The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
CDPO.pdf
58.6 KB
अभ्यासक्रम

निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी / अधीक्षक / सांख्यिकी अधिकारी, गट - ब
The MPSC Update ©
downloaded_file-66.pdf
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 एप्रिल, 2018..

इंजिनिअरिंग आणि मेडिकल चे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत..

अधिक माहितीसाठी (MPSC) आयोगाशी संपर्क साधावा..🙏
# राष्ट्रीय

हे राज्य शासन आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘प्रादेशिक एकात्मिक बहू-धोके पूर्व सुचना प्रणाली’ सोबत कार्य करणार – ओडिशा.

राज्यातील बहुआयामी दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर स्थानिक सर्वेक्षण करणारा हा पहिला राज्य आहे - आंध्रप्रदेश.

या भारतीय लघुपटाने लॉस एंजिल्समध्ये एका समारंभात सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार जिंकला – शुन्याता.

नवी दिल्लीत या देशासोबत आपत्ती जोखिम शून्यकरण (DRR) या विषयावर पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली - भारत-जापान.

# आंतरराष्ट्रीय

या दोन देशांच्या नौदलांचा पहिला 'गल्फ स्टार 1' युद्धाभ्यास चालवला जात आहे - संयुक्त अरब अमीरती आणि भारत.

या पत्रकारिता संस्थेच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे आढळून आले - ऑर्ब मीडिया.

वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि लॉसन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी तयार केलेल्या त्रिमितीय-मुद्रित स्टेथोस्कोपला हे नाव देण्यात आले - ग्लिया मॉडेल.

या देशात लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी व जगातला सर्वात मोठा जीनोमिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी केंब्रिज (ब्रिटन) स्थित ग्लोबल जीन कॉर्प (GGC) आणि न्यूयॉर्क (अमेरिका) स्थित रीगनेरोन जेनेटिक्स सेंटर यांच्यात भागीदारी करार झाला - भारत.

आंतरराष्ट्रीय आनंद दिवस 2018 चा हा विषय आहे - शेअर हॅप्पीनेस.

या बेट राष्ट्राने मुसलमान-विरोधी हिंसाचारानंतर 6 मार्च रोजी लागू केलेली देशातील ‘आणीबाणी’ स्थिती उठवली - श्रीलंका.

# क्रीडा

या देशाने भारत-श्रीलंका-बांग्लादेश टी-20 शृंखलेचा ‘निडास करंडक 2018’ जिंकला - भारत.

टी-20 मध्ये 7000 धावा काढणारा हा दहावा फलंदाज आहे - रोहित शर्मा (भारत).

या प्रादेशिक संघाने भारतातला ‘इराणी करंडक 2018’ जिंकला - विदर्भ.

या भारतीय महिला बॅडमिंटनपटूने अंडर-19 ‘इस्रायल जूनियर 2018’ स्पर्धा जिंकली - पूर्वा बर्वे.

अर्जेंटिनाच्या या टेनिसपटूने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररयाचा पराभव करत ‘2018 इंडियन वेल्स मास्टर्स’ स्पर्धा जिंकली - जुआन मार्टिन डेल पोत्रो.

ही महिला टेनिसपटू इंडियन वेल्सचे विजेतेपद जिंकणारी पहिली जपानी खेळाडू ठरली - नाओमी ओसाका.

आगामी ‘FIFA अंडर-20 विश्वचषक 2019’ स्पर्धेचे यजमानपद या देशाला मिळाले – पोलंड.

# चर्चेत असलेली व्यक्ती

रशियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या नेत्याला बहुमत मिळाले - व्लादिमिर पुतीन.

या चीनी मोबाइल निर्माता कंपनीने भारतीय बाजारपेठेतील ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून आमिर खानची नेमणूक केली - विवो.

चीनच्या पंतप्रधान पदासाठी ही व्यक्ती निवडून आली - ली केकियांग.

"स्नेक व्हिस्परर" म्हणून ओळखला जाणार्‍या मलेशियाच्या या व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू झाला - अबू जरिन हुसेन (33 वर्षीय).

# महाराष्ट्र विशेष

पंतप्रधानांनी या शहरातल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राची कोनशिला उभारली - कोल्हापूर.

# सामान्य ज्ञान

या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस’ साजरा करतात - 20 मार्च.

रशियाच्या राष्‍ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्तीचे हे नाव आहे - व्लादिमिर पुतीन.

रशियाची राजधानी हे शहर आहे – मॉस्को.

रशियाचे हे चलन आहे - रशियन रूबल.

या खेळाशी संबंधित झेड. आर. इराणी या खेळाडूच्या स्मृतीत भारतात इराणी करंडक ही स्पर्धा खेळली जाते - क्रिकेट.

सन 1974 मध्ये स्थापित बी.एन.पी. परिबास ओपन ही या खेळशी संबंधित आहे - टेनिस.
#science सामान्य विज्ञान #Strategy & Guidelines..👇

1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.

2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..

3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-

i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)

ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)



4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न

i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न

ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न

iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न


5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय

i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न

iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.

iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न

अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 50% गुण सहज मिळवता येतात..

साभार,



अधिक माहितीसाठी -

आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

t.me/thempscupdate
जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 81 वा देश

ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल संस्थेनी ‘सन 2017 चा जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांक’ प्रसिद्ध केला आहे. या यादीत भारताचा 81 वा क्रमांक लागतो.

या यादीत एकूण 180 देश आणि प्रदेशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार क्रमीत करण्यात आले आहे. हा निर्देशांक 0-100 यामध्ये देशांना मापतो, यामध्ये 0 म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट आणि 100 म्हणजे सर्वाधिक स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त.

ठळक बाबी

यादीत न्यूझीलँड आणि डेन्मार्क अनुक्रमे 89 आणि 88 या गुणांसह शीर्ष स्थानी आहेत.

सीरिया, दक्षिण सूदान आणि सोमालिया अनुक्रमे 14, 12 आणि 9 या गुणांसह यादीत तळाशी आहेत.

यादीत चीन 41 गुणांसह 77 व्या क्रमांकावर आहे. तसेच ब्राझील 96 व्या आणि रशिया 29 गुणांसह 135 व्या क्रमांकावर आहे.

मागील सहा वर्षांमध्ये, प्रत्येक 10 मधील 9 पत्रकारांना त्या देशांमध्ये मारण्यात आले आहे, ज्यांचे यादीत 45 वा त्याहून कमी गुण असलेले आहेत.

अहवालानुसार आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात काही देशांमध्ये पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेता आणि कायदा स्थापित करणारी संस्था या देखरेख संस्थांना धमकावण्यात येते, काही बाबतीत त्यांची हत्या देखील केली जाते.

या बाबतीत फिलिपिन्स, भारत आणि मालदीव हे सर्वाधिक खराब क्षेत्रिय अपराध्यांच्या श्रेणीत आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत हे तिन्ही देश सर्वात समोर आहेत. या देशांमध्ये वृत्तसंस्थेकडे मर्यादित स्वतंत्रता आहे आणि पत्रकारांच्या हत्येची प्रकरणेही येथे सर्वाधिक आहेत.

अहवालात भारत

अहवालात भारताला आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात भ्रष्टाचार आणि वृत्तसंस्था स्वतंत्रतेच्या बाबतीत "सर्वाधिक खराब अपराधी" असलेल्या देशाच्या श्रेणीत ठेवले आहे.

सन 2016 मध्ये भारत एकूण 176 देशांमध्ये 79 व्या क्रमांकावर होता. सन 2015 मध्ये भारत या यादीत 38 व्या क्रमांकावर होता. 
GPS उपकरणांवर होणारा सायबर हल्ला रोखण्यासाठी नवीन अल्गोरिदम विकसित

शास्त्रज्ञांनी एक काल्पनिक अल्गोरिदम विकसित केले आहे, जे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS)-सक्षम उपकरणांवर वास्तविक वेळेत सायबर हल्ले शोधण्यास आणि ते टाळण्यास मदत करू शकणार.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले अल्गोरिदम इलेक्ट्रिकल ग्रिड आणि अन्य GPS वर निर्भर असलेल्या तंत्रज्ञानावरील फसव्या GPS हल्ल्यांचा प्रभाव कमी करते.

व्यापक स्वरूपात, दुर्भावनायुक्त सायबर-आक्रमणकर्ते GPS संकेताचे प्रतिबिंब तयार करतात आणि ते काही काळासाठी प्रदर्शित करतात, जे चुकीची वेळ किंवा चुकीचे स्थान दर्शवतात. यामुळे लोक चुकीच्या ठिकाणी किंवा बेकायदेशीर माहितीचा त्रास सहन करू शकतात.

नवा अल्गोरिदम सेलफोन किंवा संगणकावर एका अॅपद्वारे सहजपणे लागू होऊ शकतो. हा अल्गोरिदम खोटे GPS संकेत ओळखण्यास आणि हल्ला रोखण्यास सक्षम आहे.

संशोधनाचे महत्त्व

अमेरिकेसारख्या देशात इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड GPS समर्थित प्रणालीवर आधारित आहे. त्यावर हल्ले रोखण्यासाठी हे अल्गोरिदम तयार करण्यात आले आहे.

शिवाय विचारार्थ असलेल्या वाहनचालकाविना GSP आधारित वाहनचालनाच्या संकल्पनेकडे वाटचाल करीत असताना, GPS अश्या हल्ल्यांपासून सुरक्षित करणे ही एक गरज ठरत आहे.
2018 : Theme..👆
Forwarded from The MPSC Update ©
# राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 👆👆👆2013 ते 2017 आणि " भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान "

Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..

@Thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
# " भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान " स्ट्रॅटेजी व्हिडिओ भाग-2.👆👆

Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..

@Thempscupdate
20-2018.pdf
196.2 KB
सहायक नगररचनाकार (गट -ब : राजपत्रित ) जाहिरात..👆👆, नगरविकास विभाग

Civil Engineering झालेल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम संधी..!!

फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 एप्रिल, 2018

@thempscupdate
Assistant_Townplanner,_Townplanning.pdf
98.7 KB
Syllabus & Scheme of Exam
जागतिक जल दिन: 22 मार्च

पाणी (जल) म्हणजे जीवनाचा स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस “नेचर फॉर वॉटर” या विषयाखाली साजरा केल्या जात आहे.

आज 663 दशलक्षहून अधिक लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही, शिवाय उपलब्धही नाही. प्रदुषित पाण्याचा वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या 21 व्या शतकाच्या पाण्यासंबंधीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण निसर्गाचा कसा उपयोग करू घेऊ शकतो याला दर्शविणारी ही संकल्पना आहे.

ब्राझीलच्या रियो द जेनेरियोमध्ये 1992 साली आयोजित पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत (UNCED) जागतिक जल दिनासाठी पुढाकार घेतला गेला. 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेकडून अधिकृतपणे 22 मार्चला ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास घोषित करण्यात आले. प्रथम जागतिक जल दिन 1993 साली साजरा केला गेला होता.

पाण्यासंदर्भात भारतीय दृष्टीकोण

भारतात पाण्यावरून अनेक घटना घडलेल्या आहेत. शिवाय याविषयी अनेक तथ्ये देखील उदाहरणात आली आहेत, जे की पुढीलप्रमाणे आहेत –

मुंबईत रोज फक्त गाडी धुण्यासाठी 50 लक्ष लीटर पाणी वापरले जाते.

दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या महानगरांमध्ये नळासंबंधी व्याधीमुळे दररोज 17-44% पाणी विनाकारण वाहून जाते.

मागील 50 वर्षांमध्ये पाण्यासाठी 37 भीषण हत्याकांड झालेत. शिवाय पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.

आणि अश्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

भारतात पाडलेल्या वर्षावाचा केवळ 1% भारतात वापरात आणला जातो. पिण्यासाठी मानवाला दर दिवशी 3 लीटर आणि जनावरांना 50 लीटर पाण्याची आवश्यकता असते. 1 लीटर गायीचे दूध मिळविण्यासाठी 800 लीटर पाणी खर्च करावे लागते, तर 1 किलो गहू उगविण्यासाठी 1 हजार लीटर आणि 1 किलो भात उगविण्यासाठी 4 हजार लीटर पाण्याची आवश्यकता भासते. याप्रकारे भारतात 83% पाणी शेती आणि सिंचनासाठी उपयोगात आणले जाते.

सध्या देशात भूजल उपसा करण्यावर कुठलेही कायदेशीर नियंत्रण नसून फक्त अप्रत्यक्ष असे प्रशासकीय नियंत्रण आहे. जसे, वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठ्यासाठी संबांधित राज्यस्तरीय भूजल यंत्रणांकडून भूजल उपलब्धी व उपशा बाबत तांत्रिक मान्यता अनिवार्य केलेली आहे; त्याच बरोबर नाबार्ड कडून होणाऱ्या कर्जपुरवठ्यासाठी विहिरींमधील अंतराचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत, विहिरींवरील पंपांसाठी बँकांद्वारे घ्यावयाच्या कर्जासाठी विद्युतपुरवठा नाकारणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश आहे. परंतु कायद्याअभावी सधन शेतकऱ्यांना भूजल उपशाच्या संवेदनाशील क्षेत्रात विहिरी खोदण्यापासून परावृत करणे प्रशासकीय नियंत्रणाद्वारे शक्य होत नाही. त्यामुळे सधन शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून अधिक क्षमतेच्या विहिरी करतात व त्याचा विपरीत परिणाम जवळच्या उथळ विहिरींवर होतो.

पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तरतूदींचा समावेश असलेल्या कायद्याचा मसुदा केंद्र शासनाने सर्व राज्यांना सन 1968 मध्ये देऊ केला होता. भूजल वापराच्या विविध बाबी, त्याच्या उपलब्धतेसंबंधी तांत्रिक, शास्त्रीय आणि सुयोग्य विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा स्रोत संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम-1993’ तयार केला.

1993 सालच्या या कायद्याचा मुलभूत हेतू पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर आधारित स्त्रोत सुरक्षित ठेवणे हा आहे. म्हणजेच भूजल साठयांचे संरक्षण करणे आणि त्याच्या विविक्षित परिसरातील भूजलाच्या अतिउपशामुळे स्रोतांवर होणारे विपरीत परिणाम थांबविणे हा आहे.
काँग्रेसमधील मुस्लिम अध्यक्ष
#History : सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी..👇👇