The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
आठवण क्षमता कमी होते. 
* कोबीच्या आतील पानांच्या कडा जळतात. पाने कुजतात. 
* फळांची प्रत कमी होते व फळे लवकर खराब होतात. 

कॅल्शियम उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक -

१) जमिनीचा प्रकार - भरड्या व रेताड जमिनीत कॅल्शियमची कमतरता चिकणमाती किंवा पोयटायुक्त जमिनीपेक्षा जास्त असते. काळ्या जमिनीत इतर जमिनीच्या तुलनेत कॅल्शियम जास्त असते. 

२) जमिनीचा सामू - आल्मधर्मी (सामू ६ पेक्षा कमी) असलेल्या जमिनीत ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. परिणामी, कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. तसेच अल्कधर्मी (सामू ८.५ पेक्षा अधिक) असलेल्या जमिनीत सोडियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. 

३) सेंद्रिय घटक - सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असलेल्या जमिनीत कॅल्शियम मातीच्या कणांना चिकटून राहत नाही. त्याचे वहन होते. 

४) कॅल्शियम व अन्य धनप्रभारित अन्नद्रव्यांचे गुणोत्तर ०.१०-०.२० इतके असेल तर हे पिकांसाठी चांगले व फायदेशीर असते. जमिनीत जर अमोनियम (NH4+), पोटॅशियम (K+), मॅग्नेशियम (Mg2+) आणि ॲल्युमिनियम (Al3+) चे प्रमाण अधिक असेल तर कॅल्शियमची जमिनीत व पर्यायाने पिकांमध्ये कमतरता निर्माण होते. 

कॅल्शियमचा ऱ्हास  -

- अधिक पाऊस आणि अधिक सिंचन दिल्याने जमिनीतून कॅल्शियमचा ऱ्हास होतो.
- हलक्या जमिनी, आम्लयुक्त खतांच्या वापरामुळेही कॅल्शियमचा ऱ्हास होतो. 

जमिनीत कॅल्शियम योग्य राखण्यासाठी उपाय -

१) सेंद्रिय घटकांचा वापर हलक्या व रेताड जमिनीत करावा. 
२) कॅल्शियमयुक्त खतांचा वापर नायट्रेट नत्र असलेल्या खतांसोबत करावा. त्यामुळे दोन्हींचा कार्यक्षम वापर होतो. 
३) आल्मधर्मी जमिनीत चुना आणि चोपण जमिनीत जिप्‍समचा वापर करावा. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक स्थिती चांगली राहण्यास मदत होते. 

तक्ता -

कॅल्शियमचे स्रोत व प्रमाण - 
अ. क्र. ---- स्रोत ---- प्रमाण 
१ ---- सिंगल सुपर फॉस्फेट ---- १८-२१ टक्के 
२ ---- ट्रिपल सुपर फॉस्फेट ---- १२-१४ टक्के 
३ ---- कॅल्शियम नायट्रेट ---- १५ ते १९ टक्के 
४ ---- जिप्सम ---- १८ ते २२ टक्के 
५ ---- डोलोमाइट चुना ---- २२ टक्के 
६ ---- चुना (CaCO3) ---- ४० टक्के 
७ ---- कॅल्शियम अमोनियम नायट्रेट ---- १५ टक्के 

फवारणीद्वारा वापर -

- फवारणीद्वारा कॅल्शियम पिकांना दिल्यास पिकांद्वारा लवकर शोषला जातो. शेंड्याकडील भागांना कॅल्शियम लवकर व मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो व पिकांची वाढ व पोषण चांगल्या प्रकारे होते. 
- तसेच नत्रयुक्त खतासोबत कॅल्शियम दिल्यास (फवारणीद्वारा) पिकांची वाढ जोमाने होते. 

कॅल्शियमचा इतर अन्नद्रव्यांसोबत परस्परसंबंध -

कॅल्शियम हे धनप्रभारित (Ca++) आयन असल्यामुळे इतर धनभार असलेल्या अन्नद्रव्यांसोबत शोषणासाठी स्पर्धा निर्माण होते. जसे सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अमोनिअम, लोह आणि ॲल्युमिनिअम. 

* सोडिअम - सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत मातीच्या कणांवरील कॅल्शियम सोडिअममुळे दूर लोटला जातो. परिणामी, कॅल्शियमचे विद्राव्य स्वरूपात जमिनीतून वहन होते व ऱ्हास होतो. सोडिअमचे प्रमाण अधिक झाल्यामुळे पिकांना सोडिअममुळे हानी होते. यामुळेच क्षारयुक्त व चोपण जमिनीत कॅल्शियम (जिप्सम) टाकला जातो. 

* स्फुरद - जमिनीचा सामू ७ पेक्षा जास्त असेल तर मुक्त चुना मातीमध्ये जमा होतो. अशा स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम इतर अन्नद्रव्यांशी रासायनिक क्रिया करतो. स्फुरद ऋणप्रभारित आयन असल्यामुळे मुक्त चुना व स्फुरद यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. पिकांना कॅल्शियम उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत स्फुरदाची उपलब्धता कमी होते. 

* लोह आणि ॲल्युमिनियम - ज्या जमिनीचा सामू ७.० पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत लोह आणि ॲल्युमिनियम उपलब्धता जास्त असते. त्यामुळे अशा जमिनीतील कॅल्शियमची उपलब्धता घटते. 

* बोरॉन - ज्या जमिनीत व पिकांमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत पिकांमध्ये बोरॉनची उपलब्धता व शोषण यावरदेखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच बोरॉनची अति उपलब्धता किंवा कमतरता पिकांमध्ये व जमिनीत होऊ नये म्हणून कॅल्शियम फवारणी व जमिनीतून दिल्यास फायदा होतो. 

(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत)
### पत्रासाठी आवाहन -

कल्याण रेल्वे स्टेशन वर सायली ढमढेरे या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विधार्थिनींचा अपघात झाला होता. तरी काही दिवसांपासून MPSC Students Rights विदयार्थी संघटना, @mpsc_update , empsc katta टेलिग्राम चॅनेल माध्यमातून सायली साठी आपण आर्थिक मदत उभी केली आहे. पण विदयार्थी बंधू आणि भगिनींनो आर्थिक मदत होत असतानाच सायली ला मानसिक आधाराची व सकारात्मक दृष्टीकोनाची फार गरज आहे, त्यामुळे आपण तिला मानसिक आधार देणे गरजेचे आहे, त्यासाठी मी सर्व विदयार्थी बांधव आणि भगिनींना विनंती करतो की आपण सायली ला मानसिक बळ व प्रोत्साहन पर पत्र खालील पत्यावर लिहावीत जेणेकरून तिला मानसिक आधार व लढण्याची जिद्ध मिळेल.
आपला
महेश बडे

सायलीला पत्र पाठवायचा पत्ता
सायली ढमढेरे
फ्लॅट नो. 13
विजय कॉम्प्लेक्स 273
शुक्रवार पेठ
चिंचेची तालीम
पुणे 411030.
economics
आठवी अनुसूची...( Alphabetically )...
सातवी अनुसूची...( संघ सूची- Union List)...👆👇