The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
भारतातील प्रमुख वृत्तपत्रे👆
Forwarded from Deleted Account
#History Committee/Commission
Forwarded from Deleted Account
#History Committee/Commission 2
***पालमपूर विधानसभा मतदारसंघ हे देशातील प्रथम ई-विधानसभा:-

हिमाचल प्रदेश मध्ये, कांगडा जिल्ह्यातील पालमपूर विधानसभा मतदारसंघ हे भारतातील पहिले ई-विधानसभा मतदारसंघ झाले आहे.हिमाचल प्रदेश विधानसभा ही देखील कागद विरहित कामकाज बनवण्यासाठी ई-विधान प्रणाली अंगीकारणारी देशातील पहिली विधानसभा झाली आहे.
भारताने अग्नी I बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली-

बालासोर, ओडिशा मधील ओडिशाच्या सागरी चाचणी क्षेत्रात भारताने देशातच विकसित केलेल्या आण्विक अग्नी-I बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी घेतली आहे. अब्दुल कलाम बेटावरुन (व्हिलर आयलंड) हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.अग्नी-I हे घन इंधनावर चालणारे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याचे वजन 12 टन असून हे 15 मीटर लांबीचे आहे, ज्यामधून 1000 किलो पेक्षा अधिक स्फोटके वाहून नेल्या जाऊ शकते. याची मारा क्षमता 700-1250 किलोमीटर इतकी आहे.अग्नी-I ची संरचना संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र इमरत यांच्या सहकार्याने DRDO कडून केली गेली आहे आणि भारत डायनामिक्स लिमिटेड, हैदराबाद कडून बांधणी करण्यात आली आहे. अग्नी-I हे पृथ्वी-II ची 250 किलोमीटर क्षमता आणि अग्नी-II ची 2,500 किलोमीटर मारा क्षमता यामधील अंतरातील फरक भरून काढण्यासाठी कारगिल युद्ध (1999) नंतर विकसित केले गेले. याची प्रथम 25 जानेवारी 2002 रोजी चाचणी घेण्यात आली.
24 वे APEC समिट मध्ये 2016 नेत्यांचे घोषणापत्रअंगिकारले गेले

लिमा, पेरू येथे 21 नोव्हेंबर 2016 रोजी आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार (Asia Pacific Economic Cooperation -APEC) आर्थिक नेत्यांची बैठक चे 24 वे सत्र पार पडलेले आहे. ही परिषद “क्वालिटी ग्रोथ अँड ह्यूमन डेवलपमेंट” या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेचे “प्राचीन शहर करल चे स्थापत्य” हे अधिकृत बोधचिन्ह होते. पेरू ने ही परिषद दुसर्‍यांदा आयोजित केली आहे. या आधी, 2008 साली ही परिषद पहिल्यांदा पेरु मध्ये आयोजित करण्यात आली होती.

अजेंडा: या वर्षी परिषद चार प्राधान्य असलेल्या क्षेत्रावर केन्द्रित होती - मानवी भांडवल विकास, लघु आणि मध्यम आकाराच्या उपक्रम (SMEs) व प्रादेशिक अन्नपदार्थाची बाजारपेठ अद्ययावत करणे आणि प्रादेशिक आर्थिक एकत्रीकरण अजेंडा.

यावेळी, APEC नेत्यांनी आशिया-पॅसिफिक प्रदेशात मुक्त व मोफत व्यापार व गुंतवणूक, शाश्वत आर्थिक वाढ आणि सामायिक समृद्धी यांचे समर्थन करण्यासाठी एक समान प्रक्रियेवर कार्य करण्याचे मान्य केले आहे.

नेत्यांचे घोषणापत्र मधील ठळक बाबी

नेत्यांनी पुन्हा एकदा आशिया-पॅसिफिक प्रदेशात संतुलित, समावेशक, शाश्वत, नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित वाढ राखण्याच्या दिशेने कार्य करण्याची वचनबद्धता स्पष्ट केली.नेते शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा च्या अंमलबजावणी करण्यास वचनबद्ध झाले, जे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक संतुलित आणि सर्वसमावेशक बहुपक्षीय फ्रेमवर्कचे प्रतिनिधित्व करते.नेत्यांनी यावेळी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन; उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन; सामाजिक संरक्षण सुधारून आणि प्रादेशिक सहकार्य वाढवून सर्वांना, विशेषत: सामाजिक असुरक्षित गटासाठी, सभ्य काम आणि कार्य दर्जा याची खात्री करण्यासाठी प्रयत्नांना बळकट करण्यासाठी शपथ घेतली.कौशल्य आणि स्पर्धात्मकता विकसित होण्यासाठी लोकांना समान उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी नेत्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सॉफ्ट स्किल यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास त्यांची वचनबद्धता दर्शवलेली आहे.याव्यतिरिक्त, अलीकडेच अंमलात आलेल्या पॅरिस कराराला लक्षात घेऊन कमी कार्बन उत्सर्जन, हवामान संवेदनक्षम अर्थव्यवस्था यांच्या दिशेने पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यास नेत्यांनी त्यांची वचनबद्धता स्पष्ट केली आहे.

मुख्य आव्हाने

काही अर्थव्यवस्थेमध्ये विषमता आणि असमान आर्थिक वाढ, तसेच पर्यावरण दर्जात कमतरता आणि हवामानातील बदलामधून निर्माण झालेले धोके, शाश्वत विकासास तडा जाण्याच्या संभावना आणि येणार्‍या भविष्याच्या दिशेने दिसणारी अनिश्चितता अश्या अनेक समस्या समोर दिसून आल्या आहेत. शिवाय, जागतिकीकरण आणि त्याच्या संबंधित एकीकरण प्रक्रिया यांच्यात वाढ हे संरक्षणात्मक काळाची आवश्यकता दर्शवण्यामध्ये योगदान देत आहे.

ही आव्हाने APEC च्या सामान्य आकांक्षा आणि उद्दिष्टे यांना धोका ठरू शकते. परिणामी, सर्वाधीक तातडीच्या समस्या हाताळतान्याचे एक व्यासपीठ म्हणून APEC त्याचे जागतिक नेतृत्व कायम ठेवण्यास खात्री करण्यासाठी नेत्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली आहे.
Indian journalist gets International Press Freedom Award:-

-Indian Journalist Malini Subramaniam has been conferred with the International Press Freedom Award for her reporting from Chhattisgarh's Naxal-infested Bastar area.
-She is one of the four journalists felicitated for their commitment to a free press. 
-Subramaniam, a contributor to 'Scroll', has reported on abuses by security forces, sexual violence, jailing of minors and other issues in the region.
New Doc 9 - Page 1
New Doc 9 - घटनात्मक संस्था....
New Doc 9 - Page 3
New Doc 9 - Page 4
New Doc 9 - Page 5