The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी

दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष 1

सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ

आमची आवडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2

आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3

तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4

होळीच्या पवित्र अग्निमध्ये कायमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा..!

पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!

- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

📍📝 परीक्षा : 19 मे, 2024

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
READ: अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
READ: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?
Forwarded from AmitS
Amit Pitambare STI Y-2023.pdf
307.9 KB
Amit Pitambare STI Y-2023.pdf
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

#offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
#talathi : फुकटचा सल्ला

आतापर्यंत आपल्या जवळचे अनेक मित्र / मैत्रिणी ह्या तलाठी पदावर हजर झाले असतील, पण जॉईन केलेल्या व त्यातील ज्यांनी याअगोदर #sse #mains राज्यसेवा मुख्य दिली असेल त्यांच्यासाठी -

1. प्रथमतः आपण स्पर्धा परीक्षेच्या पंचवार्षिक चक्रयुव्हातून बाहेर पडून Stability कडे वळलात, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💐

2. महसूल मध्ये भरपूर काही असते असा गोड गैरसमज ठेवून गेलेले व मागील काही वर्षांपासून #MPSC परीक्षेची तयारी करतोय पण यशाने अनेकवेळा हुलकावणी दिल्यानंतर पहिलीच नोकरी मिळालेले असे दोन्ही प्रवर्गातील यशस्वी, हुशार व होतकरू विद्यार्थी- मित्रांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -

i) तलाठी हे महसूल विभागातील ग्रामपातळीवरील अतिशय महत्वाचे पद आहे. (गट-क असले तरीही)
इतर विभागातील सर्व गट-क पदापेक्षा या पदाला निश्चितच जास्त महत्व व मान आहे.

ii) तलाठी पदावरून विभागीय परीक्षा विहित संधीत पास झालेले उमेदवार यांना अंदाजे 8 ते 10 वर्षात मंडळ अधिकारी ( 5 ते 6 तलाठ्यांचा बॉस ) पदावर बढती मिळते व पुढील 6 ते 8 वर्षात नायब तहसीलदार पदावर बढती मिळू शकते.

iii) ज्या विद्यार्थी-मित्रांनी मागील 5 वर्षात कमीतकमी 2 राज्यसेवा मुख्य दिल्या असतील अशा सर्वांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता जॉईन केल्यापासून 👉पुढील किमान 2 वर्ष फक्त आणि फक्त राज्यसेवा व इतर तत्सम गट-ब पदाची तयारी करावी.

3. तलाठी संघटना मागील काही काही वर्षापासून किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींना विभागीय नायब तहसीलदार परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर बढती मिळावी म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. सदर मागणी मंजूर झाली तर अनेक होतकरू तलाठी/ कारकून हे काही वर्षात नायब तहसीलदार होऊ शकतात.सदर मागणीला अनेक लोकांचा विरोध असू शकतो पण दबावगट जोरदार असेल तर रास्त मागणीची दखल शासन नेहमीच घेत असते.

असे अनेक फुकट सल्ले हवे असल्यास टेलिग्राम App वर मेसेज करा 👉 @madhusudanrp

For more info,
Join 👇

http://t.me/thempscupdate
2024 Day
👉7 April
#world health day

#Theme 2024=My Health,my Right

#currentaffairs

#SWO
#COMBINED 24
#SSE2024

Join @thempscupdate