👆👆👆 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पहिली उत्तरतालिका
मिशन शक्ती - भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी
अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश... सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन 👍👍
--------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
"भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
>> अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."
"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
>> देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

🚀A-SAT - अँटी सॅटेलाईट मिसाईल यंत्रणा
म्हणजे नक्की काय ?
भारताने मिशन शक्ती अंतर्गत उपग्रहनाशक मिसाईल यंत्रणेची यशस्वी चाचणी केली. अँटी साटलाईट मिसाईल यंत्रणा कोणत्या देशात आहे? त्या यंत्रणेचं नेमकं वैशिष्ट्यं काय? याचा फायदा भारताला कसा होऊ शकतो? भारताचं महासत्तेच्या दिशेनं उचलेलं एक पाऊल.
🚀शत्रू देशांचे उपग्रह निकामी करणारं तंत्रज्ञान - शत्रू राष्ट्रांनी उपग्रहाद्वारे भारतावर लक्ष ठेवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा आपल्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर तो उपग्रह निकामी करणारं तंत्रज्ञान भारताकडे आहे.
🚀स्फोटक क्षेपणास्त्र अंतराळात पाठवणं हे मोठं आव्हान आहे. याचं कारण असं की पृथ्वीच्या 300 किमी कक्षेत क्षेपणास्त्र आलं तर त्याला तिथल्या वातावरणाचा विरोध होऊ शकतो आणि क्षेपणास्त्र जमिनीवर कोसळण्याची भीती आहे.
🚀क्षेपणास्त्राचं जितकं जास्त वजन तेवढं मोठं आव्हान आहे. अंतराळात क्षेपणास्त्र जास्त वजनाचं असेल तर त्याचा वेग आणि वेळ दोन्ही अचूक साधणं अधिक जोखमीचं असतं. अंतराळात उपग्रहांचा वेग 5-7.5 किमी प्रति सेकंद साधारण असतो. त्यामुळे जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राकडून उपग्रहाचा अचूक वेळेत निशाणा साधणं महत्त्वाचं आहे.
🚀अँटी-सॅटेलाईट मिसाईलचा प्रवास 200-800 किमी आहे. जमिनीवरून थेट अंतराळातील उपग्रह निकामी करण्याच्या या प्रकारला अंतराळ युद्ध (स्पेस वॉर) म्हणतात. मात्र आतापर्यंत कुणीही शत्रूवर या क्षेपणास्त्राचा वापर केला नाही. अमेरिका, रशिया, चीनने केवळ अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत.
🚀1950च्या दशकापासून अशा प्रकारची क्षेपणास्त्र तयार करण्याची सुरुवात झाली. अमेरिकेनं पहिल्यांदा 13 सप्टेंबर 1985 रोजी ASM-135 ASAT अँटी-सॅटेलाईट मिसाईल यशस्वी चाचणी केली. त्यानंतर 2007 मध्ये चीनकडून तर 2016 मध्ये रशियाकडून अँटी-सॅटेलाईट मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आली
🚀आज 27 मार्च 2019 रोजी DRDO नं केलेल्या यशस्वी चाचणीनंतर भारतानं आपलं नाव अंतराळातली महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. ही चाचणी यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. 2017पासून इस्रायलकडून अशा क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ए सॅट क्षेपणास्त्राच्या मदतीनं एलईओ लाईव्ह सॅटलाईट अवघ्या 3 मिनिटांत वेध घेऊन निकामी करण्यात भारत यशस्वी ठरला आहे.
सौजन्य- नेस अकॅडमी