The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता पुणे येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व 6 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत SRPF, गट क्रमांक 1 मैदान, रामटेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता कोल्हापूर येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021 व 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत पोलीस मुख्यालय मैदान,कसबा बावडा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल.
#PSI2019 #PhysicalTest तारखा जाहीर.. #MPSC शासकीय सुट्टीच्या दिवशीही जोरदार काम करत आहे..😊👍👍

@thempscupdate
#Inspirational 🎯 यशवंत - एक प्रेरणास्त्रोत
〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 भाजी विक्रेत्याच्या या मुलाला बनायचं होतं क्रिकेटर, पण बनला पृथ्वीवरील सर्वात वेगवान माणूस
〰️〰️〰️〰️〰️〰️
लहानपणापासूनच एक उत्तम धावपटू असलेल्या एका तरुणाला वयाच्या १८व्या वर्षीच ऑलिंपिक स्पर्धेत आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. जी फक्त गुणवंतांनाच मिळते. पण त्यात तो सपशेल अपयशी ठरला. त्याला अपयश का आले? त्यानं अपयशावर कसा विजय मिळवला? त्यानं असा कोणता पराक्रम केला की, आज त्याच्या नावाचा इतका दबदबा आहे. चला तर मग जाणून घेऊ... त्या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास...

त्याचा जन्म जमैकातील एका खेडेगावातला. एक असं खेडेगाव की, ज्या गावात पाण्याची प्रचंड टंचाई. आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून दारू आणि सिगारेटची विक्री याला करावी लागायची. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेला हा खेळाडू, वयाच्या बाराव्या वर्षीच एक उत्तम धावपटू बनला होता. पण, क्रिकेटच्या आवडीमुळे त्याचं धावण्याकडं दुर्लक्ष होत होतं. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी वेळीच कानउघाडणी केल्याने, त्यानं आपलं सर्व लक्ष धावण्याकडे दिलं.

वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्याने अनेक स्पर्धा जिंकून आपली ओळख निर्माण केली होती. याबरोबरच त्याला २००४ च्या अथेन्स ऑलम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कमी वयात मिळालेली प्रचंड लोकप्रियता, पैसा, केलेले अनेक विक्रम या सर्वांची हवा त्याच्या डोक्यात शिरली आणि नको तेच घडलं. या स्पर्धेत तो सपशेल अपयशी ठरला. त्यानं सर्वांची घोर निराशा केली. तो निराश झाला.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
पण, आता वेळ आली होती ती स्वतःला सावरण्याची.
वेळ आली होती, आत्मपरीक्षण करण्याची.
वेळ आली होती, चुका शोधण्याची
वेळ आली होती, सुधारण्याची आणि
वेळ आली होती, स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची.

हा पराभव त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानं स्वतःला सावरलं, आत्मपरीक्षण केलं, चुका शोधल्या, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता घेतली, प्रचंड मेहनत घेतली आणि २००८च्या बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध केलं आणि दोन सुवर्णपदकं आपल्या नावावर केली. तो इथंच थांबला नाही, तर २०१२ आणि २०१६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत हीच परंपरा कायम ठेवली आणि तो आठ सुवर्णपदकांचा तो मानकरी बनला. तो ऑलिंपिकवीर धावपटू म्हणजेच वेगाचा बादशहा, जगातील सर्वात वेगवान माणूस उसेन बोल्ट.

काही वर्षांपूर्वी एका संस्थेनं एक प्रयोग केला होता. पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी आणि सर्वात वेगवान माणूस यांना १०० मीटरचे अंतर कापण्यास किती वेळ लागतो याचा त्यांनी अभ्यास केला होता. यात चित्त्याची सर्वोत्तम वेळ होती ६.१३ सेकंद आणि उसेन बोल्टचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे ९.५८ सेकंदाचा म्हणजे फक्त ३.४५ सेकंदाचा फरक.

बीजिंग (२००८), लंडन (२०१२) आणि रिओ (२०१६) अशा सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले अशा तीन प्रकारांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये मिळविलेली ११ सुवर्णपदकं वेगळी. या तीनही प्रकारच्या शर्यतींमधील जागतिक विक्रम बोल्टच्याच नावावर आहेत.

अपयशाकडे संकट म्हणून न पाहता, त्याकडं संधी म्हणून पाहिलं, तरंच यशाच्या शिखरावर विराजमान होता येईल. उसेन बोल्टने आपल्या पहिल्या पराभवाकडे एक संधी म्हणून पाहिलं. म्हणूनच, त्याला या संधीचं रूपांतर सुवर्णपदकात करता आलं. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

आपल्या चुकांमुळे आपण अपयशी झाला. तरी निराश होऊ नका नका. असे अपयश मोठे अनुभव देऊन जातात. अशा परिस्थितीत पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावे लागेल. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश उसेन बोल्टच्या या जीवन प्रवासातून मिळतो.

✍️ लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव

Credits : #Naviarthkranti
#Marathi #Vocabulary : समानार्थी म्हणी

आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   
#MPSC मार्केटमधील सर्व घडामोडींवर आयोगाचे बारीक लक्ष्य आहे.

🚨 सर्व विद्यार्थी-मित्रांना विनंती आहे आपण पूर्णपणे "अराजकीय व निःपक्षपाती राहून" आपल्या रास्त मागण्या
#MPSC समोर मांडाव्यात, आयोगाचे मुख्यतः काम परीक्षा घेणे व निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करणे हे आहे..

🚨 भरतीबाबत सर्व निर्णय शासनाकडून घेतले जातात, तिथेच आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#UPSC-CSE #Prelims2021 #Polity #Analysis ..👇

With Reference - #MLaxmikanth & others...👇👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा आणि👇👇👇 Join करा..

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CSE #Polity #SETC

#Q1 #Ans👉 B { DPSP A-39 (c) }

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा आणि👇👇👇 Join करा..

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CSE #Polity #SETC

#Q1 #Ans👉 B { DPSP A-39 (c) }

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#CSE #Polity #SETC

#Q2 #Ans👉 B { Art-300A }

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा आणि👇👇👇 Join करा..

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
CSE #Polity #SETC

#Q16 #Ans👉 A ( M. Laxmikanth )

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा आणि👇👇👇 Join करा..

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#UPSC #CSE #Prelims2021 #Polity #Analysis ..👇

🚨आज झालेल्या UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा-2021 मधील #Polity #Qs चे विश्लेषण..👇👇👇

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा आणि👇👇👇 Join करा..

t.me/politymm1
#Combined Maths & Reasoning.pdf
8.2 MB
#Combined #Prelims #Maths & Reasoning #PYQ

🚨 #Combined #Mains मध्ये #MentalAbility वर जवळपास 15 प्रश्न विचारले जातात.

Credits - Adhyan

http://t.me/thempscupdate