The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
35-2018-Final Result.pdf
654.3 KB
#ASO मुख्य परीक्षा निकाल..👆
Forwarded from The MPSC Update ©
#ASO Mains
कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

खुला (Open) सर्वसाधारण : 135 ते 140

OBC (सर्वसाधारण) : 133 ते 138

टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇

1. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate आणि @nacepune हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

2. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 1-2 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..

4. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

साभार,

टीम @Thempscupdate & @nacepune

http://telegram.me/thempscupdate
#ASO - 7 नोव्हेंबर,2019 ची पोस्ट..👆

@thempscupdate आणि @nacepune अकॅडमी तर्फे आपण व्यक्त केलेला अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला..☺️👍👍
Forwarded from NACE Academy
🔹भारताची ‘मिसाईल पॉवर’


▪️पृथ्वी-1

सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.

▪️अग्नि-1

अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.

▪️आकाश

जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.

▪️नाग

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.

▪️त्रिशूल

जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

▪️अग्नि 2

एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

▪️पृथ्वी 3

नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.

▪️ब्राह्मोस

भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

▪️सागरिका

समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.

▪️धनुष

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

▪️अग्नि-3

अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

▪️अग्नि-4

पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

▪️अग्नि-5

भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

▪️निर्भया

जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.

▪️प्रहार

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.
Forwarded from NACE Academy
जागतिक आनंदी देश अहवाल 2019 जाहीर

सयुक्त राष्ट्राच्या UN sustainable Development Solution Network मार्फत २०१२ पासून जागतिक आनंद अहवाल जाहिर केला जातो. २०१९ चा अहवाल २० मार्च २०१९ रोजी (जागतिक आनंदी दिवस ) आपला सातवा अहवाल सादर केला गेला. यावर्षीची थीम "हॅपीएर टुगेदर" आहे. या अहवालात या वर्षी भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. गतवर्षी तो १३३ व्या क्रमांकावर होता. फिनलँड सलग दुसऱ्या वर्षी सर्वोच्च स्थानी कायम आहे.

संयुक्त राष्ट्र महासभाने २०१२ मध्ये २० मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस घोषित केला होता. संयुक्त राष्ट्र ही सूची ६ घटकांच्या आधारावर निश्चित करते. यामध्ये उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारतेचा समावेश आहे. याचे मोजमाप 1 ते 10 मध्ये होते. या अहवालानुसार, मागील काही वर्शांत समग्र जागतिक आनंदात घसरण झाली आहे.संयुक्त राष्ट्राचा सातवा वार्षिक आंनदी देशांचा हा अहवाल जगातील १५६ देशांवर आधारित आहे. या देशातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात, यावर तो अवलंबून असतो. यामध्ये चिंता, उदासी आणि आणि क्रोधसहित नकारात्मक भावनांमध्ये वृद्धी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

▪️जगातील सर्वाधिक आनंदी पाच देश
१) फिनलँड
२) डेन्मार्क
३) नॉर्वे
४) आईसलँड
५) नेदरलँड

▪️जगातील सर्वात दुखी ५ देश
१) दक्षिण सुदान (१५६)
२) मध्य अफ्रिकन गणराज्य (१५५)
३) अफगाणिस्तान (१५४)
४) टांझानिया (१५३)
५) रवांडा (१५२)

▪️भारताच्या शेजारील राष्ट्रांचे स्थान
नेपाळ - १००
भूतान - ६५
श्रीलंका - १३०
अफगनिस्तान - १५४
पाकिस्तान - ६७
चीन - ९३
बांगलादेश - १२५

जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक असलेला अमेरिका मात्र आनंदात १९ व्या स्थानी आहे. २०१८ च्या अहवालानुसार १५६ देशांच्या यादीत भारत १३३ व्या स्थानावर आहे .२०१७ च्या व २०१६ च्या अहवालानुसार भारत अनुकमे १२२ व्या व ११८ व्या स्थानी होता
Forwarded from NACE Academy
जागतिक जल दिन दरवर्षी २२ मार्चला स्वच्छ पाण्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे साजरा केला जातो.
पहिला जागतिक जल दिवस १९९३ मध्ये साजरा करण्यात आला.
UN-Water दरवर्षीच्या जल दिनाच्या theme ठरवत असते.
2014 to 2018 themes
2014 Water and energy[
2015 Water and Sustainable Development
2016 Water and Jobs
2017 Why waste water?
2018 Nature for Water
2019 leaving no one behind
The UN World Water Development Report जल दिनदिवशी सादर केला जातो.
The MPSC Update © pinned «#ASO - 7 नोव्हेंबर,2019 ची पोस्ट..👆 @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी तर्फे आपण व्यक्त केलेला अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला..☺️👍👍»
#मिशेल बँचलेट

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क उच्चायुक्तपदी नेमणूक
कार्यकाल : 4 वर्षे

सातव्या महिला उच्चायुक्त (चौथ्या महिला )

त्या दोन वेळा चिलीच्या राष्ट्रपती होत्या.
(चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती)
न्या. #गीता_मित्तल

J&K उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड

न्या. आलोक आरधे यांची जागा घेतली

त्या जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या 36 व्या (पहिल्या महिला) मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत

2006-2008 या कालावधीत त्या दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या.

2018 चा नारी शक्ती पुरस्कार मिळवनाऱ्या न्याय क्षेत्रातील पहिल्या महिला ठरल्या
न्या. #विजया_कमलेश_ताहीलरमानी

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक (दुसऱ्या महिला)

न्या. इंदिरा बॅनर्जी यांची त्यांनी जागा घेतली .

यापूर्वी त्या मुंबई उच्च न्यायलयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश होत्या.
#ताहीरा_सफदार

बलुचिस्तान उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायालयाची मुख्य न्यायाधीश होणारी पहिली महिला
#कृष्ण_कुमारी_कोहली

पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाची (सिनेटची ) पहिली दलित हिंदू महिला ठरली.

त्या सिंध प्रांतासाठी महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून गेल्या.

यापूर्वी रत्ना भगवानदास चावला यांची पहिली हिंदू महिला सिनेटर म्हणून निवड केली होती.
#दीपा_आंबेकर

न्यूयॉर्कस्थित फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक

न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश अशी ख्याती

राजा राजेश्वरी यांच्यानंतर न्यूयॉर्क न्यायालयात न्यायाधीश होणाऱ्या त्या दुसऱ्या भारत अमेरिकन वंशाच्या महिला
#मेरी_कॉम

BSNL च्या सदिच्छादूत पदी नेमणूक

Tribe India सदिच्छादूत पदी नेमणूक
#गीता गोपीनाथ

भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थतज्ञ

IMF मध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून नेमणूक

मॉरिस ओबस्टल्ड यांची जागा घेतली.

रघुराम राजन यांच्यानंतर हे पद भूषावणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय...

2011 मध्ये WEF द्वारे Young Global Leader म्हणून निवड
#सत्या_त्रिपाठी

भारतीय अर्थतज्ञ व पर्यावरण तज्ञ

संयुक्त राष्ट्राचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमाचे (UNEP) #न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख

त्यांनी इलॉट हरिस यांची जागा घेतली
#Imp_fact

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे CEO : अशोक कुमार भुतानी

राज्यसभेचे उपाध्यक्ष : हरिवंश नारायण सिंह

आयुष्यमान भारत मोहिमेचे CEO : इंदू भूषण

स्वच्छ आदत स्वच्छ भारतच्या सदिच्छादूत : काजोल

स्वच्छ गंगा मोहिमेचे महासंचालक : राजीव रंजन मिश्रा

नेपाळच्या पर्यटनाच्या सदिच्छादूत : जया प्रदा

Road Safety Campaign सदिच्छादूत : अक्षय कुमार

कौशल्य भारत अभियानाचे सदिच्छादूत : वरून धवन , अनुष्का शर्मा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छादूत : रविना टंडन
#EasyTrick
__________________________________

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग

1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53

2.मेकॉले समिती-1853

3.वुडचा खलिता-1854

4.हंटर समिती-1882-83

5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904

6.सॅडलर समिती-1917-18

7.हारटोग समिती-1929

8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937

9.सार्जंट योजना-1944

10.राधाकृष्ण आयोग-1948

Trick :

शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
__________________________________

🙏🙏साभार : संभाजीराजे चव्हाण

#History