The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#sse राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 मध्ये..

उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 9 वा क्रमांक असलेले-👇👇👇

🚨श्री. अरुण उंडे ( DC ) यांची पुस्तकसूची #Booklist ...👇👇👇

@thempscupdate
🚨 #HRD : ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या ऐवजी 2019 असा बदल
#HRD 🚨 ग्राहक संरक्षण कायदा,2019-
ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी


🚨देशातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्यात, १९८६मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना न्याय जलद गतीने मिळावा, यासाठी नवीन कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी न्यायकक्षांमध्येही बदल करण्यात आहेत. ग्राहकांच्या हक्कांना बळकटी देण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.

🚨देशात ग्राहक संरक्षण कायद्यानुसार यापूर्वी ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, माहिती मिळण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, ऐकून घेतले जाण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार; तसेच ग्राहक शिक्षणाचा अधिकार देण्यात आले होते. वस्तू किंवा सेवेची गुणवत्ता, प्रमाण, क्षमता, शुद्धता, किंमत आणि दर्जा अशा विविध अंगांची माहिती घेण्याचा अधिकार, अशी ग्राहक हक्काची व्याख्या करण्यात आली आहे.

🚨मोबदला देऊन वस्तू किंवा सेवा मिळवणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक अशी व्याख्या कायद्यानुसार करण्यात आली आहे. मात्र, वस्तू किंवा सेवा व्यावसायिक कारणासाठी घेणाऱ्या व्यक्तीचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ऑनलाइन, ऑफलाइन, टेलिशॉपिंग, साखळी मार्केटिंग किंवा थेट विक्री अशा कोणत्याही पद्धतीने वस्तू किंवा सेवा विकत घेणाऱ्या ग्राहकांचा यात समावेश आहे. नवीन कायद्यानुसार आता ग्राहकांचे अधिकार वाढवण्यात आले आहेत. या अधिकारांची माहिती प्रत्येक नागरिकाने करून घेण्याची गरज आहे.

🚨कोठूनही तक्रार दाखल करता येणार

नवीन अधिकारानुसार आता ग्राहक जिल्हा ग्राहक आयोग किंवा राज्य ग्राहक आयोगाकडे कोठूनही तक्रार करू शकणार आहेत. म्हणजे ग्राहकाला आपल्या घरातून, ऑफिसमधून किंवा बाहेरगावी असतानाही तक्रार दाखल करता येईल. यापूर्वी ग्राहकाला तक्रार दाखल करायची असल्यास ती वस्तू खरेदी केलेल्या ठिकाणी किंवा विक्रेत्याने त्याच्या कार्यालयाची नोंदणी केलेल्या ठिकाणीच तक्रार दाखल करता येत होती. आता ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करण्याची सुविधा ‌उपलब्ध करून दिली जाणार आहे. तक्रारीसाठीचे शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तक्रार दाखल करताना ग्राहकांना सहन करावा लागणारा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे.

🚨उत्पादन जबाबदारीनुसार भरपाई

सदोष वस्तूमुळे नुकसान झाल्यास ग्राहकाला संबंधित वस्तूचा उत्पादक आणि विक्रेता यांच्याकडे नुकसानभरपाई मागता येणार आहे. सर्व सेवांसाठीदेखील ही तरतूद लागू होईल. त्यामुळे सदोष सेवा मिळाल्यास त्याची भरपाई ग्राहकाला सेवापुरवठादाराकडे मागता येणार आहे. वस्तूमध्ये उत्पादना वेळी दोष असल्यास; तसेच उत्पादनावर 'वॉरंटी' नमूद केली नसल्यास उत्पादक आणि विक्रेता यांना जबाबदार धरले जाणार आहे. 'ई-कॉमर्स'लाही ही तरतूद लागू होणार आहे.

🚨वर्ग म्हणून संरक्षणाचा अधिकार

ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अन्याय्य व्यापारी प्रथा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती यांच्याविरोधात ग्राहक वर्गाच्या हितासाठी तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी लेखी स्वरूपात किंवा ऑनलाइन पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करता येईल. विभागीय आयुक्त किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे व्यापक कारवाईसाठी तक्रार दाखल करता येणार आहे.

🚨'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे सुनावणी

प्रतिज्ञापत्र; तसेच कागदपत्रांचे पुरावे सादर करून तक्रारदार आयोगासमोर हजर राहू शकतो. ग्राहकाने सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी, अशी मागणी करणारा अर्ज केल्यास त्याला आयोग परवानगी देऊ शकतो.

🚨तक्रार फेटाळण्यामागचे कारण

ग्राहकाच्या तक्रारीवर सुनावणी केल्याखेरीज कोणतीही तक्रार आयोगाला फेटाळता येणार नाही. आयोगाला एखाद्या तक्रारीवर सुनावणी घ्यायची, की संबंधित तक्रार फेटाळायची, याचा निर्णय २१ दिवसांत घ्यावा लागेल. तसा निर्णय झाला नाही, तर तक्रार दाखल करून घेतली, असे समजले जाणार आहे.

▶️ फक्त Exam oriented Quality Information साठी

Join करा, बिनधास्त Copy-Paste करा आणि तुमच्या मित्रांना Share करा☺️..👇👇👇

t.me/thempscupdate
#HRD: महत्वाचे बदल..👆
Consumer Protection Act 1986 Vs 2020

t.me/thempscupdate
Forwarded from Deleted Account
ओले मूळ भेदी| खडकाचे अंग|
अभ्यासाशी सांग | कार्यसिद्धी||

स्पर्धा परीक्षा यशस्वी व्हायचे आहे व तेही पहिल्या प्रयत्नातच, याविषयी सांगत आहेत प्रवीण चव्हाण सर. MPSC परीक्षेमध्ये आपण पहिल्या प्रयत्नातच यशस्वी व्हावे हाच मार्गी चा प्रयत्न आहे; आणि यासाठीच मार्गी आहे.
Forwarded from History by M.M.
स्थापत्य आणि कला...👆

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
गांधार शैली..👆
Forwarded from History by M.M.
आग्नेय आशिया & कंबोडिया...👆
Forwarded from History by M.M.
Buddhist Councils...👆

प्राचीन इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
हीनयान Vs महायान..👆👇

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Jainism Vs Buddhism..👆

http://t.me/historymm