The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

🛑विशेष म्हणजे १६६ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी ५७ मिनिटं लागली होती. आता १६६ वर्षांनंतरही हे अंतर पार करण्यासाठी स्लो लोकलने साधारण तेवढाच वेळ लागतो.

@thempscupdate 👇

https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3142412/know-here-interesting-facts-about-indian-railways-irctc-prp-93/15/
#Geo #combined #Prelims #analysis

भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व त्यानंतर प्राकृतिक भूगोल
1) राजकीय
2) प्राकृतिक
3) खनिज संपत्ती
4) वने
5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य
6) नदी प्रणाली
7) लेण्या , गरम पाण्याचे झरे , धबधबा
या वरील बाबींवर दरवर्षी किमान एक प्रश्न

लोकसंख्या , भारताची लोकसंख्या व महाराष्ट्राची लोकसंख्या यात दशवार्षिक वाढ व साक्षरता,घनता यास जास्त महत्त्व द्यावे किमान दोन प्रश्न

भारताचे राजकीय सीमा , नदी प्रणाली व प्राकृतिक भूगोल या घटकांवर किमान एक प्रश्न

#credits - #Amit P

http://t.me/thempscupdate
#awards : नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा  लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.  आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात लीलया संचार केला आहे. सन १९७३ सालापासून १९९२ पर्यंत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सन १९९६ ते २००० या कालावधीत पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूरसारख्या’ नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ‘झुलता पूल’, ‘मेमरीख् भजन’,‘सामना’ आदी एकांकिका, ‘बेगम बर्वे’, ‘शनवार-रविवार’,‘महानिर्वाण’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. 

@thempscupdate 👇

https://www.loksatta.com/maharashtra/prestigious-vishnudas-bhave-gaurav-padak-award-to-playwright-satish-alekar-zws-70-3145021/
The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व व त्यानंतर प्राकृतिक भूगोल 1) राजकीय 2) प्राकृतिक 3) खनिज संपत्ती 4) वने 5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य 6) नदी प्रणाली 7) लेण्या , गरम…
👆👆#Geo #combined #Prelims #analysis केल्यावर-

2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇

वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक

2021 07 06 02

2020         08              05            02

2019 12 02 01

2018 12 02 01

2017 07 06 02

परिक्षाभिमुख अशा पोस्टसाठी आपल्या चॅनेलची लिंक 👇 Join करा व Forward करा 👇

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «👆👆#Geo #combined #Prelims #analysis केल्यावर- 2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇 वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक 2021 07 06 02 2020        …»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ / खतीब
२. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
३. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )

#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇

Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

🚨टीप - सदरील
#Booklist - 2015 पासून सतत #GS मध्ये 100+ #score असणाऱ्या उमेदवारांकडून..☺️

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from Shri
Imp point
🚨 The MPSC Update चॅनेलचा आतापर्यंतचा प्रवास व सद्यस्थितीतील भूमिका (भाग-1⃣ ) 👇👇👇

🛑 मित्रांनो, 7 ऑक्टोबर, 2016 रोजी अधिकृतरित्या आपण सुरवातीला " MPSC Update " ( सध्याचे नाव - The MPSC Update ) हे Public Telegram चॅनेल सुरू केले.

❇️ 2014 पासून सतत PSI/STI/ASO व राज्यसेवा मुख्य परीक्षा देणारा मी 2016 साली एकदम कमी मार्कने माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा हुकली. तेव्हाचा सामाजिक दबाव, घरच्यांचे नकळत जाणवणारे Pressure, सोबतच अभ्यास करत असलेले अनेक मित्र वेगवेगळ्या विभागात उच्चपदावर जॉईन झाले असल्याने आपण ज्या चुका केल्यात त्या इतर ग्रामीण विद्यार्थी-मित्रांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रथमतः Whatsapp वर अनेक Mains ची तयारी करणाऱ्या ग्रुप वर विविध अभ्यासपूर्ण व परिक्षाभिमुख माहिती Share करत असल्याने माझ्या धायरी लायब्ररीमधील एका मित्राने ( सद्या तो मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून त्याच्या यशात माझा सिंहाचा वाटा आहे, असे त्याचे मत आहे..! )
मला त्यावेळी सर्व गरजूंना मदत करण्यासाठी Telegram Channel तयार करण्याचा सल्ला दिला. ( तोपर्यंत #MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्रात प्रथमच #sse #mains2016 च्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ व त्यातील पान क्रमांकसहित आमच्या "तत्कालीन MPSC Update टीम" ने तयार केलेली PDF सर्वत्र Viral झाली होती. मार्केटमधील अनेक लोकांनी आमच्या टीम मधील अनेक सदस्यांवर जाळे टाकायला सुरवात केली होती आणि तुम्ही आमच्याकडे शिकवायला या हा तगादा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू केला व काही महाशयांनी तुम्ही क्लास सुरू केला पाहिजे हे झेंगट मागे लावायला सुरवात केली.

✳️ मुळात तत्कालीन टीम मध्ये मूळ सदस्यांपैकी मी एक सदस्य असल्याने माझ्या शब्दाला नक्कीच महत्त्व होते त्यामुळे तेव्हा जोपर्यंत आपल्या लिखाणाला विद्यार्थी-मित्रांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत क्लास काढायचा नाही या विचारावर ठाम असल्याने-

✳️आम्ही सर्वप्रथम 4 जणांनी MPSC Update तर्फे पुण्यातील एका प्रसिद्ध प्रकाशनाकडे "राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण-2016" पुस्तक प्रकाशित केले, मुळात या पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेत मूळ मटेरियल लिखाण करून अंतिम पुस्तक छपाईला येईपर्यंत मी व माझा एक जुना मित्र यांनी अपार कष्ट केले. ( 🚨 या पूर्ण प्रवासात आम्ही दोघे राज्यसेवा या मूळ ध्येयापासून पूर्णतः बाहेर फेकलो गेलो होतो, पण अगोदरच सांगितल्याप्रमाणे तेव्हाची आर्थिक परिस्थिती व सामाजिक दबाव हे मुख्य कारण होते )

💎 म्हणता म्हणता "प्रसिद्ध प्रकाशन" ( महाराष्ट्रातील Top 5 मध्ये या प्रकाशकांची गणना होते ) यांचेकडून पुस्तक प्रसिद्ध झाले व अल्पावधीतच या संस्थेच्या मूळ मालकांना आमच्या पुस्तकाविषयी अतिशय चांगले अभिप्राय आले. मुळात शांत स्वभाव असलेल्या व फार कमी लोकांना ते भेटत असणारे आम्हाला दोघांना त्यांनी वैयक्तिक भेटायला बोलावले, आदरातिथ्य व सन्मान केला आणि हळूहळू एक दिवस त्यांच्यातर्फे व त्यातील एका मध्यस्थातर्फे त्यांच्या संस्थेसाठी निवासी अकॅडमी सुरू करावी हा प्रस्ताव ठेवला.

🚨 मुळात येथेच राजकारण सुरू झाले व राज्यसेवा हे मूळ ध्येय आम्ही पूर्णपणे विसरलो ( मार्केट एकदम बेकार ) अकादमी / क्लास काढणे आमच्या दोघांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याने आम्ही ही टीमचा विस्तार करण्याचे ठरवले. प्रत्येक सदस्यांनी स्वतःचे मेहनतीचे पैसे कुटुंब व इतर नातेवाईकांकडून जमा केले. सर्वजण मेहनती व काही करण्याची जिद्द असलेले सदस्य असल्याने या आमच्या परिवाराचे चळवळीत रूपांतर झाले पण मार्केटमध्ये टिकायचे असेल तर सर्व Strategy वापरावी लागते मुळात कुठलाही भक्कम आर्थिक आधार नसताना आम्ही " लहान तोंडी मोठा घास " घेत होतो, हे सर्व समजत होते पण मनाची तयारी होत नव्हती.

काही मोजक्या सदस्यांपासून सुरू केलेल्या आमच्या एका चॅनेलचे रूपांतर छोट्याशा चळवळीत व नंतर त्याचे अकॅडमीमध्ये रूपांतर ( जसे एका चांगल्या चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात होते तसे ) झाले. अल्पावधीतच सर्वांनी अपार मेहनत घेतल्याने अकॅडमीचे अनेक विद्यार्थी कमी काळात यशस्वी झाले.

मित्रांनो, चळवळीला यश मिळायला लागले की लोकांची नजर लागते त्याप्रमाणे पारदर्शकतेचा अभाव, अमाप खर्च, वैचारिक मतभेद यामुळे त्यात फूट पडते हा आपला इतिहास आहे. या काळात "राज्यसेवा मध्ये गट-अ पद मिळवणे" हे स्वप्न स्वतःचे होते हे विसरून फक्त स्वतः ज्या विषयात पारंगत आहेत, त्याविषयी विद्यार्थी-मित्रांना मार्गदर्शन करणे हे एकमेव कार्य सगळ्यांनी करायचे ठरवले.

आज या " Team MPSC Update" मधील अनेक सदस्य विद्यार्जनाचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने करत असून अनेकजणांचा विद्यार्थी-मित्र मार्केटमध्ये आजच्या घडीला एक नामवंत सर म्हणून त्यांचा उल्लेख करतात.
अकॅडमी स्थापन झाल्यानंतर त्या काळात मी सुद्धा "भारतीय राज्यव्यवस्था" हा विषय 1 वर्ष शिकवत होतो पण या काळात शासकीय नोकरी मिळाल्याने व हळूहळू आमच्या या चळवळीत पारदर्शकतेचा अभाव व चळवळ मूळ हेतूपासून दुरावली असे माझे मत झाल्याने 2018 पासून @thempscupdate चा Creator या नात्याने कोणत्याही अकॅडमी /कोचिंग क्लासला / ऑनलाइन क्लास / मेंटोरशीप अशा कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देणार नाही, हे ठरवले आणि आजपर्यंत तो पाळला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मुळात कोचिंग क्लास या Concept ला आमचा विरोधच नाही पण त्यात" नैतिकता, पारदर्शकता व विद्यार्थ्यांप्रती उत्तरदायित्व" ह्या 🚨👆त्रिसूत्रीचे पालन करावे हा आग्रह आहे. आजही 👉 माझ्या माहितीतील उदाहरण द्यायचे झाल्यास - प्रवीण चव्हाण सर, पवन माळी व इतर अनेक शिक्षकवृंद अधिकारी घडवण्याचे उत्तम काम करीत आहेत. ( 🚨 मला ज्यांचा सहवास लाभला अशाच लोकांची नावे घेतली आहेत,महाराष्ट्रात असे अनेक गुरुजी वरील त्रिसूत्री वापरून अधिकारी घडवत आहेत, यात मुळीच शंका नाही. )

लिखाणाचा प्रपंच का केला ..?👇👇👇
तर
आज अनेक जणांनी ऑनलाइन क्लास / मेंटोरशीप चा धडाका सुरू केला आहे, आपले @thempscupdate चे अनेक जुने Admin यांनी चॅनेलवर प्रसिद्धी मिळताच स्वतःचा ऑनलाइन क्लास / पुस्तके / सुरू केली आहेत, अशा सर्व मंडळींचा @thempscupdate या चळवळीशी काहीही संबंध नाही..! 🙏

🚨 5-6 दिवस मोफत क्लास करा, आवडला तर लावा पण आपले आई-वडील रात्रंदिवस मेहनत करून पैसे पाठवत असून वरील "त्रिसूत्री"चे पालन करणाऱ्या मंडळींकडेच क्लास लावा, कुठलीही आर्थिक फसवणूक करून घेऊ नका, ही विनंती

(पूर्णपणे मोफत पण उत्तम व परिक्षाभिमुख मटेरियल जो क्लास देत असेल तो नक्की वापरा, तो जरूर प्रसिद्धीसाठी करत असेल पण आपल्याला अधिकारी होऊन लवकरात लवकर या मोहजालातून बाहेर पडायचे आहे, ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवा..🙏🙏🙏

साभार,

अपेक्षित ध्येय प्राप्त होईपर्यंत अखंड अभ्यासासाठी शुभेच्छा..!

@madhusudanrp


http://t.me/thempscupdate
🚨 #Marathi #Descriptive मध्ये स्वप्नील कापडवणीस आणि मला 2015 साली मराठी विषयात तथाकथित #HighestEver मार्क्स होते कारण ती काठिण्यपातळी पूर्णपणे वेगळी होती पण आम्ही कधीच या विषयाचा डंका वाजवत त्याचा उदोउदो केला नाही, आज आपलेच काही जुने सदस्य काही क्लबला हाताशी धरून स्वतःच्या क्लासची जाहिरात करून घेत आहेत..

स्वतःला अधिकाऱ्यांचा club म्हणवणाऱ्यानी सर्व माहितीची शहानिशा करूनच पोस्ट करावी, तुमच्या चॅनेलवर लाख सदस्य तुमच्या सतत #update देणाऱ्या चांगल्या आणि विश्वासार्ह माहितीमुळे आहेत, याची ते नोंद घेतलीच, अशी अपेक्षा करूया..!

🚨 #HighestEver 👈 या शब्दाचा दुरूपयोग हे आपल्या चॅनेलवर करणार नाहीत, अशी आशा करतो..

http://t.me/thempscupdate
Forwarded from Shri
सध्या स्वतः चा विचार करणारी भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असताना@ इतरांना करिता सतत मागील 6 वर्ष निःस्वार्थ पणे ग्रामीण भागातील मुलांना काही तरी नावीन्य पूर्ण मिळाले पाहिजे या , जसे की अचूक cut off म्हटले की the Mpscupdate हेच समीकरण मागील 6 वर्ष राज्यसेवा मुख्य नंतर interview करिता वेगळा ग्रुप करून प्रत्यक्ष मार्गदर्शन . जॉब करून मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे म्हणून आपण कार्य करत आहात, कुठली जाहिरात नाही, सर्व कस निःस्वार्थ आपण करत आहोत cut & कॉपी करून मटेरियल share करणे हे कधीच ध्येय नाही.खरं तर बोलायचं तर खुप काही आहे पण चांगल्या काम करताना त्याची कुठे पण जाहिरात करणे आवश्यक नाही. आपण अगदी कृष्णा सारखं आम्हाला मार्गदर्शन करत आहात योगायोग असा म्हणावं लागेल तुमचं नाव पण मधुसूदन आहे. महाभारत मध्ये जसं कौरव 100 होती पण विजयी मात्र पांडव झाली.सध्या तीच परिस्थिती आहे आम्ही प्रामाणिक पणे काम करत आहोत पण सर्वना सवय झाली खोट्या गोष्टीची @ हे मुळात च विचित्र आहे, पण शेवटी सत्यचा विजय होतोय, मित्रांनो आपणस नम्र विनंती सर आपल्या करिता जॉब करून वेळात वेळ काढून योग्य मार्गदर्शन करत आहेत तर आपल कर्तव्य आहे the mpscupdate जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहचविणे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Forwarded from The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis

भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व त्यानंतर प्राकृतिक भूगोल
1) राजकीय
2) प्राकृतिक
3) खनिज संपत्ती
4) वने
5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य
6) नदी प्रणाली
7) लेण्या , गरम पाण्याचे झरे , धबधबा
या वरील बाबींवर दरवर्षी किमान एक प्रश्न

लोकसंख्या , भारताची लोकसंख्या व महाराष्ट्राची लोकसंख्या यात दशवार्षिक वाढ व साक्षरता,घनता यास जास्त महत्त्व द्यावे किमान दोन प्रश्न

भारताचे राजकीय सीमा , नदी प्रणाली व प्राकृतिक भूगोल या घटकांवर किमान एक प्रश्न

#credits - #Amit P

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
The MPSC Update ©
#Geo #combined #Prelims #analysis भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल यात महाराष्ट्राच्या भूगोलाला अधिक महत्त्व व त्यानंतर प्राकृतिक भूगोल 1) राजकीय 2) प्राकृतिक 3) खनिज संपत्ती 4) वने 5) राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य 6) नदी प्रणाली 7) लेण्या , गरम…
👆👆#Geo #combined #Prelims #analysis केल्यावर-

2017 ते 2021 पूर्व परीक्षांमध्ये भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे अशा प्रकारचे वर्गीकरण करता येईल 👇

वर्ष महाराष्ट्र भारत प्राकृतिक

2021 07 06 02

2020         08              05            02

2019 12 02 01

2018 12 02 01

2017 07 06 02

परिक्षाभिमुख अशा पोस्टसाठी आपल्या चॅनेलची लिंक 👇 Join करा व Forward करा 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from Sumit
सर मी 2017-18 पासून सदस्य आहे.
तेंव्हापासून अनुभव आहे, तुमचा आणि तुमच्या चॅनल चा एक स्वतंत्र दर्जा आहे व तो तुम्ही टिकवला आहे त्याबद्दल तुमचे आभार 💐💐