Forwarded from The MPSC Update ©
#AMVI सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन...💐💐💐
@thempscupdate आणि @nacepune या चॅनेल वरील यशस्वी उमेदवारांनी @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर आपले नाव, फोटो आणि प्रवर्ग ( Category) पाठवावेत..

१ एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जातो. एप्रिल फूल बनविण्याची सुरूवात कशी झाली ? वाचा रोचक कहाणी
---------------------------------
एक एप्रिल म्हणजे आपल्या मित्रमंडळींना ‘एप्रिल फूल’ बनवण्याचा दिवस. त्या दिवशी लोकांना त्यांचा विश्वास बसेल अशा थापा मारायच्या. किंवा अस्तित्वातच नसलेल्या गोष्टी आहेत असे भासवायचे व ते फसले की त्यांना एप्रिल फूल म्हणून चिडवायचे. जगभरातील लोक आपापल्या देशाच्या संस्कृतीनुसार त्या दिवशी एकमेकांच्या खोडय़ा काढून आणि गमतीजमती करून एप्रिल फूल साजरा करतात. आपल्या मित्रमंडळींची फजिती करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधतात; पण आपण कोणाची फजिती करण्यात यशस्वी होतो की आपलीच कोणाकडून फजिती केली जाते, याबद्दल मात्र सगळे जागरूक असतात. एप्रिल फूलचा विशेष म्हणजे या खोडय़ा आणि चिडवणे कोणी गांभीर्याने घ्यायचे नसते. आपली कोणी चेष्टा केली, फजिती केली तरी ती खेळीमेळीने घेऊन त्यातली मजा अनुभवायची असते.
या सगळ्याची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातल्या एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होते. त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षांची सुरुवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवडय़ात होत असे. या आठवडय़ात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत व १ एप्रिलला नववर्ष साजरे करत असत. फ्रेंच लोकांनी १५८२ मध्ये जॉर्जयिन कॅलेंडर अंगीकारले. या नवीन कॅलेंडरनुसार १ जानेवारीला नववर्षांचा प्रारंभ होत असे. हा बदल काही लोकांना मान्य नव्हता, तर खेडय़ापाडय़ांतील लोकांना हा बदल केलेला कळला नव्हता. त्यामुळे ते पूर्वीप्रमाणेच १ एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले.
उच्चभ्रू फ्रेंच लोकांनी आपल्या या अश्वानी देशबांधवांना ‘मूर्ख- फूल्स’ ही उपाधी दिली आणि जे लोक जुन्या कॅलेंडरनुसार १ एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले त्यांना ‘एप्रिल फूल’ संबोधल गेलं. अशा तऱ्हेने १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ करण्याची पद्धत हा हा म्हणता युरोपभर आणि कालांतराने इतर देशांत पसरली.
आजही फ्रेंच मुले आपल्या शाळेतील मित्रांच्या नकळत त्यांच्या पाठीवर कागदाचा मासा करून चिकटवतात. जेव्हा त्या मुलाच्या हे लक्षात येते तेव्हा सगळी त्याला ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडवतात.
पोर्तुगालमध्ये लेंटच्या (ईस्टरपूर्वीचा ४० दिवसांचा काळ) आधीचा रविवार आणि सोमवार हा एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. त्या वेळी ते एकमेकांच्या अंगावर पीठ फेकून खोडय़ा काढतात.
डेनमार्कमध्ये १ मे हा विनोद दिवस मानला जातो व त्याला ‘मे कॅट’ असे म्हणतात. स्वीडन व इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांत इतर देशांप्रमाणे १ एप्रिल हाच एप्रिल फूल म्हणून साजरा करतात.
आपल्याकडेही लहान-मोठे सगळेच जण एप्रिल फूलची वाट बघत असणार. उद्या कोणाची कशी फजिती करायची, याबद्दल त्यांचे बेतही चालले असणार.
सौजन्य : दैनिक लोकसत्ता
@thempscupdate

*१ एप्रिल… आज जीमेलचा वाढदिवस*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा ‘गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा ‘एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शQmjbq7 अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी सुरवातीच्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते. हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. खरोखरच जीमेल सेवा सुरू झाली आणि हा हा म्हणता जगभरातील लोकांना जी-मेलने आकृष्ट केले. व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग वगैरे गोष्टी आधीही होत्या. परंतु, त्यांची ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करून घ्यावी लागत. ‘जी-मेल‘मध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा हात जोडून उभ्या राहिल्या. कॅलेंडर, ऑनलाइन ड्राइव्ह, फोटो होस्टिंग, व्हिडिओसाठी यू-ट्यूब, ब्लॉग, बातम्या आणि ‘गुगल‘च्या सर्व सेवा वापरण्याची सोय झाली. जीमेल ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या.
उदाहरणार्थ, अगदी पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच त्या काळी जास्त नव्हते. निळ्या-करड्या रंगाचे हॉटमेल, पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही खिडकी, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. अशी संपूर्ण रचना तयार करण्यामागे गुगल कंपनीतील अभियंता पॉल बुशैत याची धडपड होती. नवी सेवा मोफत द्यायची किंवा नाही, यासारख्या मुद्द्यांवर आधी कंपनीत वादही झाले होते. पण, या सगळ्यातून तावून-सुलाखून तयार झालेली "जी-मेल‘ सेवा पाहतापाहता इतकी लोकप्रिय झाली, की सध्या ती वापरणाऱ्यांची संख्या १२५ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत!
जीमेलच्या वापरकर्त्यांपैकी निम्मे आशियातच आहेत. जी-मेल मुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर संगणकाच्या पडद्यावर उमटविलेली अक्षरे निमिषार्धात सातासमुद्रापार पोचण्याची सोय उपलब्ध झाली. या ‘डाकिया‘चे स्वरूपच आमूलाग्र पालटून गेले. मग ‘पांढऱ्यावर काळे‘ करण्याची आवश्यकता उरली नाही.
*** जी-मेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी-मेलची अनोळखी फीचर्स.*
इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या 'जीमेल'चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर 'जीमेल' वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही 'जीमेल'ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.
👍 'स्पॅम' चा वापर
आपल्या जीमेल अॅड्रेसमध्ये जो डॉट दिला जातो, त्याचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नसतो. तुमचा जीमेल आयडी जर tyler.durden@gmail.com असा असेल तर tylerdurden@gmail.com किंवा t.ylerdurden@gmail.com किंवा t.y.l.e.r.d.u.r.d.e.n@gmail.com या नावाने येणारे मेल्ससुद्धा तुमच्या इनबॉक्समध्येच येतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. अशा प्रकारचे जीमेल अॅड्रेस आपण वन टाइम ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी किंवा इतर तात्पुरत्या इंटरनेट सेवांसाठी वापरता येतात. तात्पुरते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जर पुन्हा त्या साइटवरून मेल येऊ द्यायचे नसतील तर आपल्या जीमेल आयडीची अक्षरे बदलून इमेल फिल्टर तयार करता येते आणि या आयडीवर येणारे सर्व मेल डीलीट करता येतात.
👍 इमेल फिल्टर तयार करणे
इमेल फिल्टर तयार करण्यासाठी जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर गो टू सेटिंग्ज-फिल्टर टॅब-क्रीएट अ न्यू फिल्टर या क्रमाने जावे लागते. फिल्टर तयार झाल्यानंतर त्यात स्कीप इनबॉक्स, अप्लाय द लेबल, डीलीट आणि इतरही अनेक पर्याय असतात. फिल्टर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमच्याकडे येणारे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या पर्यायांनी तपासल्यानंतरच इनबॉक्समध्ये येतील.

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
काही महत्वाच्या केसेस...👆👆