The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
राफेल नदालवर मात करत वयाच्या ३५ व्या वर्षी रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीतील १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले. हा विजय खास यासाठी कारण, २००७ नंतर नदाल विरुद्धच्या सहा ग्रँडस्लॅम फायनल्स गमावल्यानंतर प्रथमच नदालविरुद्ध सरस ठरत फेडरर यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेता ठरला आहे. पाहुयात १८ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापर्यंतची फेडररची कामगिरी आणि आतापर्यंतच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील मास्टर ब्लासर्ट कोण होते ते या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇
First ans key of STI PRE 2016 held on--29/01/2017👇
मित्रांनो, STI पूर्व परीक्षेत 3-4 Questions Cancel होण्याची शक्यता आहे...त्यामुळे OPEN Category चा Final Cutoff 50 च्या जवळपास लागण्याची शक्यता आहे..

50+ स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज कमीतकमी 2 तास मराठी & इंग्रजी विषयासाठी द्यावेत...उरलेला वेळ General Studies ( सामान्य अध्ययन)साठी द्यावा...

मराठी विषयाची स्ट्रॅटेजी....👇👇👇👇
#income tax department

📌आयकर विभागाने ‘ऑपरेशन क्लीन मनी’ सुरू केले

🔹आयकर विभागाने (ITD) 31 जानेवारी 2017 रोजी ‘ऑपरेशन क्लीन मनी’ या मोहिमेला सुरवात केली आहे.

🔹मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016  दरम्यानच्या काळात झालेल्या मोठ्या रकमेच्या ठेवींचे इलेक्ट्रॉनिक सत्यापन केले गेले आहे.

🔹आयकर विभागाकडील माहितीसह नोटाबंदीच्या माहितीची तुलना करण्यासाठी माहिती विश्लेषण (Data analytics) याचा वापर केलेला आहे.

🔹पहिल्या तुकडीमध्ये ज्यांचा रोख व्यवहार करदाताच्या स्वरूपाला अनुसरून नाही असे एकूण 18 लाख व्यक्ती ओळखले गेले आहेत. अश्या व्यक्तींची तपासणी आयकर विभागाकडून केले जात आहे.

🔹जर यासंबंधीच्या रोख ठेवी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) अंतर्गत जाहीर केले असेल, तर त्यांची तपास प्रक्रिया बंद करण्यात येईल.
#radio

📌ऑल इंडिया रेडिओ तर्फे FM साईनगर शिर्डी वहिनीचीसुरूवात

🔹प्रसार भारतीकडून 1 फेब्रुवारी 2017 पासून “साईनगर शिर्डी” या विशेष FM वाहिनीची सुरुवात केली आहे.

🔹शिर्डी आणि मंदिराच्या आसपासचा सुमारे 25 किलोमीटरमधील भागात ही वाहिनी प्रसारित केली जाणार आहे. 

🔹ही वाहिनी 103.7 MHz वर ऐकायला मिळणार.

🔹या वाहिनीवरून शिर्डीच्या मंदिरात होणारी भजने, आरत्या आणि इतर कार्यक्रमे यांचे थेट प्रक्षेपण ऐकायला मिळणार आहे. 

🔹कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रसारित केली जात आहे.

🔹हे या प्रकारचे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे रेडियो स्टेशन आहे.

🔹देशातील पहिले देवालयाचे रेडियो केंद्र ‘तिरूपतीचे रेडियो स्टेशन’ हे आहे.
#science
#disease

📌भारतात स्पर्श कुष्टरोग जागृती मोहीमेला सुरुवात

🔹केंद्र सरकारने जागतिक कुष्टरोग दिनानिमित्त (जानेवारीचा शेवटचा रविवारी) देशभरात "स्पर्श कुष्टरोग जागृती मोहीम (SLAC)" याला सुरुवात केली आहे.

🔹रोगाच्या सुरुवातीच्या काळातच कुष्टरोगाचे निदान आणि उपचार करण्यामध्ये लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि रोगाबद्दल जनजागृती करण्याकरिता ही मोहीम राबवण्यात येत आहे.

🔹कुष्टरोग (Leprosy/महारोग) हा माइकोबैक्टीरियम लेप्रेइ या जिवाणूद्वारा होणारा एक तीव्र संसर्गजन्य रोग आहे आणि ते सहसा त्वचा आणि गौण नसांना प्रभावित करतात. कुष्टरोगाच्या प्रसाराचे माध्यम अजूनही ज्ञात नाही आहे. 

🔹WHO नुसार, जागतिक स्तरावर वर्ष 2015 मध्ये कुष्टरोगाची 2,12,000 नवीन प्रकरणे दिसून आलेत, त्यापैकी एकट्या भारतात 1,27,326 (60%) होते.
#international
#miss universe

📌मिस फ्रान्स - आयरिस मितेनाएरे हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला

🔹पॅरिसच्या 24 वर्षीय आयरिस मितेनाएरे हिने जगभरातील 85 सौदर्यवतींमध्ये सर्वोत्तम ठरत प्रसिद्ध सौदर्यवती स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला आहे.

🔹30 जानेवारी 2017 रोजी मनिला मध्ये ही तीन तासाची स्पर्धा पार पडली. 

🔹मिस हैती राकूएल पेलिस्सिएर ही पहिली उपविजेता आणि मिस कोलंबिया आंद्रेई टोवर ही दुसरी उपविजेता ठरल्या. 

🔹आयरिस मितेनाएरे ही दंत शस्त्रक्रिया विषयात पदवी घेत आहे.

🔹ती 1953 साली हा खिताब मिळवणार्‍या क्रिस्टीन मार्टेल नंतर दुसरी मिस फ्रान्स आहे.

🔹शिवाय 2002 सालापासून हा मुकुट मिळवणार आयरिस ही पहिली युरोपियन आहे.

🔹मिस युनिव्हर्स 2017 ही या वार्षिक स्पर्धेची 65 वी आवृत्ती होती.

🔹या वर्षी तिसर्‍यांदा फिलिपाइन्सने ही स्पर्धा आयोजित केली होती.

🔹मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरुवात 1952 साली झाली आणि ही मिस युनिव्हर्स संघटनेकडून घेतली जाते.

🔹यांचा ‘कोंफिडेंटली ब्यूटीफूल’ हा उद्देश आहे.   
#committee

📌केंद्र सरकारने पुढील तीन ऑलिम्पिक स्पर्धांसाठीच्या कृती योजनेवर कार्यदल नेमले

🔹युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या शिफारसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन ऑलिम्पिक 2020 2024, आणि 2028 स्पर्धांसाठी कृती योजना तयार करण्यासाठी कार्यदल (टास्क फोर्स) समिती नेमण्यास मान्यता दिली आहे.

🔹या 8 सदस्य समितीमध्ये पुलेल्ला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, राजेश कालरा, ओम पाठक, वीरेन रस्किन्हा, एस बलदेव सिंग, प्रा. जी. एल. खन्ना, संदीप प्रधान हे सदस्य आहेत.

🔹समितीचा कालावधी तीन महिने किंवा या कालावधीत अहवाल सादर करतपर्यंत असणार आहे. 
#research

📌सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकाच्या अत्याधिक संपर्कामुळे मधुमेह होऊ शकतो

🔹मदुराई कामराज विद्यापीठ, तामिळनाडू येथे शास्त्रज्ञांच्या अभ्यासामधून सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकाच्या अत्याधिक तीव्र संपर्कामुळे मधुमेह होतो असे निष्पन्न झाले आहे.  

🔹या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल 'जिनोमे बायोलॉजी' मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

🔹डॉ गणेशन वेलमुरुगन, आण्विक जीवशास्त्र विभाग, स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेस, मदुराई कामराज विद्यापीठ यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास केला गेला आहे.

🔹ऑर्गनोफॉस्फेट कीटकनाशकाच्या अत्याधिक तीव्र संपर्कामुळे मधुमेह होतो आणि मानव व उंदरांमध्ये ग्लुकोजच्या योग्य प्रमाणातील स्थिती कमजोर होते. ऑर्गनोफॉस्फेट-प्रेरित मधुमेह हा आतड्यामधील जीवाणूच्या मध्यस्तीमधून होत असल्याचे आढळून आले आहे.
#forex india

📌भारताच्या फॉरेक्समध्ये $ 932,4 दशलक्षची वाढ होऊन ते $ 360.775 अब्जवर

🔹भारतातील परकीय विनिमय किंवा फॉरेक्समध्ये 20 जानेवारी 2017 पर्यंत $ 932.4 दशलक्षची वाढ होऊन $ 360.775 अब्ज इतके झाले आहे.

🔹फॉरेक्स मधील मुख्य भांडवल म्हणजे परकीय चलन मालमत्ता असते.

🔹मात्र, देशातील सोन्याचा साठा $ 18.584 अब्ज किंमतीवर असून मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात कोणताही बदल झालेला नाही.

🔹शिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये भारताची साठ्यासंबंधी स्थिती या दरम्यान $ 3.7 दशलक्षने वाढून ती $ 2,315 अब्ज वर आलेली आहे.
#environment

📌पश्चिम घाटात गाणार्‍या पक्ष्याची नवीन प्रजाती आढळली

🔹भारताच्या पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचावरील वनक्षेत्रात संशोधकांना गाणार्‍या पक्ष्यांच्या दोन नवीन प्रजाती आणि स्थानिक जाती आढळल्या आहेत.

🔹यासंबंधी शोध BMC एवल्यूशनरी बायोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

🔹छोट्या पंखाचे “शोलिकोला” (फ्लायकॅचर पक्ष्यासारखे) आणि लहान आकाराचे “मोण्टेसिंक्ला” (बब्लर पक्ष्यासारखे) या त्या दोन जाती आहेत.  

🔹शोलिकोला अशम्बुएंसिस प्रजातीचे पक्षी अगस्थ्यार मलाई पर्वतरांगेत आढळतात.  
#banking
#imp

📌इंडिया पोस्टला पेमेंट बँक सुरू करण्याचा परवाना मिळाला

🔹इंडिया पोस्ट ला परवानगी अंतर्गत पेमेंट बँकच्या व्यावसायिक बँकिंग कार्याला सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँक परवाना अलीकडेच दिला आहे.

🔹इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही हा परवाना मिळवणारी तिसरी संस्था झाली आहे. यापूर्वी भारती एअरटेल आणि पेटीएम यांना हा परवाना मिळालेला आहे.

🔶पेमेंट बँक

🔹पेमेंट बँक सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचे किमान भांडवल असणे आवश्यक आहे. 

🔹पहिल्या पाच वर्षासाठी, प्रवर्तकाची भागीदारी ही 40% च्या खाली असणे आवश्यक आहे.

🔹बँकेच्या इतर प्रकारापासून स्वत:ला वेगळे दर्शवण्यासाठी या बँक ला "पेमेंट बँक" या शब्दाचा वापर करणे आवश्यक आहे.

🔹पेमेंट बँका बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 22 अंतर्गत परवानाकृत केल्या जाईल आणि कंपनी कायदा 2013 अंतर्गत सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून यांची नोंदणी केली जाणार आहे.🔹

🔹भारतातील खाजगी बँकांसाठी असलेल्या FDI नियमानुसार, या बँकांमध्ये परदेशी भागभांडवलाला परवानगी दिली जाणार.

🔹या बँका प्रती खाते सध्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादित रकमेच्या ठेवी स्वीकारु शकतील.नॉन-बँकिंग कार्य चालवण्यासाठी या उप-कंपनी तयार करू शकत नाही.

🔹ही बँक कर्ज देऊ शकत नाही.🔹

🔹बँक च्या 25% शाखा या बँकिंग सुविधा नसणार्‍या ग्रामीण भागात असणे आवश्यक आहे.

🔹बँक मोबाइल फोन च्या माध्यमातून पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे ही सेवा सुरू करू शकते.

🔹बँक फोन द्वारे बिलाचा स्वयंचलित भरणा करणे आणि कॅशलेस खरेदी, चेकलेस व्यवहार अश्या सेवा देऊ शकते.

🔹बँक सर्व बँकांच्या ATM नेटवर्क वर वापरण्यायोग्य डेबिट कार्ड आणि ATM कार्ड जारी करू शकते.पेमेंट बँक या बँक खात्यांमध्ये पैसे थेट हस्तांतरित करू शकते.

🔹बँक प्रवासीला फॉरेक्स कार्ड प्रदान करू शकते, जे संपूर्ण भारतात डेबिट किंवा ATM म्हणून वापरण्यायोग्य राहणार.बँक इतरांच्या तुलनेत कमी शुल्क आकारून फॉरेक्स सेवा देऊ शकते.

🔹बँक 'ऍपल पे' सारख्या थर्ड पार्टी कडे कार्ड स्वीकृती यंत्रणा देऊ शकते.
#payment bank
#imp

🔹23 सप्टेंबर 2013 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली लहान व्यवसाय आणि अल्प उत्पन्न कुटुंबांसाठी सर्वसमावेशक वित्तीय सेवा समिती स्थापन केली होती.

🔹या समितीकडून सादर करण्यात आलेल्या विविध शिफारसीमध्ये पेमेंट बँक च्या निर्मितीचा मुद्दा मांडण्यात आला. त्यादृष्टीने, 27 नोव्हेंबर 2015 रोजी RBI ने पेमेंट बँक साठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

🔹फेब्रुवारी 2015 मध्ये, RBI कडून पेमेंट बँक च्या परवान्यासाठी अर्ज केलेल्या 41 अर्जदारांची यादी जाहीर केली.

🔹28 फेब्रुवारी 2015 रोजी सादर केल्या गेलेल्या अर्थसंकल्पात, इंडिया पोस्ट हे पेमेंट बँक चालविण्यासाठी त्याच्या मोठ्या नेटवर्कचा वापर करणार, असे जाहीर केले गेले.

🔹नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली बाह्य सल्लागार समितीने 6 जुलै 2015 रोजी त्याचे निष्कर्ष सादर केले.

🔹 त्यानुसार, 19 ऑगस्ट 2015 रोजी, RBI ने पेमेंट बँक सुरू करण्यासाठी अकरा कंपन्यांना तत्वत: परवाने दिले. या 11 कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:

आदित्या बिर्ला नुवो लिमिटेड;
एयरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लिमिटेड; चोलामंडलम डिस्ट्रिब्यूशन सर्व्हिसेस लिमिटेड;
टपाल विभाग (इंडिया पोस्ट);
फिनो पेटेक लिमिटेड;
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL);
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड;
दिलीप शांतीलाल शांघवी;
विजय शेखर शर्मा;
टेक महिंद्रा लिमिटेड;
व्होडाफोन m-पेसा लिमिटेड

🔶देशातील प्रथम पेमेंट बँक - एअरटेल पेमेंट बँक – ला 23 नोव्हेंबर 2016 रोजी राजस्थान मध्ये सुरुवात झाली आहे.🔶
#award

📌प्रजासत्ताक दिन परेड पुरस्कार 2017 जाहीर

🔹प्रजासत्ताक दिन 2017 च्या परेड मध्ये सहभाग घेतलेल्या विविध स्पर्धात्मक सादरीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाकडून दरवर्षीप्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

🔹नाट्यपूर्ण प्रसंग प्रदर्शन श्रेणीत सहा केंद्रीय मंत्रालय / विभागांच्या समावेशासह एकूण 23 गटांनी सहभाग घेतला होता.

🔹नाट्यपूर्ण प्रसंग प्रदर्शन श्रेणीत विजेते राज्ये -
1.अरुणाचल प्रदेश
2.त्रिपुरा
3.महाराष्ट्र आणि तामिळनाडू
#sports

📌ऑस्ट्रेलियन ओपन 2017 महिला एकेरी स्पर्धेची विजेता:सेरेना विल्यम्स

🔹ऑस्ट्रेलियन ओपन 2017 स्पर्धेच्या महिला एकेरी गटात सेरेना विल्यम्स ने व्हीनस विल्यम्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले.

🔹यासोबतच, 1968 साली ग्रँड स्लॅममध्ये व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग स्वीकारल्या गेल्यापासून तिचे ऐतिहासिक 23 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावित स्टेफी ग्राफ चा विक्रम मोडला.

🔹या अमेरिकन खेळाडूने जर्मनीच्या एंजेलिक केर्बर हिला मागे टाकून क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले.
#ISRO

📌ISRO ने GSLV-Mk-III रॉकेटसाठी क्रायोजेणीकइंजिनची यशस्वीरित्या जमिनीवरील चाचणी घेतली

🔹भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय उपग्रह वाहक GSLV-Mk-III रॉकेटसाठी एक मोठे पाऊल उचलत देशातच विकसित क्रायोजेणीक इंजिनची यशस्वीरित्या चाचणी घेतली आहे.

🔹या वर्षी पहिल्या तिमाहीत या इंजिनचा अंतराळ मोहीमेत वापर करण्याचे नियोजित आहे.

🔹25 जानेवारी 2017 रोजी तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील ISRO प्रोपल्शन कॉम्पलेक्स (IPRC) केंद्रावर 50 सेकंदासाठी चाचणी घेण्यात आली.

🔹वाहकाला जास्तीत जास्त दाब प्रदान करते म्हणून क्रायोजेणीक इंजिन रॉकेटच्या अप्पर स्टेजमध्ये वापरले जातात. क्रायोजेणीकच्या या अप्पर स्टेजला ‘C25’ असे नाव देण्यात आले आहे.

🔹C25 क्रायोजेणीक टप्प्याचा विकासाला GSLV Mk-III च्या मंजूरीसोबतच सुरुवात केली गेली.

🔹GSLV Mk-III हे ISRO चे पुढील पिढीचे प्रक्षेपण वाहन आहे, जे पृथ्वीच्या भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (Geosynchronous Transfer Orbit -GTO) 4 टन वजनी वर्गाचे अंतराळयान सोडण्यास सक्षम आहे.

🔹 या वाहकामध्ये एक अर्थ स्टोअरेबल लिकुइड कोअर स्टेज आणि एक क्रायोजेणीक अप्पर स्टेज अश्या दोन सॉलिड स्ट्रेप-ऑन मोटर बसवलेल्या आहेत.

🔹एकदा का Mk-III पूर्णपणे तयार झाले, तर ISRO सर्व प्रकारच्या प्रक्षेपण क्षमतेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल.