The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Rohan Dongare
बारामतीचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक बंधुतुल्यमित्र, Room mate, classmate स्वप्नील हनुमंत चोपडे ( फाकळू😅) यांची
MIDC चाकण ते MPSC हा
खडतर संघर्षाचा दुष्काळ संपवून आज PSI पदी निवड झाली.. 💐💐💥💥👍👍

तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..
We are proud of you भावा👌👌
The MPSC Update © pinned «#PSI #inspiration #celebration शुभ प्रभात, माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇 @madhusudanrp»
हापूस आंबा इतिहास 🥭🥭
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका…

https://www.loksatta.com/sampadkiya/features/dr-babasaheb-ambedkar-jayanti-special-need-celebrate-ambedkars-thought-mrj-95-3588342/

१९४१ साली देवीदास नामदेव कांबळे या विद्यार्थ्यास उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोंचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही, असा समज करून घेतात! यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण आपण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही असे सांगून थकलो; पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.’ (जनता, १४ जून १९४१).
Forwarded from The MPSC Update ©
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त @thempscupdate चॅनेल तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from The MPSC Update ©
#Babasaheb : 🚨👆सर्व महत्वाच्या घटना

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती..👇

१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 

डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : 

Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Jinnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : 

मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).


४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : 

महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).


६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 

‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’

७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान : 

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.

९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता.

१०. बाबासाहेबांचे लेखन : 

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
👆 लोकसभेतील विविध राज्यांच्या जागा...👆

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
👆 लोकसभेतील महाराष्ट्रातील राखीव जागा...👆

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
कोणकोणत्या राज्यात लोकसभेच्या सगळ्या जागा General Category साठी असतात..? 👆

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/politymm1
#elections :भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध;


🚨कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या?
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.

मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.
#GROUPBC
#SWO

Central railway

🚩Join @thempscupdate
"इतकंही कठीण नाही" UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स

🚨अभ्यास किती तास केला यामुळे काही फारसा फरक पडत नाही. तर कशाप्रकारे केला हे महत्त्वाचं आहे असं ते सांगतात.” दरम्यान मी सुद्धा एकदा १८ तास अभ्यास केला होता मात्र त्यानंतर पुन्हा १८ तास झोपलो. त्यामुळे एवढा अभ्यास करायची गरज नसल्याचं ते सांगतात.😊👆

https://www.loksatta.com/trending/ias-officer-awanish-sharan-share-mpsc-examination-preparation-tip-explain-how-many-hours-study-required-to-pass-upsc-srk-21-4320796/