The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
Physical Geo.pdf
या pdf मधील माहिती वर साधारण असे प्रश्न येवू शकतात:--
1. भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते?
2.भारताची पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी किती?
3.कर्कव्रत्त देशाच्या कोणत्या राज्यांतून जाते?
4.भारताला इतर देशांच्या लागलेल्या भौगोलिक/सागरी सीमा कोणत्या?
5.उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील पर्वतांचा पाया कशाचा बनलेला आहे?

@thempscupdate
The MPSC Update ©
Photo
1. संस्थान खालसा तत्व.. (Doctrine of Lapse) लागू केलेल्या राज्यांचे चढता/ उतरता क्रम..??

2. मराठे आणि इंग्रज युद्धे किती झाली..??

या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी डाव्या बाजूच्या फोटो ला touch करा..
The MPSC Update ©
Photo
1857 च्या उठावाचे परिणाम आणि मान्यवरांची मते...👆👆
The MPSC Update ©
Photo
👆👆👆 क्लिक करा...(असफलतेची कारणे आणि ब्रिटिशांचे साह्यकर्ते)...
The MPSC Update ©
Photo
👆👆👆इंग्रजी सेनापती आणि ठिकाण...

आयोगाने या वर अनेकदा प्रश्न विचारला आहे...
The MPSC Update ©
Photo
संविधानात एकूण भाग किती...??
The MPSC Update ©
संविधानाचे स्रोत आणि देश...
👆👆👆 Touch image to know....VIMP- संविधानाचे स्रोत....( देश )...या वर नेहमी प्रश्न विचारला जातो...
The MPSC Update ©
Himalay.pdf
या pdf वर असे प्रश्न येवू शकतात:-

१. हिमालयातील ४-५ शिखरांची नावे देवून त्यांना उंचीनुसार लावण्यास सांगतील.
२. हिमालयाच्या विविध रांगांना दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा.
(शिवा पाणी पिऊन झाल का:-- शिवालिक, पिरपंजाल,झास्कर,लदाख,काराकोरम)
३. मध्य हिमालय/शिवालिक/हिमाद्री यांची वैशिष्ट्ये,सरासरी उंची इ. विचारले जाण्याची शक्यता.
#RBI

📌RBI ने डेहराडून मध्ये बँकिंग लोकआयुक्त कार्यालय उघडले:--

🔹भारतीय रिझर्व्ह बँक ने डेहराडून मध्ये बँकिंग लोकआयुक्त कार्यालय (banking ombudsman office) उघडले आहे.

🔹देशातील बँकिंग नेटवर्क मधील लक्षणीय वाढ पाहता हे कार्यालय उघडले गेले आहे.

🔹डेहराडून कार्यालय हे कानपूर आणि चंदीगड नंतर उत्तर भारतातील तिसरे कार्यालय आहे. 

🔹यासोबतच भारतात आता RBI लोकआयुक्त कार्यालयाची एकूण संख्या 17 झाली आहे.🔹

🔹हे संपूर्ण उत्तराखंड कार्यक्षेत्र आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे सात जिल्हे सहारणपूर, शामली (प्रभूद नगर), मुझफ्फरनगर, बाघपत, मीरत, बिजनौर आणि अमरोहा (ज्योतिबा फुले नगर) क्षेत्र हाताळणार.  

🔹बँकिंग लोकआयुक्त कार्यालय हे ग्राहकांनी दाखल केलेल्या बँकिंग किंवा इतर सेवा मधील कमतरता संबंधित तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी आहे.
#imp day

📌24 डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिवस

🔹ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या (MoCAF&PD) ग्राहक व्यवहार विभागाकडून देशभरात 24 डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येत आहे.

🔶यावर्षी हा दिवस "ऑल्टरनेट कंज्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल" या संकल्पनेखाली साजरा होत आहे.🔶

🔹नवी दिल्ली येथे राम विलास पासवान, MoCAF&PD मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उद्घाटन केले गेले.

🔹यावेळी पर्यायी तंटा निवारण (Alternative Dispute Resolution -ADR) व्यवस्थेवर चर्चा केली गेली.

🔹ग्राहक संरक्षण विधेयक 2015 सह सरावात असलेल्या यंत्रणेमध्ये एक ADR यंत्रणा म्हणून मध्यस्थी ला समर्पित अशी तरतूद आहे. 

🔹यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे आणि ग्राहक शिक्षण देणे अश्या नवीन उपक्रमांना सुरुवात केली जाईल.

🔹24 डिसेंबर ला राष्ट्रपती यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 ला मान्यता दिली होती. 
#space

📌चीन ने जागतिक कार्बन उत्सर्जनाचे निरीक्षणकरण्याकरिता टॅनसॅट हे उपग्रह प्रक्षेपित केले:--

🔹चीन ने 22 डिसेंबर 2016 रोजी हवामानातील बदल समजून घेण्यासाठी जागतिक कार्बन डायऑक्साइड निरीक्षण उपग्रह ‘टॅनसॅट’ चे प्रक्षेपण केले आहे.

🔹याशिवाय, एक हाय रिझोल्यूशन मायक्रो-नॅनो उपग्रह आणि कृषी आणि वन निरीक्षणासाठी दोन स्पेक्ट्रम मायक्रो-नॅनो उपग्रह सोबत पाठवण्यात आले आहे.

🔹‘टॅनसॅट (TanSat)’ हे 620 किलो वजनी उपग्रह वायव्य चीनच्या गोबी वाळवंटमधील जियुक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्र वरून लोंगमार्च 2D रॉकेट च्या सहाय्याने कक्षेत पाठवण्यात आले.

🔹ही लोंगमार्च मालिकेच्या रॉकेटची 243 वी मोहीम आहे. 

🔹स्वत: च्या उपग्रहाच्या माध्यमातून हरितगृह वायूचे निरीक्षण करणारे जपान आणि अमेरिका नंतर चीन हे तिसरे राष्ट्र झाले आहे.🔹