PSI ची तयारी करण्यासाठी रयत प्रबोधिनी चा Dedicated Telegram चॅनेल ..

https://t.me/Psidepartmental
👍40👌43
Clerk Typist : 95547 उमेदवार देणार परीक्षा ✌️
👍166🔥3629👏12
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे😍😍
530👍76🔥60💯25👏13
D.PSI HIS ANA.pdf
365.5 KB
#History Questions Analysis

2017 आणि 2021 च्या D.PSI पूर्व परीक्षेमध्ये कोण कोणत्या टॉपिक वर आयोगाने focus केला आहे, एकदा पाहून घ्या लवकरच Analysis घेऊ ह्यावर. ✌️

आपले मित्र कोणी तयारी d.psi ची तयारी करत असतील त्यांना सुद्धा पाठवा😊

धन्यवाद🙏

@psidepartmental
👍8113🔥5
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व cut off विश्लेषण ✌️

@umeshkudale / @rayatnotes
👍11426🔥11
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.

@umeshkudale
👍90🔥1413👏11
2022 आणि 2023 ची मुख्यपारिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना पुढील मुद्द्यांकडे जरा जास्तीचे लक्ष दिले पाहिजे .👆

तुमच्याकडे save करून ठेवा😊

@umeshkudale
👍16844🔥11💯7👏3
महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा निकाल विश्लेषण✌️

@umeshkudale / @rayatnotes
👍74💯15👏5
आम्ही तुम्हाला शब्द दिला आहे त्यानुसार गट ब' व गट 'क' ची तयारी करताय तर ' फक्त 1 रुपया' मध्ये सुतार सर मराठीची ' Revision ' करून घेणार आहे....

खाली link दिली आहे कोर्स ची... भेटूयात आपण...

आत्ता थांबायचं नाही...👍🏻



https://awtbs.courses.store/398116?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍9112👏10🔥6
👍9162👏22🔥3
चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराचे वृत्तपत्रे हे एक अत्यंत महत्वाचे माध्यम असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी आपल्या चळवळीच्या प्रारंभापासूनच वृत्तपत्रे सुरू केली होती. त्यांनी सर्वप्रथम 'मूकनायक' हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० पासून सुरू केले होते. या पाक्षिकास कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी देणगी दिली होती.

'जनता' हे वृत्तपत्र २४ नोव्हेंबर १९३० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. सुरुवातीला 'जनता' हे वृत्तपत्र पाक्षिक होते. परंतु दुसऱ्या वर्षापासून या पाक्षिकाचे साप्ताहिक मध्ये रुपांतर करण्यात आले. 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', आणि 'समता' ही वृत्तपत्रे लवकरच बंद पडली. परंतु 'जनता' हे वृत्तपत्र मात्र दीर्घकाळ पर्यंत चालले. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे सर्वात दीर्घकाळ चाललेले वृत्तपत्र म्हणजे 'जनता' होय ! 'जनता' वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर सर्वात वरती 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर एम.ए., पीएच.डी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, यांच्या नेतृत्वाखाली निघणारे जनहित प्रवर्तक साप्ताहिक पत्र' असे लिहिलेले असायचे.

'जनता' या वृत्तपत्रात १९३० पासून तर १९५६ पर्यंतच्या सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचा दस्तऐवज आहे. या वृत्तपत्रातून बाबासाहेबांच्या चळवळीचा इतिहास कळतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी स्वातंत्र्याच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी 'जनता' वृत्तपत्र हे एक महत्वाचे आणि विश्वसनीय माध्यम आहे.

Credit - अरुण शिंदे (Facebook)

@umeshkudale
👍20752👏15🔥8💯6
मराठवाडा मुक्ती गाथा.pdf
485.7 KB
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जसा त्यागाचा, बलिदानाचा भला मोठा इतिहास आहे , तसाच आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाला खूप मोठा इतिहास आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अभ्यास करताना

✓सांस्कृतिक आणि साहित्य चळवळीचा इतिहास.
✓स्टेट काँग्रेसचे योगदान
✓आर्य समाजाचे कार्य
✓संग्रामातील पाहिले हुतात्मा वेदप्रकाश
✓डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामाला पाठिंबा
✓वंदे मातरम् चळवळ (IMP for exam)
✓रझाकार
✓लोकसहभाग व स्वातंत्र्य चळवळ
✓गोविंदराव पानसरे - स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा

अश्या अनेक प्रश्नांची उकल ह्या pdf मध्ये केलेली आहे. आज मुक्ती संग्राम दिन नवीन काही तरी वाचायला मिळेल.

वेळ काढून वाचा आणि तुमच्याकडे save करून ठेवा pdf परीक्षेसाठी महत्त्वाची आहे.😊

@umeshkudale
👍11656🔥8👏5
वरचा प्रश्न गट क मुख्य 2021 च्या परीक्षेला आलेला , ह्याचा reference आपल्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लीहलेल्या महात्मा फुलेंच्या चरित्रात सापडतो. मुख्य परीक्षेला प्रश्नांची depth खूप वाढलेली आहे.

@umeshkudale
🔥216👍11632💯20👏9