The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी दैन्य दुःख आम्हा न येती जवळी| दहन हे होळी होती दोष || 1|| सर्वमुख येती माने लोटांगणी | कोणाच्याही आणे दृष्टीपुढे || धृ || आमची आवडे संत समासमागम | आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच ||2|| आमचे मागणे मागो तयाची सेवा…»
#imp

मित्रांनो, पूर्व परीक्षेला जेमतेम आजपासून 15 दिवस राहिलेत...

# आपला महत्वाचा वेळ न्युजपेपर वाचण्यात वाया घालवू नका...

# Revision सोबतच आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा अथवा प्रिंट घ्या...आणि सगळे प्रश्न आणि त्यांचा पॅटर्न नीट समजून घ्या...

# टेलिग्राम वर पण जास्त वेळ न राहता फक्त फावल्या वेळात आपण सगळ्या विषयांच्या महत्वाच्या पोस्ट्स already अपलोड केल्या आहेत..त्या
सगळ्या जुन्या पोस्ट्स एकदा पाहून घ्या...पण दिवसातील फक्त 1 तास या गोष्टीसाठी दयावा...

# जोरदार अभ्यास करा आणि मुख्य परीक्षेला पात्र व्हा...🙏🙏🙏

@thempscupdate
#GS #Prelims

मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..


उदा.

🚨 भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + दीपस्तंभ (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

🚨राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व M. #Laxmikanth पुस्तकातील Charts आणि Boxes-

🚨सामान्य विज्ञान (Gen. Science ) - 5 वी ते 10 क्रमिक व Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

🚨चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

🚨अर्थशास्त्र - देसले (Limited) , कोळंबे या दोन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes

🚨 इतिहास - 11 वी इतिहास, Lucent GK - प्राचीन व मध्ययुगीन साठी आणि आधुनिक भारत नोट्स (महत्वाचे Points) @thempscupdate@historymm वर अगोदरच Share केले आहे.

3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..

4.
#GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे.

5. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय, बुद्धिमत्ता चाचणी आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


साभार, 🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#GS #Prelims मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे…»
#Recruitment : 20 एप्रिलपासून मेगाभरती.👆

Online Exam की offline याविषयी पुन्हा संभ्रम कायम..!

पण महा-आयटी कडून खाजगी एजन्सी ची 15 एप्रिल पर्यंत नियुक्ती करण्यात येत असल्याने पुन्हा Online Exam होण्याची शक्यता..!

t.me/thempscupdate
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती
-------------------
‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.

मार्च १२, इ.स.१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.

१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना त्यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

● यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.

यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.

यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला.
- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले.
- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
- 1948 स

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes



3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..



4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

t.me/thempscupdate
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव


मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती. शिवसेनेसाठी तो मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येईल.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कोरोना वायरस या बाबत घ्यावयाची काळजी..👆

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Fiscal Deficit % of GDP ( राजकोषीय तूट )...👆

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारतीय अर्थव्यवस्था एका दृष्टीक्षेपात...👆👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco :
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ #Debt & Deficit 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
अलौकिक बुद्धिमत्ता आणि विलक्षण कल्पनाशक्ती लाभलेले शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांची आज जयंती!
-------------
सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे जनक असलेल्या अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ३०० वैज्ञानिक शोधनिबंध, १५० गैरवैज्ञानिक शोधनिबंध लिहिले. अणुबॉम्बची विनाशकारी निर्मिती थांबावी यासाठी ते अत्यंत आग्रही होते. ”ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणजे अनुभव” असे सांगणाऱ्या या महान वैज्ञानिकाला अभिवादन!

आइनस्टाईन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि ‘त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी’ इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन ‘सन्मानित’ केले गेले. आइनस्टाईन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले. ‘आइनस्टाईन’ या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइनस्टाईन यांनी ‘अ‍ल्बर्ट आइनस्टाईन’ ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइनस्टाईन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइनस्टाईन याने विचार केला की, न्युटनी यांत्रिकी ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धान्त मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.

एकदा आइनस्टाईन यांना त्यांच्या वडलांनी एक होकायंत्र दिले; आइनस्टाईन यांना जाणवले की ‘रिक्त अवकाश’ आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ते जसजसे मोठे होत गेले तसतसे, आइनस्टाईन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती आणि यांत्रिक उपकरणे बनवली व आपली गणितातले कसब दाखवले. जेव्हा आइनस्टाईन दहा वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमड (नंतर मॅक्स टॅल्मी) या पोलंडमधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख त्यांच्या कुटुंबाशी करून दिली. पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या अल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे. या पुस्तकात इमॅन्युएल कँन्ट्‌स यांचे सुयोग्य तर्कसंगतीचे समालोचन हे पुस्तक तसेच युक्लिडचे घटक या पुस्तकांचा समावेश होता. (आइनस्टाईन त्या पुस्तकाला एक पवित्र भूमिती पुस्तक असे म्हणत.) अल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली. त्यांची आई एक उत्कृष्ट पियानोवादक होती. ही कला त्यांनी ॲल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी अल्बर्टशी गणिते सोडवून दाखवण्याची पैज लावली होती. ही गणितं ॲल्बर्टने अतिशय आनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ या कालखंडात दर आठवड्यात होणार्‍या त्यांच्या भेटीत टॅलमड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून ‘बायबलमधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात’ या विचाराकडे अल्बर्टचे लक्ष वेधले. अल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की, ते त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली भूमितीची अवघड गणिते चुटकीसरशी सोडवत असत.

आइनस्टाईन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिर्‍या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइनस्टाईन हा शब्द वापरला जाऊ लागला.

@thempscupdate
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco :
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ #BOP & CAD 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Current Account Balance (चालू खाते )..👆