The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#current भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत विष्णू देव साय?
५९ वर्षीय आदिवासी नेते विष्णू देव साय यांनी कुनकुरी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) विधानसभा मतदारसघातून विजय मिळविला. त्यांनी दोन टर्म छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात ते केंद्रात मंत्री होते. तथापि, २०१९ साली त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली गेली नाही. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला होता. भाजपाचे केवळ १५ आमदार निवडून आले. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने अनेकांचे तिकीट कापून नव्या नेत्यांना संधी दिली होती.
जशपूर जिल्ह्यातील एका आदिवासी गावात २१ फेब्रुवारी १९६४ रोजी विष्णू देव साय यांचा जन्म झाला. संयुक्त मध्य प्रदेशमध्ये त्यांनी १९९० ते १९९८ पर्यंत आमदारकी भूषविली. त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग चार टर्म ते खासदार राहिले.

Join 👉 t.me/thempscupdate
#polity #current मध्य प्रदेशमध्ये BJP ने दिला मोठा धक्का, शिवराज सिंह नव्हे तर मोहन यादव होणार नवे मुख्यमंत्री

असा आहे मोहन यादव यांचा राजकीय प्रवास

१९६५ साली जन्मलेल्या यादव यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून १९८४ साली राजकारणात प्रवेश केला. त्यांच्याकडे उज्जैनची जबाबदारी दिली होती. १९८६ साली त्यांच्याकडे एबीव्हीपीच्या विभाग प्रमुखची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर लवकरच प्रदेशसह मंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. RSS मध्ये विद्यार्थी विभागाचे राष्ट्रीय मंत्री पदावर त्यांनी काम केले. त्याच बरोबर सह खंड कार्यवाह आणि नगर कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. १९९७ साली भाजपच्या युवा मोर्चामध्ये त्यांनी प्रवेश केला. २००३ साली मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले. २०११ साली शिवराज यांनी राज्य पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्षपद यादव यांच्याकडे दिले. २०१३ साली आमदार झाल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. यादव बीएससी व एलएलबीचे शिक्षण घेतले असून पीएचडीही केली आहे. २०२० साली राज्य मंत्रीमंडळात उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली.

t.me/thempscupdate
आपल्या @thempscupdate परिवाराचे सदस्य तथा Admin श्री. अमित पितांबरे ( @Amits012 ) यांची सहायक सहकार अधिकारी (ACO) पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..😊💐

https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts
The MPSC Update © pinned «आपल्या @thempscupdate परिवाराचे सदस्य तथा Admin श्री. अमित पितांबरे ( @Amits012 ) यांची सहायक सहकार अधिकारी (ACO) पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..😊💐 https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#art : 🚨अनुच्छेद ३७० घटनाक्रम

२० डिसेंबर २०१८ : जम्मू-काश्मीर राज्यात राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू.

२० डिसेंबर २०१८ : जम्मू-काश्मीर राज्यात राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू. त्यानंतर ३ जुलै २०१९ रोजी मुदतीत वाढ.

* ५ ऑगस्ट २०१९ : केंद्राकडून तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या अनुच्छेद ३७० च्या लागू केलेल्या तरतुदी रद्द.

* ६ ऑगस्ट २०१९ : वकील एम. एल. शर्मा यांच्याकडून अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणारी पहिली याचिका, नंतर जम्मू आणि काश्मीरचे अन्य वकील शाकीर शाबीर शर्मासह सहभागी.

* १० ऑगस्ट २०१९ : जम्मू-काश्मीरवासीयांच्या सार्वमताविना जम्मू-काश्मीरचा राज्य दर्जा रद्द केल्याने येथील नागरिकांचे अधिकार हिरावले गेल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’ची याचिका दाखल.

* २४ ऑगस्ट २०१९ : केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या जम्मू-काश्मीरमधील संपर्क यंत्रणेवर निर्बंध लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ची सर्वोच्च न्यायालयात धाव.

* २८ ऑगस्ट २०१९ : पत्रकारांवर लादलेले निर्बंध हटवण्यासाठी ‘काश्मीर टाइम्स’च्या संपादकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र, जम्मू-काश्मीर प्रशासनाला नोटीस.

* २८ ऑगस्ट २०१९ : हे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय.

* १९ सप्टेंबर २०१९ : अनुच्छेद ३७० रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना.

* २ मार्च २०२० : अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी विस्तारित सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

* २५ एप्रिल २०२२ : जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू असल्याने एका याचिकाकर्त्यांने तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर उन्हाळयाच्या सुट्टीनंतर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत.

* ११ जुलै २०१३ : अनुच्छेद ३७० संदर्भातील याचिकांवर २ ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर.

* २ ऑगस्ट २०२३ : अनुच्छेद ३७० रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी सुरू.

* ५ सप्टेंबर २०२३ : या प्रकरणातील २३ याचिकांवर १६ दिवस सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राखून ठेवण्याचा निर्णय.

* ११ डिसेंबर २०२३ : सर्वोच्च न्यायालयाकडून जम्मू-काश्मीरसाठी अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायम. पुढील वर्षी ३० सप्टेंबपर्यंत केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश.

🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

http://t.me/politymm1
#combined #GrC #mains2023 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

अखंड मेहनत केल्यामुळे फळ नक्कीच मिळेल..👍👍
#groupCmains2023
#skilltest
#typing

नमस्कार मित्रांनो

आज पेपर देऊन थकला असाल. इतक्या महिन्यानंतर थोडं relax वाटत असेल किंवा मनात marks बद्दल चलबिचल सुरू असेल. आता जोपर्यंत 1st key येत नाही तोपर्यंत पेपर कडे बघू नका. थोडा श्वास घ्या. आराम करा. आणि skilltest च्या practice कडे लक्ष द्या. Skill पास झाले नाही तर mains मधल्या marks च्या lead असून फायदा नाही. खाली असलेल्या video मध्ये skilltest बाबद सर्व माहिती दिली आहे.

प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022
#IPL
#mitchellstarc Australia

Most Expensive player of all time
#currentaffairs

Join @thempscupdate

साभार x 🙏
मा आयोगाने प्रशासकीय कारण देत वरील परीक्षांच्या mains फक्त नवी मुंबई येथे ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांचा  हिताचा विचार करून विभागीय स्तरावर परीक्षा आयोजित केल्या पाहिजेत. गडचिरोलीतील सिरोंचा, एटापल्ली गोंदियातील सालेकसा, देवरी या भागातील सुद्धा उमेदवार परीक्षा देत असतात. त्यांना मुंबई 900 ते 1000 km पडते. उमेदवारांना होणारा आर्थिक भुर्दंड चा विचार होणे गरजेचे आहे. जर विभागीय स्तरावर शक्य होत नसेल तर देशात केंद्रीय स्तरावर विविध परीक्षेसाठी Travel Allowance मिळतो, तसाच या उमेदवारांना मिळाले पाहिजे. आयोगाची policy ही उमेदवार केंद्रित असावी.

Join @thempscupdate
🔅🔅विषय नंबर एक🔅🔅
महिनाभर निवांत राहून शेवटच्या दिवशी फॉर्म भरणाऱ्या आळशी लोकांसाठी जे प्रशासनात जाऊन जनतेची कामे सुद्धा अशीच खोळंबवून ठेवणार अश्या लोकांसाठी, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी एक वर्ष मुदत दिली तरी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरणाऱ्यासाठी (खरच आर्थिक अडचणी असलेले वगळता) ट्विटर वार घेणाऱ्या सन्माननीय telegram चॅनल admin साहेबांना झालेल्या परीक्षांचा निकाल, नियुक्ती यासाठी काही करावं यांचा विसर का पडतो..??

🔅🔅विषय नंबर दोन🔅🔅
निरनिराळ्या कारणावरून भरती कोर्टात खेचल्या जातायत. मुद्दाम कोर्टात जाणारा, भरती प्रक्रिया लांबवनारा एक गट तयार झालाय जेणेकरून भरती प्रक्रियेला विलंब व्हावा..?? हे जाणीवपूर्वक केले जातेय का..?
भरती प्रक्रिया लांबली की नियुक्त्या लांबणार त्यामुळे सरकारला आम्ही एवढी भरती केली हे सांगता येणार नाही म्हणजेच credit घेता येणार नाही आणि एखाद्या विशिष्ट पक्षाला/सरकारला क्रेडिट मिळू नये म्हणून ह्यामागे काही राजकीय स्वार्थ आहे का..???
ह्या राजकीय श्रेय वादात सामान्य विद्यार्थी भरडला जातोय का...??

Think on it
जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Clerk 21 waiting लागणे जवळपास अशक्य गोष्ट होती .
सुरुवातीला मंत्रालय तसेच आयोगतूनही पूर्णपणे नकारात्मक प्रतिसाद होता.
तसेच विद्यार्थ्यांचाही कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता.

असे असतानाही आम्ही 3 idiots एकत्र आलो आणि आणि शेवटी waiting list खेचूनच आणली...

3 idiot's

🔺1) शुभम राजू गोंड
🔺2) महेश शिवलिंग गोरे
🔺3) सुयोग हांडोरे


आणि आम्हाला प्रशासनातील खालील दोघांची खुप खूप मोलाची मदत लाभली...

🔸1) कोहिनूर जितकर सर
🔸2) विवेक पाटील सर

यांचे मनापासून खुप खुप आभार मानावे तेवढे कमीच.....💐💐💐


या सर्वामुळेच आज 142 मुलांच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्यांचे कुटुंब सुखी झाले.

आम्हाला कळत नकळत प्रयत्न केलेल्या सर्वांचे मनापासून आभार 💐💐💐💐


महेश शिवलिंग गोरे
      लिपिक टंकलेखक 2021
DOC-20231226-WA0123..pdf
2.9 MB
⛳️कर सहायक 2022

कागदपत्रे पडताळणी

2 jan ते 17 jan 2024

Join @thempscupdate
The MPSC Update ©
🔅🔅विषय नंबर एक🔅🔅 महिनाभर निवांत राहून शेवटच्या दिवशी फॉर्म भरणाऱ्या आळशी लोकांसाठी जे प्रशासनात जाऊन जनतेची कामे सुद्धा अशीच खोळंबवून ठेवणार अश्या लोकांसाठी, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी एक वर्ष मुदत दिली तरी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरणाऱ्यासाठी (खरच आर्थिक अडचणी…
तलाठी रिझल्ट साठी खालील ट्विट ला रिट्विट करा

https://x.com/insightmpsc/status/1740201707441979620?t=DMtO2E-Cm5oTUAtzvtUrcQ&s=35


https://x.com/MpscGuidance/status/1739924618612551961?t=jk4Eb4f1D2Q0D2qw3BFHrg&s=35


https://twitter.com/BaliramDoley/status/1740228576589607200?s=20

https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1740244348099551575?t=g7qFA8sJNXnDRUP2dWqe9g&s=19

आपल्या पोस्टची दखल घेऊन सर्व telegram चॅनलनी तलाठी निकालाबाबत ट्विटर वॉर सुरू केले आहे त्याबद्दल सर्व telegram channel admins चे आभार..🙏

सर्वांनी रिट्विट करा..
#groupCmains2023 #skilltest #typing

गट क लिपिक कौशल्य चाचणीसाठी English निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भासाठी 2021 चा english passage.

वरील passage मध्ये

Correct words 390
Incorrect words 9

🔴महत्त्वाचे🔴

Skilltest साठी नेमके कोणते निकष आहेत हे सर्वात अगोदर माहीत पाहिजे. तरच लढाईला सुरवात करण्यात अर्थ आहे.

🔸English typing🔸

सुरवातीच्या 2000 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.

90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी

उदा. आयोगाने दिलेल्या passage मध्ये 2100 key depression असतील ( सहसा आयोग english मध्ये 2000 च्या आसपास च देतो ) तर शेवटचे 100 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे

सुरवातीच्या 2000 चे समजा 400 शब्द बनत असतील

तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 360 शब्द अचूक यायला हवेत.

आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 372 शब्द अचूक यायला हवेत.

खाली आयोगाचे परिपत्रक जोडत आहे. काळजीपूर्वक वाचा.

प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

Join @thempscupdate
🔸मराठी typing🔸

सुरवातीच्या 1500 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.

90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी

उदा. आयोगाने दिलेल्या passage मध्ये 1650 key depression असतील  तर शेवटचे 150 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे

सुरवातीच्या 1500 चे समजा 236 शब्द बनत असतील

तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 212 शब्द अचूक यायला हवेत.

आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 219 शब्द अचूक यायला हवेत.
Forwarded from MPSC
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123