The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
महाराष्ट्र जनगणना 2011 मधील काही महत्त्वाचे मुद्दे....👆👆👆
Forwarded from MPSC Mantra
@mpscmantra
एअरटेल ने भारताची पहिली पेमेंट बँक सुरू केली

देशातील प्रथम पेमेंट बँक - एअरटेल पेमेंट बँक – ला 23 नोव्हेंबर 2016 रोजी राजस्थान मध्ये सुरुवात झाली आहे. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नव्या संकल्पनेच्या या बँकिंग सेवा प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी सुरूवातीला या एका राज्यात चालविण्यात येत आहे. भारती एअरटेल समूहाची एअरटेल पेमेंट बँक ही प्रणाली आणि प्रक्रिया यामधून येणार्‍या अनुभवांचा अभ्यास करून पुढे संपूर्ण देशभरात ही सेवा प्रदान करणार आहे.

राजस्थान राज्यातील शहरे आणि गावांमधील एअरटेल ग्राहक आता एअरटेल रिटेल आऊटलेट्स येथे बँक खाते उघडण्यास सक्षम असतील, जे एअरटेल बँकिंग पॉइंट म्हणून कार्य करतील आणि त्यामधून मूलभूत, सोयीस्कर बँकिंग सेवा अर्पण करतील.

एअरटेल पेमेंट बँक ही पूर्णपणे डिजिटल आणि कागद विरहित बँक असणार आहे. बँकेत बचत खात्यातील ठेवीवर 7.25% व्याजदराने व्याज दिले जाणार. ग्राहकांचे 'एअरटेल मोबाईल नंबर’ हे ग्राहकांचे बँक खाते क्रमांक असणार. यासोबतच कंपनी खातेधारकाला 1 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती विमा प्रदान करीत आहे. 

यामागील पार्श्वभूमी

23 सप्टेंबर 2013 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली लहान व्यवसाय आणि अल्प उत्पन्न कुटुंबांसाठी सर्वसमावेशक वित्तीय सेवा समिती स्थापन केली होती. या समितीकडून सादर करण्यात आलेल्या विविध शिफारसीमध्ये पेमेंट बँक च्या निर्मितीचा मुद्दा मांडण्यात आला. त्यादृष्टीने, 27 नोव्हेंबर 2015 रोजी RBI ने पेमेंट बँक साठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

फेब्रुवारी 2015 मध्ये, RBI कडून पेमेंट बँक च्या परवान्यासाठी अर्ज केलेल्या 41 अर्जदारांची यादी जाहीर केली. 28 फेब्रुवारी 2015 रोजी सादर केल्या गेलेल्या अर्थसंकल्पात, इंडियापोस्ट हे पेमेंट बँक चालविण्यासाठी त्याच्या मोठ्या नेटवर्कचा वापर करणार, असे जाहीर केले गेले. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली बाह्य सल्लागार समितीने 6 जुलै 2015 रोजी त्याचे निष्कर्ष सादर केले. त्यानुसार, 19 ऑगस्ट 2015 रोजी, RBI ने पेमेंट बँक सुरू करण्यासाठी अकरा कंपन्यांना तत्वत: परवाने दिले. या 11 कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:

आदित्या बिर्ला नुवो लिमिटेड; एयरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लिमिटेड; चोलामंडलम डिस्ट्रिब्यूशन सर्व्हिसेस लिमिटेड; टपाल विभाग (इंडिया पोस्ट); फिनो पेटेक लिमिटेड; नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL); रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड; दिलीप शांतीलाल शांघवी; विजय शेखर शर्मा; टेक महिंद्रा लिमिटेड; व्होडाफोन m-पेसा लिमिटेड
Forwarded from MPSC Mantra
@mpscmantra
***पेमेंट बँक बाबत

पेमेंट बँक मध्ये समाविष्ट बाबी खालीलप्रमाणे आहेत:

पेमेंट बँक सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचे किमान भांडवल असणे आवश्यक आहे. पहिल्या पाच वर्षासाठी, प्रवर्तकाची भागीदारी ही 40% च्या खाली असणे आवश्यक आहे.बँकेच्या इतर प्रकारापासून स्वत:ला वेगळे दर्शवण्यासाठी या बँक ला "पेमेंट बँक" या शब्दाचा वापर करणे आवश्यक आहे.पेमेंट बँका बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 22 अंतर्गत परवानाकृत केल्या जाईल आणि कंपनी कायदा 2013 अंतर्गत सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून यांची नोंदणी केली जाणार आहे.भारतातील खाजगी बँकांसाठी असलेल्या FDI नियमानुसार, या बँकांमध्ये परदेशी भागभांडवलाला परवानगी दिली जाणार.या बँका प्रती खाते सध्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादित रकमेच्या ठेवी स्वीकारु शकतील.नॉन-बँकिंग कार्य चालवण्यासाठी या उप-कंपनी तयार करू शकत नाही. ही बँक कर्ज देऊ शकत नाही.बँक च्या 25% शाखा या बँकिंग सुविधा नसणार्‍या ग्रामीण भागात असणे आवश्यक आहे.बँक मोबाइल फोन च्या माध्यमातून पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे ही सेवा सुरू करू शकते.बँक फोन द्वारे बिलाचा स्वयंचलित भरणा करणे आणि कॅशलेस खरेदी, चेकलेस व्यवहार अश्या सेवा देऊ शकते.बँक सर्व बँकांच्या ATM नेटवर्क वर वापरण्यायोग्य डेबिट कार्ड आणि ATM कार्ड जारी करू शकते.पेमेंट बँक या बँक खात्यांमध्ये पैसे थेट हस्तांतरित करू शकते.बँक प्रवासीला फॉरेक्स कार्ड प्रदान करू शकते, जे संपूर्ण भारतात डेबिट किंवा ATM म्हणून वापरण्यायोग्य राहणार.बँक इतरांच्या तुलनेत कमी शुल्क आकारून फॉरेक्स सेवा देऊ शकते.बँक 'ऍपल पे' सारख्या थर्ड पार्टी कडे कार्ड स्वीकृती यंत्रणा देऊ शकते.


***भारतात पेमेंट बँक चे महत्व:-

भारत ही जगातील एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परंतु, तरीही देशातील विविध भागात अजूनही बँकिंग सेवा पोहचलेली नाही. या चित्रणाला पाहता, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार. मुख्य म्हणजे कमी पैशाच्या व्यवहारांना लक्षात घेऊन ही संकल्पना आणण्यात आली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रात, प्रथमच, RBI ने विशिष्ट उपक्रमासाठी विशिष्ट परवाने देऊ केले आहेत.

भारतातील बँकिंग यंत्रणा पुन्हा परिभाषित करण्यासाठी म्हणून आणि भारतीय स्थलांतरित मजूर, कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि लहान व्यवसाय यांना सेवा देण्यासाठी ही सेवा आणण्यात आली आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे प्रवास करतांना, यामधून आरोग्य, शिक्षण आणि गॅस अनुदान अश्या विविध सरकारी योजनेसाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.
Forwarded from MPSC Mantra
@mpscmantra
***RBI ने जरी 11 companies ला परवाने दिलेत तरी Cholamandalam Distribution Services, Dilip Sanghavi, Tech mahindra या 3 companies ने यामधून माघार घेतलेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 62 नवीन जवाहर नवोदयविद्यालयांना मंजूरी दिली:-

आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने 17 राज्यांमध्ये 62 नवीन जवाहर नवोदय विद्यालय (JNV) उघडण्यास मंजूरी दिली आहे, ज्यामध्ये छत्तीसगड मध्ये दहा, गुजरात मध्ये आठ आणि जम्मू- काश्मीर मध्ये पाच यांचा समावेश आहे. यासाठी 2,871 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले आहे.भारतात सध्या 591 जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहेत. आतापर्यंत, 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 576 जिल्ह्यांमध्ये 598 जवाहर नवोदय विद्यालयांना मंजूरी देण्यात आली आहे.जवाहर नवोदय विद्यालय किंवा नवोदय विद्यालय हा मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून चालवला जाणारा पुर्णपणे निवासी, यासह शिक्षण, केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली शी संबंधित शिक्षण प्रकल्प आहे.
भारतामध्ये वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड चे प्रथमच आयोजन:-

वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड च्या 13 व्या सत्राचे 25-27 नोव्हेंबर 2016 दरम्यान ग्रेटर नोएडा मध्ये आयोजन केले गेले आहे. हे प्रथमच भारतात आयोजित करण्यात येत आहे. 2016 ऑलिम्पियाड ची “रॅप द स्क्रॅप” ही संकल्पना आहे.संस्कृती मंत्रालय आणि इंडिया STEM फाउंडेशन (ISF) च्या वतीने राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (National Council of Science Museums -NCSM) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.2004 साली वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड पहिल्यांदा सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेची औपचारिकपणे सन 2003 मध्ये स्थापना केली गेली होती. चीन, जपान, सिंगापूर आणि कोरिया यांना या स्पर्धेचे संस्थापक देश मानले जाते.12 वे वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड नोव्हेंबर 2015 मध्ये दोहा, कतार येथे आयोजित करण्यात आले होते. 2017 साली, ही स्पर्धा कोस्टा रिका येथे आयोजित केली जाईल.
भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या निक्की हेली यांची UN साठी US राजदूत म्हणून निवड:-

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) चे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दक्षिण कॅरोलिना चे राज्यपाल निक्की हेली यांचे संयुक्त राष्ट्रसंघासाठी US राजदूत म्हणून नामांकन दिले गेले आहे.यासोबतच, हेली या ट्रम्प प्रशासनामध्ये नियुक्ती केल्या जाणार्‍या पहिल्या गौर-वर्ण नसलेल्या महिला पदाधिकारी आहेत. याशिवाय, ट्रम्प यांनी देशाचे शिक्षण सचिव म्हणून बेटसी डीवोस यांचे नाव दिले.यापूर्वी, हेली यांनी 2011 सालापासून दक्षिण कॅरोलिना च्या 116 व्या राज्यपाल म्हणून कार्य केले आहे. शिवाय, त्या दक्षिण कॅरोलिना च्या पहिल्या महिला आणि पहिल्या अल्पसंख्याक राज्यपाल देखील आहेत.वयाच्या 44 व्या वर्षी, हेली या अमेरिकेतील सर्वात तरुण राज्यपाल होत्या. तसेच बॉबी जिंदल नंतर, त्या अमेरिकेत राज्यपाल म्हणून कार्य करणार्‍या भारतीय वंशाच्या दुसर्‍या राज्यपाल होत्या.
*****उत्तर प्रदेश मधील भारतातील सर्वांत लांब द्रुतगती मार्गाचेउद्घाटन

आग्रा-दिल्ली ला जोडणारा यमुना द्रुतगती महामार्ग लखनऊ पर्यंत वाढविण्यात आला आहे. यासोबतच या भारतातील सर्वांत लांब द्रुतगती महामार्गाचे उत्तर प्रदेशातील बांगरमौ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेश ची राजधानी दरम्यानचा प्रवास हा सुमारे पाच तासात पूर्ण केल्या जाऊ शकणार.हा 305 किलोमीटर चा प्रकल्प उत्तर प्रदेश द्रुतगतीमार्ग औद्योगिक विकास प्राधिकरण (UPEIDA) यांनी पूर्ण केला आहे.हा मार्ग 10 जिल्ह्यांतील 236 गावांमधून जातो आणि 3500 हेक्टर भूमीवर आहे. यामधून शिकोहाबाद मार्गे आग्रा-लखनौ, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावाह, औराइया, कन्नौज, कानपूर नगर, उन्नाव आणि हरदोई जोडले जातात. या अंतरामध्ये 4 राष्ट्रीय महामार्ग, 2 राज्य महामार्ग आणि 5 नद्या (गंगा, यमुना, इसान, साई आणि कल्याणी) आहेत.
ICT विकास निर्देशांक 2016 मध्ये भारत 138 व्या क्रमांकावर:-

मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट च्या 2016 आवृत्तीचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी गॅबरोन, बोट्सवाना मधील जागतिक दूरसंचार/ICT निर्देशक परिषद (World Telecommunication/ICT Indicators Symposium-WTIS) 2016 दरम्यान अनावरण करण्यात आले आहे.

अहवालामध्ये, दरवर्षीप्रमाणे, ICT विकास निर्देशांक(Development Index-IDI) 2016 प्रसिद्ध करण्यात आले आहे.

IDI मध्ये भारत

ICT विकास निर्देशांक 2016 मध्ये भारत 138 व्या क्रमांकावर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावेळी भारत तीन स्थानांनी मागे पडला आहे.

मोठ्या विकसनशील अर्थव्यवस्था, जश्या बांगलादेश, भारत, इंडोनेशिया व पाकिस्तान येथे मोबाइल फोन चे मालकी प्रमाण अजूनही कमी आहे. म्हणजेच देशाची 40% लोकसंख्या अजूनही मोबाइल फोन वापरत नाही.


मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट:-
मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट हे 2009 सालापासून दरवर्षी प्रकाशित केले जात आहे, जे की ICT विकास निर्देशांक (IDI) च्या समावेशासह माहिती समुदायाचे मापन करण्यासाठी असलेले ICT डेटा आणि बेंचमार्किंग साधन आहे.

IDI 2016 मध्ये जगभरातील 175 अर्थव्यवस्थांमध्ये ICT विकासाची पातळी स्पष्ट केलेली आहे आणि वर्ष 2014 पासून त्यांच्यामधील प्रगतीची तुलना केली गेली आहे.

अहवालामधील महत्त्वाचे निष्कर्ष

सरासरी जागतिक IDI गुण हे वर्ष 2015 मधील 4.74 पेक्षा सुधारित दिसलेले आहे. हा आकडा वर्ष 2016 मध्ये 4.94 इतका दिसून आला आहे.IDI च्या यादीमध्ये कोरिया प्रजासत्ताक 8.84गुणांसह सलग दुसर्‍यांदा प्रथम क्रमांकावर आहे. तर सहाराच्या उप-क्षेत्रातील आफ्रिकेतील नायजर हे 1.07 गुणांसह सर्वात शेवटी (175 वे स्थान) आहे.यादीत टॉप 10 देशांमध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कोरिया प्रजासत्ताक सह आणखी दोन अर्थव्यवस्था आणि सात युरोपीय देशांचा समावेश आहे.
IDI रॅंक (टॉप 10)

IDI 2016 रँक

देश

IDI 2016 गुण

1

कोरिया (प्रजासत्ताक)

8.84

2

आइसलँड

8.83

 

3

डेन्मार्क

8.74

 

4

स्वित्झर्लंड

8.68

5

युनायटेड किंगडम

8.57

6

हाँगकाँग, चीन

8.46

 

7

स्वीडन

8.45

 

8

नेदरलँड्स

8.43

 

9

नॉर्वे

8.42

 

10

जपान

8.37
🔹गणितातील काही महत्वाची एकेके :
(१)    १  मिनिट = ६० सेकंद .
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस .
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)     ७ दिवस = १ आठवडा.
(८)     ३० दिवस = १ महिना.
(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५)    एकशे =१००
(१६)    अर्धाशे =५०
(१७)    पावशे =२५
(१८)    पाऊणशे =७५
(१९)    सव्वाशे =१२५
(२०)    दीडशे = १५०
(२१)    अडीचशे =२५०
(२२)    साडेतीनशे =३५०
(२३)    १डझन=  १२ वस्तू
(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
(२५)    पाव डझन=३ वस्तू
(२६)    पाऊण डझन=९ वस्तू
(२७)    २४ कागद = १ दस्ता
(२८)    २० दस्ते=१ रीम
(२९)    ४८० कागद = १  रीम
(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
(३१)    १ हेक्टर =१०० आर
३२ )    १एकर= ४००० चौ .मी
(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४)    पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९)   १हजार=१०००
(५०)   अर्धा  हजार =५००
(५१)   पाव हजार =२५०
(५२)   पाऊण हजार  =७५०
(५३)   १२ इंच =१ फूट 
(५४)   ३ फूट =१ यार्ड
(५५)   १ मैल =५२८० फूट
(५६)   १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६०)   १ टन= १० क्विंटल
(६१) १ टन= १००० कि.ग्रॅ
========================
वित्त आयोग..