The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#current
#international

📌IOC ने आगामी हिवाळी खेळांसाठी रशियावर बंदी घातली

🔹रशियाच्या ऑलंपिक संघाला दक्षिण कोरियाच्या पेयँगचंगमधील 2018 हिवाळी खेळात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. 

🔹WADA च्या डोपिंग चाचणीत रशियाचे खेळाडू मोठ्या प्रमाणात अयोग्य ठरत असल्यामुळे त्यांच्यावर वरचेवर प्रतिबंध घातले जात आहेत, अशा पार्श्वभूमीवर अलीकडेच आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) परिषदेने रशियावर घातलेल्या डोपिंग प्रतिबंधला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

🔹रशियाकडून डोपिंगमुळे काढून घेतलेल्या ऑलंपिक पदकांची एकूण संख्या 41 वर पोहचलेली आहे, जी दुसर्‍या क्रमांकावरील संख्येच्या चौपटीने जास्त आहे.

🔹मॅक्लारेन अहवालाने याची पुष्टी केलेली आहे की सन 2012 ते सन 2015 या काळात रशियात 30 हून अधिक खेळांमधील 1000 हून अधिक खेळाडूंना राज्य प्रायोजित डोपिंग प्रक्रियेत सवलत दिली गेली होती.

🔹आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) ही अॅथलेटिक्सच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. याचे मुख्यालय मोंटे कार्लो, मोनॅको येथे आहे. या महासंघाचे 215 सदस्य संघ आहेत. याची स्थापना 17 जुलै 1912 रोजी स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाली.
#current
#banking

📌RBI कडून प्रमुख व्याजदर 6% वर कायम राखले

🔹भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नव्या अहवालानुसार, त्यांचे मुख्य व्याजदर 6% वर कायम राखले जाणार आहे.

🔹RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय मौद्रिक धोरण समितीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत महागाई अंदाज 4.3-4.7% पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

🔹विक्रीकेंद्र यंत्रणेच्या वापराने व्यापार्‍यांचे जाळे वाढविण्याच्या उद्देशाने व्यापारी सवलती दर देखील तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला गेला.

🔹भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔹भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Forwarded from The MPSC Update ©
# ASO मुख्य परीक्षेसाठी काही सराव चाचण्या (Test Series) अपलोड करत आहे..

आयोगाच्या वेळेप्रमाणे शांत वातावरणात सोडवा...👇
मराठी - इंग्रजी टेस्ट क्र. 3...( ASO मुख्य साठी शेवटची टेस्ट )

मराठी विषयाची PDF उपलब्ध नाही त्यामुळे Photos पाठवत आहे..👇
इंग्रजी प्रश्नपत्रिका टेस्ट क्र. 3 PDF..👇
English Paper 4.pdf
मराठी-इंग्रजी Answerkey टेस्ट क्र.3..👆