To The Point - MPSC Study
994 subscribers
42 photos
36 files
29 links
Platform to get exam oriented material
Download Telegram
नमस्कार मित्रांनो, आपण हा यूट्यूब चैनल आपल्या अभ्यासांमध्ये क्लॅरिटी आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ऍडिशन करण्याच्या हेतूने तयार केलेला आहे. लोकपाल हे Concepts through Questions द्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओ मध्ये केलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन आम्ही इथे शेअर करत आहोत आणि त्याचबरोबर अरुण जेटली यांचे व्यक्तिमत्व माईंड मॅप द्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओ मध्ये केलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन इथे शेअर करत आहोत. असे दहा ते बारा व्यक्तिमत्व जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते पूर्ण आम्ही व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचे प्रेझेंटेशन येथे शेअर करणार आहोत.
MPSC Mains revised syllabus analysis with colour coding👆
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमकं कोणतं पुस्तक वाचायचे हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यातल्या त्यात कोणीतरी वेगळे पुस्तक वाचत असेल तर आपल्या मनात लगेच संभ्रम निर्माण होतो की आपण बरोबर चाललो आहे ना. याचा विचार करता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ही अंतिम पुस्तक सूची तयार केली आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की मागच्या पाच ते सहा वर्षांमध्ये राज्यात प्रथम आलेले आपले अधिकारी मित्रांनी जे पुस्तक वाचलेले आहेत त्यांच्यामध्ये 90 ते 95 टक्के पुस्तक सारखे आहेत. त्यामुळे मनातील संभ्रम कायमचा दूर करून ही पुस्तक सूची निश्चित करा, त्यावर अंमलबजावणी करा. बघा यश तुम्हाला नक्की मिळेल.
मित्रांनो, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी वीस लाख करोड च आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये या आर्थिक पॅकेजमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचा आहे आणि आर्थिक पॅकेज जाहीर का करण्यात येतो, उद्देश काय असतो, कोणा मार्फत त्याची अंमलबजावणी होते हे सगळे समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे आणि त्या संकल्पना परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाचे आहेत, जसे वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, त्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR आणि एकंदरीत बाजारामध्ये पैशाची उपलब्धता किंवा कमतरता हे कसे करण्यात येते या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.