The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Deleted Account
👆👆👆👆 सारथी UPSC Delhi CET 2019
परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
👆👆👆 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पहिली उत्तरतालिका
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
मिशन शक्ती - भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी
अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश... सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन 👍👍
--------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

"भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

>> अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."

"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

>> देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.