The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
१७ सप्टेंबर:
तमिळ भाषेत पेरियार म्हणजे महामानव. दि १७-९-१८७९ ला ई व्ही रामास्वामी तर दि १७-९-१८८५ ला के सी ठाकरे या दोन खऱ्या प्रबोधनकारी महामानवांचा जन्म झाला. भारतीय समाजकारणाची परंपरागत कुस बदलविणाऱ्या व जवळजवळ समकालीन असणाऱ्या या दोन्ही विभूतींस त्रिवार अभिवादन. महात्मा फुले यांच्या राष्ट्रपोषक विचारांच्या हायवे वरून हे दोन्ही महापुरूष भारतीयांच्या उत्कर्षाकरीता मार्गक्रमण करित होते हे मुद्दाम समजून घेण्याची आजच्या दिवशी विशेष गरज आहे.

तामीळनाडू राज्यात जन्मलेल्या ई व्ही रामास्वामी या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकनिष्ठ पद्धतीने जगलेल्या या सत्पूरूषाचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. १९२०,१९२१,१९२२,१९२३,१९२४,१९२५ मध्ये तामीळनाडू राज्यातील काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी आरक्षण लागू करण्याचा ठराव जाणीवपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला. लोकसंख्येच्या त्या त्या जाती धर्माच्या प्रमाणात आरक्षणाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून नोकऱ्यांमध्ये एकाच जातीचे वर्चस्व असणार नाही व प्रत्येक जातीला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, या तर्कशुद्ध योजनेवर पेरियार रामास्वामींनी आजन्म आंदोलन केले. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांनी 'जिसकि जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी' हे सूत्र पेरियार यांच्या या संकल्पनेतूनच पुढे आणले. स्त्री हक्क समानतेबाबत प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या समाजधुरिणांच्या नावांमध्ये पेरियार यांचे नाव अग्रगणी ठेवावे लागेल. 'दहा पुरूषांपेक्षा दोनच स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा व स्वाभिमान जाणिवेचा विकास केल्यास ते समाजाचे अधिक हिताचे ठरेल' असे मत त्यांनी आजपासून साधारणतः ९०-१०० वर्षापूर्वी व्यक्त केले. महिलांना ५० टक्के आरक्षण असलेच पाहीजे याबाबत ते सतत संघर्ष करित होते. पतीव्रता भंगाची शिक्षा स्त्रियांना समाज व धर्म जर देत असेल तर पत्नीव्रता भंगाची तशीच शिक्षा पुरुषांना का नाही? हा जगातील प्रत्येक स्वाभिमानी महिलांच्या मनातील प्रश्न त्यांनी हिरीरीने मांडून त्याबाबत जनजागृती केली.
हिंदू धर्मातील जाचक रुढी, अनिष्ठ परंपरा, अनाकलनीय व्रत वैकल्ये याबाबत पेरियार रामास्वामी यांचेपेक्षा अधिक परखड व अभ्यासपूर्वक विचार कुणीही मांडले नसावेत. 'देव आणि धर्म हे श्रीमंताचे, लुबाडणारांचे त्याचप्रमाणे उच्च जातींच्या लोकांचे हित जपण्यासाठी केलेली निर्मिती होय' असे म्हणत त्यांनी सर्वसामान्यांचे प्रबोधन केले. त्यांनी लिहिलेल्या 'रामायण: एक सत्य वाचन' हा ग्रंथ रामायणाबाबत अधिक नवीन पैलू उजेडात आणतो. राष्ट्रपिता ज्योतीराव फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवांसोबत काम करणाऱ्या ई व्ही रामास्वामी यांनी आजपासून जवळजवळ १०० वर्षापूर्वी आधुनिक शिक्षण पद्धती, स्वाभिमानी विवाह पद्धती, कुटुंब नियोजन, वायकोम प्रकरण, गुरुकुलम प्रकरण, अस्पृश्यता निवाराण, महिला सशकतीकरण, देवदासी पद्धती, आरक्षण आंदोलन, मंदिर प्रवेश आंदोलन अशा असंख्य जनकल्याणकारी व सुधारणावादी विषयांकरिता बुद्धिप्रामाण्यवादी विचाराने संघर्ष केला. विविध विषयावर जगभर त्यांनी दिलेली भाषणे त्यावेळी प्रचंड गाजलित. वयाच्या ९४ व्या वर्षी दि १९-१२-१९७३ ला मद्रास येथील शेवटचे भाषण दिल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी म्हणजे २४-१२-१९७३ ला अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

सर्वांना प्रबोधानकार या नावाने परिचित असणारे के सी ठाकरे; आजचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजोबा व शिवसेनासंस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री. प्रबोधन या नियतकालिकातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेमध्ये केलेल्या मतपरीवर्तनामुळेच त्यांना प्रबोधनकार असे अत्यंत सन्मानाने ओळखल्या जाते. सनातन वैदिक धर्माची त्यांनी केलेली चिरफाड आजपासून ७०-८० वर्षापूर्वी अनेक धर्ममार्तंडांची भंबेरी उडवून गेली. त्यावेळेस त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आजपर्यंतही या धर्माच्या ठेकेदारांना समाधानकारक उत्तरे देता आलेली नाही. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या प्रबोधनकारांनी महात्मा फुल्यांचा छळ करणा-या विशेषतः पुण्यातील सनातन्यांना अखेरपर्यंत सोडले नाही. या अन्यायी सनातन्यांच्या बेगडावर प्रबोधनकारांनी ओढलेल्या वैचारिक चाबकामुळे पडलेले व्रण चिरकाल दिसत राहतील. असंख्य सामाजीक सुधारणांचे ते आगार होते.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहिचे बंड, ग्रामण्याचा साध्यंत इतिहास, कुमारिकांचे शाप, संत गाडगे महाराज, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा इत्यादी साहित्यसंपदा व खरा ब्राह्मण, टाकलेलं पोर अशी लिहिलेली नाटके वाचुन आजही त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा व ध्येयाचा आवाका आपल्याला आजच्या परिपेक्षामध्येही अचंबित करून जातो. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे ही त्यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका प्रत्येक सुशिक्षीताने वाचून आपआपल्या मेंदुवर चढलेल्या सनातनी बुरशी ची कायमस्वरूपी निर्दालन करणेस्तव
Forwarded from NACE Academy
खूप उपयोगाची आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज हे तर प्रबोधनकारांचे निस्सीम चाहते होते. या दोघांमधील नाते अत्यंत मनस्वी जरी असले तरी भाबडे नव्हते. मराठ्यांची चार-दोन पोरं कोल्हापुरच्या अंबाबाई च्या मंदिरातील गाभाऱ्यात परवानगी नसताना गेल्यामुळे शाहु महाराजांनी त्या मुलांना अल्प शिक्षा केली हे ऐकून प्रबोधनकारांनी 'अंबाबाईचा नायटा' हा लेख लिहून शाहूमहाराजांच्या या निर्णयावर विवेकपुर्ण टीका केली. राजर्षी शाहूंनी सुद्धा अत्यंत दिलेरपणाने ही चुक मान्य करून प्रबोधनकारांचे आभार मानीत ती शिक्षा रद्द केली.
प्रबोधनकारांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान महाराष्ट्रातील समस्त जनतेला प्रेरणादायी असेच आहे. बालविवाह, केशवपण, हुंडाप्रथा, अस्पृश्यता, जातीय भेदभाव, पूजा-यांची अरेरावी अशा असंख्य अनिष्ट रूढींविरूद्ध त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न त्यांची सामाजिक कणव अधोरेखित करतात. संत गाडगेबाबांचे भक्त असलेला हा लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक, राजकीय विश्लेषक, स्वातंत्र्यसैनिक महापुरूष त्यांच्या लिखाणातून आजही बुरसटलेल्या विचारांना आव्हान देण्याकरीता प्रचंड प्रमाणातुन विवेकवादी दारुगोळा पूरविण्याकरीता समर्थ वाटतो. सद्यस्थितीत भारतामध्ये विखारी मांडणीमधून हिंदु-मुस्लिम असा वाद पेटवून काही सनातनी प्रवृत्ती येथील एकात्मतेची वीण विस्कटण्याचा प्रयत्न करित असताना प्रबोधनकारांनी ईस्लाम धर्माबाबत व प्रेषित पैगंबर यांचेबाबत मांडलेली सन्मानपूर्वक मते त्यांच्या वैचारिक वारसांनी समाजासमोर आणण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. आयुष्याची ८८ वर्षे जीवन कृतार्थ जगलेल्या या प्रबोधनकारांचे दि २०-११-१९७३ ला निधन झाले.
या दोन्ही महामानवांना परत एकदा मानाचा मुजरा!
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
#DMA नगरपरिषद मुख्य परीक्षेसाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा..💐