स्वतः मधील उद्योजकाला जागे करा
593 subscribers
688 photos
97 videos
80 files
686 links
मराठी लोकांनी व्‍यवसायात पुढे यावे व प्रत्‍येक क्षेञात आपला उद्योग चालु करावा... पुढील काळात व्‍यवसाय हा मराठी लोकांनीच करावा असे संबोधले गेले पाहिजे.. स्‍वतः मधील उद्योजकाला जागे करण्‍यासाठी मराठी प्रेरणादायी विचार, उद्योग विषयक माहिती साठी हे चॅनल आहे.
Download Telegram
*_अमेरिकन उद्योगपती आणि स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना करणारे तेलसम्राट जॉन डी. रॉकफेलर यांचा जन्मदिन..._*
-----------------------------------
जॉन डेव्हिसन रॉकफेलर हे अमेरिकेतील स्टँडर्ड ऑइल कंपनी या प्रचंड मोठ्या तेल उद्योगाचे प्रमुख होते. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते गणले जात. त्यांची त्याकाळातील मालमत्ता सुमारे १५००० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड होती. त्याकाळातील ते सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. फक्त अमेरिकेलाच नव्हे तर सर्व जगाची बाजारपेठ स्टँडर्ड ऑइल कंपनीने काबीज केली होती.
जॉन डीचा स्पर्धेवर मुळीच विश्वास नव्हता. म्हणूनच तर त्यांनी भल्याबुर्‍या मार्गाने का होईना अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांना गिळंकृत करून मोठी मक्तेदारी निर्माण केली होती. खरं तर त्यांचे बालपणच या गोष्टीला जबाबदार होते. त्यांचे वडीलच त्यांना फसवीत. लहान मोठ्या कारणंमुळे रॉकफेलरला बडवीत. अनेक बोगस योजना काढून फसवीत. यामुळे त्यांची मुले व्यवहारी होऊन चांगले आयुष्य जगायला शिकतील ही त्यांची भावना होती. जेव्हा रॉकफेलरने त्याच्या वडीलांकडून पैसे मागितले तेव्हा वडीलांनी पैसे दिले पण तेही चक्क १०% व्याजावर. शिवाय मुदतीपेक्षा खूपच लवकर अचानकपणे परतही मागितले. यामुळे मात्र रॉकफेलरने काहीतरी करून दाखवायचा मनाशी निर्णय घेतला होता.

त्यावेळी अमेरिकेत क्रूड ऑईल सापडत होते. १८६० साली नवे साठे सापडले. आधी ५० विहिरी खोदल्या मग त्यांची संख्या १०० झाली. पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने तेलाच्या किंमती घसरल्या. पण फक्त क्रुड ऑईल घेऊन काय करणार? त्याला रिफाईन तर केलं पाहिजे, मगच त्याचा उपयोग. रॉकफेलरला क्रूड ऑईल उपसण्यात अजिबात रस नव्हता. पण त्याचे लक्ष होते रीफ़ाईनिंगवर. पण इतर लोकांप्रमाणे लहान रिफायनरी काढली तर इतर लोकांप्रमाणेच तोट्यात जाईल, हे त्याला माहीत होते. त्यामुळे जर इतर स्पर्धकांना खाऊन टाकून स्वतःची मोठी कंपनी बनवली तरच काही करता येईल हे “इकॉनॉमी ऑफ स्केल”चं तत्व त्याला पक्के माहीत होते.

रॉकफेलर आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कसा खाऊन टाकायचा याचे एक उत्तम उदाहरण आहे. १८६३ साली त्याने काही भागीदार मिळून एक कंपनी स्थापन केली. त्यात क्लार्क बंधू होते, पण काही काळाने रॉकफेलर आणि क्लार्क बंधूंचे खटके उडू लागले आणि परीणामी कंपनी विकायची ठरले. पहिली बोली क्लार्क बंधूंनी लावली ५०० डॉलर्स, त्यावर रॉकफेलरने त्याची बोली लावली १००० डॉलर्स. क्लार्क बंधूंनी ती पुढे २००० डॉलर्स केली, असे करता करता रॉकफेलरची बोली ७०००० डॉलर्स पोचली. आता मात्र क्लार्क बंधूंची घाबरगुंडी ऊडाली. त्यांनी कशीबशी शेवटची बोली लावली ७२००० डॉलर्स, यावर क्षणाचाही विलंब न करता रॉकफेलर म्हणाला, “७२५०० डॉलर्स”. विशेष म्हणजे यावेळी रॉकफेलरकडे इतके पैसेही नव्हते. पण त्याने कर्ज काढून ही कंपनी विकत घेतली आणि त्यातून क्लार्क बंधूंची छुट्टी केली.

त्याने हाच सपाटा पुढे चालूच ठेवला. एकेक कंपनी गिळंकृत करत करत आपली कंपनी मोठी करायची हे त्याचे तत्व होते. यासाठी त्याने पैशासाठी अनेक भागिदारही शोधले होते. १० लाख डॉलर्सचं भांडवल उभं करून त्याने “स्टँडर्ड ऑइल कंपनीची” स्थापना केली.उत्पादनाबरोबरच त्याचे बचतीकडेही अगदी बारीक लक्ष असे. याचे उदाहरण म्हणजे एकदा तो त्याच्या कंपनीची पहाणी करण्यासाठी आला होता. रॉकेलचे डबे सील करणार्‍या यंत्राची पहाणी करत होता. अधिकारी त्याला हे यंत्र कसे कार्यक्षम आहे, याची माहिती देत असताना त्याचे लक्ष मात्र वेल्डिंग करणार्‍या एका कामगाराकडे गेले. त्याने त्या कामगाराला विचारले, “तू वेल्डिंग करताना सोल्डरचे किती थेंब वापरतोस?” यावर तो कामगार म्हणाला, “४० थेंब.” रॉकफेलर त्याला म्हणाला, “यापुढे ३८ थेंब वापरून काम करत जा.” मग त्याचे प्रयोग झाले पण ३८ थेंबांत काम काही जमेना, शेवटी ३९ थेंबांत काम करायचे असे ठरले. प्ण आश्चर्य म्हणजे सोल्डरच्या या एका थेंबामुळे कंपनीचे हजारो डॉलर्स वाचू लागले होते. तर हा असा रॉकफेलर...

त्याच्या अशा या भन्नाट कल्पनांमुळे स्टँडर्ड ऑइल कंपनीची क्षमता आणि नफ़ा इतका वाढला की इतर स्पर्धकांचा त्याच्यापुढे टिकाव लागेना. त्यातच एकामागोमाग एक असे अनेक स्पर्धक खाऊन टाकण्याच्या रॉकफेलरच्या कल्पनेमुळे जेवढे होते तेही स्पर्धक जेरीस आले होते. ज्या कंपन्या त्यांच्या पाईपलाईन्स जिथून टाकायच्या, नेमकी तीच शेते हा रॉकफेलर खरेदी करायचा, त्यामुळे त्या कंपन्या आपोआप शरण यायच्या. त्याचा हा सपाटा इतका जबरदस्त होता की १८७२ पर्यंत रॉकफेलरने जवळपास इतर सर्व कंपन्या बाजारातून संपवल्या होत्या.

पुढे रॉकफेलरने त्याच्या कंपनीवर मक्तेदारीचा आरोप होऊ नये म्हणून त्याचा ट्रस्ट बनवला, पण पुढे अमेरिकन सरकारने अंटी-ट्रस्ट कायदा करून स्टँडर्ड ऑइल कंपनीचे तब्बल ३८ तुकडे पाडले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक्सॉन, मोबिल, शेव्हरॉन, अमोको हे स्टँडर्ड ऑइलमधील “तुकडे” आजही शेकडो डॉलर्सची उलाढाल करत आ
हेत. या सर्व कंपन्यांची एकत्रित किंमत काढली तर साधारण ५०००० डॉलर्स भरेल. जगभरात तेलाचं उत्पादन करणार्‍या कंपन्यांपैकी सगळ्यात मोठ्या ७ कंपन्या या “सेव्हन सिस्टर्स” म्हणून ओळखल्या जातात. स्टँडर्ड ऑइलच्या विघटनानंतर त्यातुन तुकडे पडलेल्या ३ कंपन्या त्यात होत्या हे विशेष. पण २००७ साली हे चित्र बदलले. मात्र तोवर या सर्वांचा मुख्य सूत्रधार रॉकफेलर या जगातून जाऊन तब्बल ७० वर्षे उलटली होती.

संदर्भ :- अच्युत गोडबोले
- विनोद शिवाजी गोरे
👌 _बिझनेसच्या भन्नाट आयडिया!_
-----------------------
*गाढवाच्या दुधाचा फायदेशीर व्यवसाय*
-----------------------
आपण आजवर गाय, म्हैस यांच्या दुधाचा व्यवसाय ऐकून होतो. पण गाढवाच्या दुधाचाही व्यवसाय होऊ शकतो याची खूप कमी जणांना माहिती असेल. युरोप खंडात हा व्यवसाय झपाट्याने वाढत असून आज ३०० हून अधिक ‘डाँकीफार्म’ अस्तित्वात आहेत. भारतातही केरळ, बंगलोर, हैदराबाद इत्यादी ठिकाणी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरु आहे.

गाढवाचे दुध नवजात बाळाच्या अॅलर्जीवर गुणकारी औषध आहे. २५ मिली गाढवाचे दुध साधारणपणे २००-३०० रुपयांना मिळते. १ लिटर दुधाचा दर २ ते ३ हजार रुपयांपर्यंत जातो. पृथ्वी तलावरील सर्वात सुंदर स्त्री क्लिओपात्रा होऊन गेली असे म्हणतात. ती इजिप्त संस्कृतीतील राणी होती. असे सांगितले जाते की, क्लिओपात्रा आपली त्वचा सतेज व तरुण राहण्यासाठी गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची. गाढवाच्या दुधात अँटीएजींग गुण आहेत. त्याच्या वापरामुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. गाढवाच्या दुधापासून बनवलेले कॉस्मेटीक्स जगात सर्वात महागडे मानले जातात. १५० ग्रॅमचा साबण ३ हजार रुपयांना आहे. अॅमेझॉन, ईबे, अलिबाबा या ईकॉमर्स साईट्सवर तुम्हाला गाढवाच्या दुधापासून बनवलेले असे अनेक प्रोडक्ट दिसतील. तुम्ही त्याची किंमत पाहा, मग तुमच्या लक्षात येईल की हा किती मोठा व्यवसाय आहे.

अँटीएजींग तसेच त्वचा सतेज राहावी व अनेक रोगातून मुक्तता व्हावी यासाठी गाढवाचे मटण खाल्ले जाते. मटणासाठी गाढवाची आफ्रिकेतील केनिया व इतर देशांत निर्यात केली जाते. तिथून हे मटण जगभर निर्यात होते. केनिया गाढवाचे मटण निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. एका डाँकीफर्ममध्ये २००० हून अधिक गाढवे असतात. केरळमध्ये अनेक हा व्यवसाय सुरु केला आहे. बंगलोर, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी सुद्धा १०-१५ डाँकीफार्म सुरु झाले आहेत. एका गाढवापासून ९०० ते १२०० रुपयांचे दूध रोज निघते. युरोपात गाढवाच्या शेतीसाठी अनेक नव्या प्रजाती शोधून काढल्या गेल्या आहेत. तसेच कॉस्मेटीक्स इंडस्ट्रीत गाढवाच्या दुधाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तुम्हीसुद्धा हा नवीन, अफलातून आणि प्रचंड फायदा मिळवून देणारा डाँकीफार्मिंगचा व्यवसाय करायला हरकत नाही.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करत आहोत, तुम्ही सुद्धा खारीचा वाटा उचला. हा लेख आपल्या मित्रांना, परिचितांना पाठवा.

टीप : या लेखात दिलेले आकडे हे केवळ संदर्भासाठी आहेत. आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक करण्याची क्षमता यावर व्यवसायाची वाढ अवलंबून असते.

- प्रा. प्रकाश भोसले, ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
व्हॉटसअॅप – ९८६७८०६३९९
----------------------------
*_अशाच १०१ कल्पना असलेले 'बिझनेसच्या भन्नाट आयडिया हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक_*

https://imojo.in/BBIH
🚀 _आम्ही स्टार्टअपवाले_
-----------------------------
*स्टार्टअप १४- २६ व्या वर्षी अब्जाधीश बनवणारे स्नॅपचॅट!!*
------------------------------------------
पोरांनो, करा काहीतरी!

गध्देपंचविशीत (म्हणजे २५ वर्षांचे झाल्यावर) लाईफ छान असतं. नोकरी बिकरी असते,अंगात दम असतो आणि जग जिंकण्याची इच्छा असते. पण आपल्यापैकी ९९ टक्के लोक या काळात गुलछबूगिरी करण्यात घालवण्यात.

आता भेटा २६ वर्षांच्या एवन स्पीगल आणि त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे मिरँडा कर. ती एक सुपरमाॅडेल आहे.
पण थांबा, ही स्टोरी तिच्याविषयी नाहीये तर तिच्या बाॅयफ्रेंडविषयी आहे.

२६ वर्षांचा एवन स्पीगल जगातला सर्वात लहान वयाचा अब्जाधीश झालाय. आता यात काय नवल तुम्ही म्हणाल. पण एवन स्पीगल हा ‘स्नॅपचॅट’ या चॅटिंग अॅपचा निर्माता आहे.

भारत ‘व्हाॅट्सअॅप’ची भूमी आहे. ‘टांगा पल्टी संघटने’पासून ते ‘आॅल इंडिया क्रिकेट क्लब आॅफ रामनगर’ पर्यंत सगळ्या ग्रुपमध्ये एकमेकांना खेचणाऱ्यांचं ते अढळ स्थान आहे. चांगल्या गप्पा मारणाऱ्यांसोबतच खरेपणाची शपथ घेत मेसेज फाॅरवर्ड करण्यासाठी ब्लॅकमेल करणाऱ्यांपर्यंत सगळे इथे सापडतात. पण व्हाॅट्सअॅपला आता स्नॅपचॅटचीही स्पर्धा होऊ लागली आहे.

भारतात वीस वर्षांपासून पुढच्या वयोगटातल्यांमध्ये व्हाॅट्सअॅप फेमस असलं तरी टीनएजर्समध्ये स्नॅपचॅट हळूहळू प्रसिध्द असल्याचं समोर येतंय. याच स्नॅपचॅटचा निर्माता आहे एवन स्पीगल.

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी या जगातल्या टाॅप ५ युनिव्हर्सिटीज् पैकी एक असणाऱ्या युनिव्हर्सिटीत शिकणारा एवन एका साॅफ्टवेअर कंपनीत इंटर्नशिप करत होता. स्टॅनफर्डमध्ये त्याची भेट बाॅबी मर्फी याच्याशी झाली आणि या दोघांनी ‘स्नॅपचॅट’ हे अॅप बनवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेमध्ये हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपच्या लोकप्रियतेची दखल फेसबुकलाही घ्यावी लागली आणि २०१३ मध्ये मार्क झकरबर्गने ३ अब्ज डाॅलर्स (सुमारे २१० अब्ज रूपये!) देत ‘स्नॅपचॅट’ विकत घेण्याचा एवनपुढे प्रस्ताव ठेवला. पण आपली कंपनी यापुढेही वाढण्याची शक्यता असल्याने त्याने हा प्रस्ताव धुडकावला. पुढे फेसबुकने ‘व्हाॅट्सअॅप’ कंपनी ताब्यात घेतली पण स्नॅपचॅटचा पसारा वाढतच गेला.

आता ‘स्नॅपचॅट’चे शेअर्स अमेरिकेतल्या शेअर बाजारात उपलब्ध होणार आहेत. आणि या आयपीओ साठी ‘स्नॅपचॅट’ची व्हॅल्युएशन झालंय ते २० अब्ज डाॅलर्सचं!

एवन आणि मिरँडाने फक्त १२ मिलियन डाॅलर्सचं एक घर विकत घेतलंय. आणि या दोघांचा साखरपुडाही झालाय! २६व्या वर्षी या अब्जाधीश सुपरमाॅडेलशी लग्न करून १ कोटी डाॅलर्सपेक्षा जास्त किमतीचं घर घेतोय !

आतातरी व्हाॅट्सअॅपवर चकाट्या पिटणं सोडा आणि आयुष्यात काहीतरी तीर मारा!

सौजन्य- दैनिक लोकसत्ता
---------------------------
*इतर सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या*
https://naviarthkranti.org
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👩🏻‍🌾👨🏻‍🌾👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍🍳👨🏻‍🍳🕵🏻‍♀🕵🏻

*प्रत्येक उद्योजकाने वाचायलाच हवे असे 'स्मार्ट उद्योजक'*
'स्मार्ट उद्योजक' हे उद्योजकीय मासिक दर महिन्याला प्रकाशित होते. यात उद्योजकांसाठी व भविष्यात उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त विविध लेख असतात.

अर्थात, व्यवसाय सुरू करण्यापासून तो चालविण्या व वाढविण्यापर्यंत लागणारे सर्व मार्गदर्शन या मासिकात केले जाते.

*सोबतच्या लिंक वर क्लिक करून नमुना अंक Download करा:* http://bit.ly/aa22d
आपणही जर उद्योजक असाल किंवा आपल्याला उद्योजक व्हायचे असेल तर या मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा व दर महिन्याला मासिक WhatsApp वर मिळवून Download करून केव्हाही वाचा


📱 *वार्षिक वर्गणी (WhatsApp) : ₹१२५*
💥 *वार्षिक वर्गणीवर आता मिळवा २५% सूट!* 💥
२५% सूट मिळविण्यासाठी PRASHANTS हा Coupon Code वापरा


*'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे WhatsApp वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंक वर आताच Click करा:*

https://shop.udyojak.org/product/003/?partner=71

👩🏻‍🌾👨🏻‍🌾👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍🍳👨🏻‍🍳🕵🏻‍♀🕵🏻
🚀 *आम्ही स्टार्टअपवाले*
-----------------------------------
*_स्टार्टअप २२ : लग्न जुळवून कोटींची उलाढाल करणारे शादी. कॉम_*
-----------------------------------
अवघ्या ५० हजारात व्यवसाय सुरु केला तेव्हा घरच्यांनी त्याला वेड्यातच काढलं. आता वार्षिक उत्पन्न आहे १०० ते सव्वाशे कोटींचे.

"लग्न जमवून कोणी करोडपती होत नाही. "लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात." पिढ्यानपिढ्या हे समज जोपासणाऱ्या मराठी माणसाने अनुपम मित्तलविषयी जाणून घ्यायलाच हवं. लाखो लग्न जमवणारा अनुपम आज केवळ करोडपतीच नव्हे तर अब्जाधीश आहे. केवळ तीन चार लोकांना हाताशी धरून त्याने सुरु केलेला लग्न जमविण्याचा व्यवसाय आज एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारलाय. त्याने स्थापन केलेल्या "शादी.कॉम" मध्ये आज तब्बल तीन हजार कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत सहा हजार कोटीची बाजारपेठ असलेल्या ह्या व्यवसायामध्ये त्याचा वाटा आहे ४० टक्केचा आणि त्याचे वार्षिक उत्पन्न आहे १०० ते सव्वाशे कोटींचे. अनुपम मित्तलच्या त्या कल्पकतेला अन त्याच्या अफाट यशाला माझा त्रिवार सलाम !

अमेरिकेतून एम.बी.ए. करून २४ वर्षाचा अनुपम भारतात परतला तेव्हा वडिलांचा कपड्यांचा व्यवसायच तो पुढे चालवील असाच सर्वांचा समज होता. पण एक दिवस एका लग्न जमविणाऱ्या गृहस्थाबरोबर त्याची ओळख झाली. आपल्या सोबत अनेक स्थळांचे बायोडेटा घेऊन फिरणाऱ्या त्या गृहस्थाला पाहून त्याला एक सुंदर कल्पना सुचली. १९९६चा तो काळ होता. जर आपण इंटरनेटचा वापर करून अशी शेकडो स्थळे लोकांना घर बसल्या दाखवू शकलो तर लोकांचा वेळही वाचेल. चहापाण्यासारखे मुलगी दाखविण्याचे कार्यक्रम करून पुन्हा जड अंतःकरणाने होकार नकार कळविण्याचे प्रसंगही टाळता येतील आणि आपल्याला एक चांगला व्यवसायही करता येईल. इतकीच माफक अपेक्षा ठेऊन अनुपमने अवघ्या ५० हजारात हा व्यवसाय सुरु केला तेव्हा घरच्यांनी त्याला वेड्यातच काढलं.

त्याची सुरुवातही तशी अडखळतच झाली. कारण त्याचा हा कन्सेप्ट त्या काळात लोकांच्या पचनी पडणारा नव्हता. भारतीय लोक रूढी परंपरा इतक्या सहजपणे तोडणारे नाहीत हेही तो जाणून होता. तरीही तो तब्बल सात-आठ वर्ष स्ट्रगल करतच राहिला. तोपर्यंत भारतामध्ये इंटरनेटने चांगलाच जम बसवला होता. नवीन पिढीला त्याची ही कल्पना चांगलीच आवडली. बघता बघता शादी.कॉमने गरुडझेप घेतली. हजारो, लाखो तरुणांना त्याच्या ह्या अनोख्या साईटने भुरळ घातली. त्याच्या साईटवर तीन महिन्यासाठी ४ हजार इतकी घसघशीत नोंदणी फी भरूनही अक्षरशः लाखो तरुण तरुणींनी आपली नावे नोंदविली. आज शादी. कॉमवर तब्बल ३२ लाख स्थळं आहेत. त्यातील ८० टक्के देशातील तर २० टक्के परदेशातील स्थळे आहेत. लाखो वधूवरांनी आपली जन्म गाठ शादी.कॉमच्या मार्फत बांधलेली आहे. भारत, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि अरब देशामध्ये कंपनीची कार्यालये आहेत.

आज जेमतेम २० टक्के लोकांपर्यंत पोहोचलेले इंटरनेट जेव्हा दर वर्षी दहा टक्क्यांनी वाढत जाईल तसतसा शादी.कॉमचा व्यवसायही वाढतच जाईल. व्यवसायातील तेजी मंदीचा कुठलाही फटका कधीच बसणार नाही असा हा एकमेव व्यवसाय निवडणाऱ्या अनुपम मित्तलच्या कल्पकतेला दाद द्यायलाच ह्यावी. लाखो वधू वरांचे स्वप्न साकारणाऱ्या अनुपम मित्तलच्या भावी यशाला माझ्या खूप खूप शुभेच्छा !

- राहुल गव्हाणे
----------------------------------
*_अशीच उपयुक्त माहिती वाचण्यासाठी भेट द्या_*
https://naviarthkranti.org
👩🏻‍🌾👨🏻‍🌾👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍🍳👨🏻‍🍳🕵🏻‍♀🕵🏻

*प्रत्येक उद्योजकाने वाचायलाच हवे असे 'स्मार्ट उद्योजक'*
'स्मार्ट उद्योजक' हे उद्योजकीय मासिक दर महिन्याला प्रकाशित होते. यात उद्योजकांसाठी व भविष्यात उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त विविध लेख असतात.

अर्थात, व्यवसाय सुरू करण्यापासून तो चालविण्या व वाढविण्यापर्यंत लागणारे सर्व मार्गदर्शन या मासिकात केले जाते.

*सोबतच्या लिंक वर क्लिक करून नमुना अंक Download करा:* http://bit.ly/aa22d
आपणही जर उद्योजक असाल किंवा आपल्याला उद्योजक व्हायचे असेल तर या मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा व दर महिन्याला मासिक WhatsApp वर मिळवून Download करून केव्हाही वाचा


📱 *वार्षिक वर्गणी (WhatsApp) : ₹१२५*
💥 *वार्षिक वर्गणीवर आता मिळवा २५% सूट!* 💥
२५% सूट मिळविण्यासाठी PRASHANTS हा Coupon Code वापरा


*'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे WhatsApp वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंक वर आताच Click करा:*

https://shop.udyojak.org/product/003/?partner=71

👩🏻‍🌾👨🏻‍🌾👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍🍳👨🏻‍🍳🕵🏻‍♀🕵🏻
*EXCLUSIVE OFFER*

*_'स्मार्ट उद्योजक' प्रकाशित एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' या ई-बुकवर २५% सूट!_*

*कोणता व्यवसाय करू?*

हा प्रश्न आपल्यासारख्या अनेकांना पडतो. याचे उत्तर शोधण्यासाठी कुठून सुरुवात करू हेही कळत नाही. अशा द्विधा मनस्थितीत जर तुम्ही असाल तर 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे ई-बुक तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.

मूल्य : ₹९९

२५% सूट मिळवण्यासाठी PRASHANTS हा coupon code वापरा.

*Book Now:*
https://shop.udyojak.org/product/004/?partner=71
*अगदी लहानातला लहान उद्योजकही पेड प्रमोशन द्वारे व्यवसाय वाढवू शकतो*
आपण डिजिटल मार्केटिंग जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो. आपल्या उत्पादनांची जलद विक्री होऊ लागते, आपले फॉलोवर्स वाढतात. परंतु एक अशी वेळ येते जेव्हा आपले प्रयत्न तितकेच असतात; परंतु निकाल कमी कमी व्हायला लागतो!

*यावरील उपाय म्हणजेच पेड प्रमोशनबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:*

https://shop.udyojak.org/ar-1/?partner=71
*रु. ५०० एक वर्षाची वर्गणी भरा आणि रु. १,३०० ची जाहिरात मोफत मिळवा!*

_*'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या १ वर्षाच्या प्रिंट अंकांच्या वर्गणीवर १ पाव पान BW जाहिरात मोफत. म्हणजे फक्त रु. ५०० मध्ये रु. १,३०० ची जाहिरात मोफत. वर्षभर घरपोच प्रिंट मासिकही मिळवा आणि ३५,०००+ लोकांपर्यंत आपली जाहिरातही पोहोचवा.*_

*ऑफर मर्यादित!*

Book Now!

https://shop.udyojak.org/product/005/?partner=71
*तुम्हाला उद्योजक व्हायचे आहे का?*

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकातील उद्योजकता आणि व्यवसायवाढीविषयीचे विविध लेख वाचून तुम्हीही उद्योजक होऊ शकता. याचसाठी ‘स्मार्ट उद्योजक’ने *‘उद्योजकतेची मुलतत्त्वे’* हा एक शास्त्रशुद्ध ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. यात तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’मधील विविध लेखांचे referece दिले जातील व फेसबुक ग्रुपवर अतिरिक्त नोट्सही दिल्या जातील.

🎓 *या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?*
व्यवसाय सुरू कसा करावा?
त्यासाठी कोणती तयारी करावी?
व्यवसाय सुरू केल्यावर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?
त्या अडचणींवर मात कशी करावी?
व्यवसायाचे मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स कसे सांभाळावे?
स्टार्टअप तसेच फंडिंग संकल्पना?

🤝🏻अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन टेस्टही देऊ शकता व त्याचे तुम्हाला *प्रमाणपत्र मिळेल*. याशिवाय पुढील १ वर्ष तुम्हाला मार्गदर्शन तसेच व्यवसायासंबंधी शक्य ती मदत केली जाईल.

कोर्सचे शुल्क : *मोफत*

● टीप : कोर्स तसेच ऑनलाइन परीक्षा व प्रमाणपत्र हे सर्व मोफत आहे. फक्त कोर्स मटेरिअल म्हणून तुम्हाला ‘स्मार्ट उद्योजक’ समग्र हा ३०० रुपयांचा डिजिटल अंकांचा सेट खरेदी करावा लागेल. या सेटसोबत ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’ हे रु. ९९ चे ई-बुक मोफत मिळेल.

👉🏻 *‘स्मार्ट उद्योजक’ समग्र खरेदी करून कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी :* https://shop.udyojak.org/product/002/?partner=71