The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!
🙏🌺 श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
128 वे घटनादुरुस्ती विधेयक, नारी शक्ती वंदन अधिनियम..👆
चांगली गोष्ट आहे, एका तरी लोकप्रतिनिधीला आपले प्रॉब्लेम नीट समजले आहेत..😊👍

वेळ असेल, पुण्यात असाल तर नक्की जा
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#constitutional #amendments

🚨106 वी घटनादुरुस्ती / 128 वे घटनादुरुस्ती विधेयक : नारी शक्ती वंदन अधिनियम (33% महिला आरक्षण लोकसभा व विधानसभा मध्ये )

🚨 105 वी घटनादुरुस्ती / 127 वी घटनादुरुस्ती विधेयक : SEBC नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना

🚨 104 वी घटनादुरुस्ती / 126 वे घटनादुरुस्ती विधेयक : SC & ST राजकीय आरक्षण 25 जानेवारी,2030 पर्यंत

🚨103 वी घटनादुरुस्ती/ 125 वे घटनादुरुस्ती विधेयक : #ews आरक्षण { कलम-15 & 16 मध्ये बदल }

🚨 102 वी घटनादुरुस्ती / 123 वे घटनादुरुस्ती विधेयक : NCBC ( राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोग) :
घटनात्मक संस्था


🚨101 वी घटनादुरुस्ती/ 122 वे घटनादुरुस्ती विधेयक : #GST

🚨100 वी घटनादुरुस्ती / 119 वे घटनादुरुस्ती विधेयक : भारत-बांगलादेश भूमी सीमा विधेयक

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
अशी कारवाई नेहमी सर्वांसाठी केली तर खरंच अभिनंदन करता येईल..!
आली लहर, आणि केला कहर असे जमणार नाही..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 #women #reservation #bill

लोकसभेत पारित : 19 सप्टेंबर, 2023 ( 454 वि. 2 - MIM )

राज्यसभेत पारित : 21 सप्टेंबर, 2023 (215 वि. 0 )


परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Polity By M.M. ( 2.0 )
128 वे घटनादुरुस्ती विधेयक, नारी शक्ती वंदन अधिनियम..👆
महिला आरक्षण विधेयक जनगणनेमुळे 2029 नंतरच?

- देशात सध्या उपलब्ध जनगणना 2011 ची आहे.

- 2021 ची जनगणना कोरोनामुळे सुरु झाली नाही आणि अद्यापही हालचाल नाही.

- मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकात तरतूद आहे की हे विधेयक आल्यानंतर होणाऱ्या पहिल्या जणनणनेच्या आधारे पुनर्रचना होऊन हे आरक्षण लागू होईल.

- कोरोनामुळे जनगणना रखडली नसती तर 2031 च्या जनगणनेनंतरच हे महिला आरक्षण लागू झालं असतं.

- पण आता 2021 ची रखडलेली जनगणना पुढच्या दोन वर्षात पार पडली तर 2026 नंतर नव्यानं पुर्नरचना होऊ शकते.

- त्या स्थितीत 2029 च्या निवडणुकीसाठी महिला आरक्षण लागू होण्याचा मार्ग उपलब्ध आहे. 
या विधेयकात ओबीसी महिलांसाठी आरक्षण लागू नाही असा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला. पण मुळात सध्याच्या व्यवस्थेत केवळ एससी, एसटी, सामान्य असे तीनच राखीव मतदारसंघ लोकसभा, विधानसभेला असतात. ओबीसींना राजकीय आरक्षणच उपलब्ध नाही
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणा-या आणि स्वातंत्र्यचळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणा-या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. दि. २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज (कोल्हापूर) गावी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर केले. शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचे निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती. त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होते. ‘प्रत्येक खेडय़ात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारा आणि ते प्रत्यक्षात उतरविणारा हा कर्मवीर- ज्ञानदूत दि. ९ मे १९५९ रोजी निधन पावला. आज त्यांचा स्मृतिदिन.

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
पद्मभूषण_डॉ_कर्मवीर_भाऊराव_पाटील
जन्म 22 सप्टेंबर 1887
आशिया खंडातील सर्वात मोठ्या म्हणजेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच राजर्षी छत्रपती शाहु महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतीदिन ...
मृत्यू 9मे 1959
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली.
२५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’.
यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स.
१९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[१] श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे.
सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली...
The history of Daughters' Day can be traced back to India, where it was first celebrated in 2007. The day was founded by Ramchandra Siras, a social activist who wanted to raise awareness of the importance of girls and women in society.
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate
#jobs #talathi #ResponseSheet 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

🚨 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर

#result पण लवकरच लागेल, ही अपेक्षा..!

@thempscupdate
#jobs #TO #exam : 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#DMA #advt #TO.pdf
3.6 MB
🚨 नगरपरिषद संपूर्ण जाहिरात #TO #advt


Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #TO #syllabus आता फक्त अभ्यास करा..!!! पुन्हा संधी मिळणार नाही..👈👈👈