The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

📍📝 परीक्षा : 19 मे, 2024

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
मित्रांनो परीक्षेचे निकाल येतात आणि जातात, एखाद्याची निवड होते, एखाद्याला अपयश येतं. घोटाळे, तीव्र स्पर्धा, शासनाची वेळखाऊ भूमिका यामुळे अनेक जणांना नैराश्य आल्याचे आजच्या मेसेज मधून समोर येत आहे. आम्ही खूप कमी संसाधन आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या चळवळीची मशाल मागील ५-६ वर्षांपासून सुरू ठेवलेली आहे. भ्रष्टाचाऱ्यांशी आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांशी लढा देण्यासाठी आम्ही आहोतच पण आपण हिम्मत हारू नका. ज्यांना या मेगा भरतीत नोकरी मिळाली नसेल त्यांनी एखादी कंपनी, खासगी नोकरी, व्यवसाय किंवा प्लॅन-B वर काम करायला आजपासूनच सुरु करा, अजून जास्त वेळ घालविल्यास कदचित खासगी क्षेत्रातील संधी सुध्दा हातच्या जातील. व्यवसाय किंवा एखादी नोकरी करून सुध्दा पोस्ट काढलेले अनेक उदाहरणे आहेत. वेळेचे योग्य नियोजन केल्यास खासगी नोकरी करून सुध्दा आपल्याला यश मिळू शकतं. आजचा संदेश त्या मित्रांसाठी आहे, काही निकालांमुळे नैराश्यात गेले आहेत, हताश झाले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी नेहमी सर्वांसोबत आहे, आपल्याला मनमोकळे बोलावेसे वाटल्यास आम्ही किंवा आमचे पदाधिकारी शक्य तो वेळ काढून आपल्यासाठी उपलब्ध असू,पण कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये ही विनंती.🙏

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
dma exam(1709549690).pdf
1.3 MB
dma exam(1709549690).pdf

नगर परिषद update
04-03-2024


Join @thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701
#typing #skilltest #groupCmains2023

अंतिम key निमित्ताने.....🌿🌿🌿

👉आज अंतिम key आली आहे. कुणाचे marks कमी झाले कुणाचे जास्त झाले आहेत.

👉मी वर 7 jan ला post टाकली होती की दोन महिन्यांत exam आहे असे ठरवून practice करा. व्यक्तिगत रित्या जे उमेदवार मला भेटले or msg through बोलत होते त्यांना मी दोन महिन्यानंतर ची तारीख देत होतो की तुमची exam या दिवशी आहे. काही मोजक्या उमेदवारांची तयारी पूर्ण  झाली आहे. काही अगदी पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहेत.

skill cut off कधी लागणार ?
skilltest कधी असणार ?

Skill cut off हा maximum 15 दिवसांमध्ये लागेल.

आयोगाने shorthand च schedule 15 april ला जाहीर केला आहे. माझ्या मताप्रमाणे यानंतर exam होऊ शकते. कदाचित मे चा पहिला week मध्ये.

ज्यांनी target पूर्ण achieve केले आहेत किंवा अगदी जवळ आहेत, त्यांनी आता typing सोबत पुढील अभ्यास continue ठेवण्यात हरकत नाही परंतु typing ला priority ठेवून.👍

ज्यांचे score कमी आहेत असे त्यांना वाटते ( including tax वाले)
म्हणजे मी skill cut off मध्ये असेन काय ? किंवा lead कमी आहे अंतिम निकालमध्ये माझे होईल का ?

हे अशे प्रश्न ह्या transition phase मध्ये येतच असतात. 10 - 15 दिवसात चित्र स्पष्ट होईल. तुम्ही आता फक्त typing कडे लक्ष द्या. एकदा general merit list मध्ये येन्याचा प्रयत्न करा. विविध प्राधिकरणे, opting out, इतर ठिकाणी आलेले अनेक उमेदवारांचे निकाल यामुळे अगदी कमी।score असेल आणि skill pass असेल तर आपण लागू शकतो. आपल्या hopes शेवटपर्यंत जिवंत ठेवा.

ज्यांना त्यांच्या score वर confidence येत नाही आहे व त्यांना वाटते की वेळ वाया जात आहे त्यांनी पुढील परीक्षेची तयारी करावी.

आणि पुन्हा एक

तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटत आहे की 1850-1900/ 1350-1400 एवढे झाले तरी चालतील का ? जर मी accurate मारले तर ....

आपल्या परीक्षेच्या भीतीमुळे असे प्रश्न निर्माण होतात. मलाही exam अगोदर असच वाटत होतं की कमीत कमी तेवढं तर झालंच पाहिजे.

सध्या target high ठेवा. वेळ आहे. Actual exam मध्ये आपले पूर्ण keystrokes बसतात.

Believe me

प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

Join @thempscupdate
शाब्दिक जोडे असे मारतात..! 👆
#elections : सर्व पक्षांनी पदभरती व पारदर्शक परीक्षा विषयी नक्कीच ठोस प्रयत्न करायला हवे..!
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#International : जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 👧👩‍🦰🧕👩‍🏭👩‍⚕🤵‍♀

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. महिलांना जगभरात अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. भारत मात्र याबाबत पहिल्या दिवसापासून अपवाद होता. भारतात सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.

का साजरा होतो महिला दिन?

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

भारतात कधी साजरा झाला महिला दिन?


भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

मतदानाचा अधिकार..कुठे, केव्हा

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्षे लागली. ब्रिटनमध्ये १०० वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात महिलांनी मतदान करू देण्यात सुरुवातीला काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचा विरोध होता. स्वित्झर्लंडमध्ये महिला मतदानासाठी १९७४ साल उजाडले. स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीपासून महिलांना मतदान करता येते. अनेक इस्लाम राष्ट्रांमध्ये अगदी अलीकडे २१ व्या शतकापर्यंत हा अधिकार वंचित ठेवण्यात आला होता.

संघर्ष सुरूच

महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी सरकरमध्ये प्रतिनिधित्व मात्र कमी आहे. अजूनही भारतात लोकसभेत, विधानसभांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मतदानाच्या पातळीवर महिलांच्या लढ्याला यश आलं असलं तरी मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याची गरज आहे.

t.me/thempscupdate
#talathi मा.उच्च न्यायालय,औरंगाबाद खंडपीठाच्या दणक्यानंतर विविध सत्रातील मिळून तब्बल 219 प्रश्नातील बदल 😇🙏

कोपरापासून दंडवत..🙏
#talathi तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत

लिंक :
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult