The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Mission 70+...!!! (MADHUSUDAN N R P)
Preferences देताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-👇

1. तुमची कोणत्या प्रवर्गातुन निवड झाली आहे

2. तुमची आवड ( Field / Desk Job )

3. पोस्टिंग चे ठिकाण
उदा.
i) कक्ष अधिकारी हा पदाची सामान्यतः पोस्टिंग मंत्रालय, मुंबईत असते.
ii) ACST ह्या पदाची प्रथमतः पोस्टिंग पुणे/मुंबईत असते आणि त्यानंतर जिल्हा मुख्यालयात
iii) महसूल व ग्रामीण विकास विभागातील बहुतांश नियुक्ती तालुकास्तरावर असते.

4. ग्रेड पे / पे मॅट्रिक्स
उदा. उपशिक्षणाधिकारी , कक्ष अधिकारी आणि ARTO पदाचा गट-ब मध्ये सर्वात जास्त आहे.

5. Educational Qualification & Physical Standards

टीप- Preferences क्रम कसा द्यावा हा प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक विषय असला तरी त्यातून काही शासकीय संकेत, पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी याची जाणीव उमेदवाराला आहे का याची फक्त पडताळणी केली जाते.
The MPSC Update © pinned «Preferences देताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-👇 1. तुमची कोणत्या प्रवर्गातुन निवड झाली आहे 2. तुमची आवड ( Field / Desk Job ) 3. पोस्टिंग चे ठिकाण उदा. i) कक्ष अधिकारी हा पदाची सामान्यतः पोस्टिंग मंत्रालय, मुंबईत असते. ii) ACST ह्या पदाची प्रथमतः पोस्टिंग…»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
सदरील #cutoff अंदाज @thempscupdate ने 16 ऑक्टोबर, 2022 रोजी व्यक्त केला होता..👆

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#SRO #Syllabus : 🚨 दुय्यम निबंधक मुख्य परीक्षा पेपर-2 अभ्यासक्रम..👆

#Combined #GrB #Mains #P1 सर्व गट-ब अराजपत्रित पदांसाठी सारखाच आहे.

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 2. सद्यस्थितीत @thempscupdate #PSI वगळता…»
#PIN : Feb 2023 : Appointments
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#International : जागतिक महिला दिनाचं मतदान कनेक्शन!

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. महिलांना जगभरात अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. भारत मात्र याबाबत पहिल्या दिवसापासून अपवाद होता. भारतात सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.

का साजरा होतो महिला दिन?

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

भारतात कधी साजरा झाला महिला दिन?


भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

मतदानाचा अधिकार..कुठे, केव्हा

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्षे लागली. ब्रिटनमध्ये १०० वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात महिलांनी मतदान करू देण्यात सुरुवातीला काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचा विरोध होता. स्वित्झर्लंडमध्ये महिला मतदानासाठी १९७४ साल उजाडले. स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीपासून महिलांना मतदान करता येते. अनेक इस्लाम राष्ट्रांमध्ये अगदी अलीकडे २१ व्या शतकापर्यंत हा अधिकार वंचित ठेवण्यात आला होता.

संघर्ष सुरूच

महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी सरकरमध्ये प्रतिनिधित्व मात्र कमी आहे. अजूनही भारतात लोकसभेत, विधानसभांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मतदानाच्या पातळीवर महिलांच्या लढ्याला यश आलं असलं तरी मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याची गरज आहे.

t.me/thempscupdate