👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :
सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.
👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :
सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अॅक्ट फॉर पंजाब अॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.
👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :
सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.