The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
दिल्लीतील विविध विभागातील प्रदूषण & AQI..👆👇
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, कवी, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावनस्मृतिस विनम्र अभिवादन!

t.me/thempscupdate
#VeerSawarkar
उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा २८ मे १८८३ रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या २० व्या वर्षी लिहिले.

पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. ९ जून १९०६ मधे लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषात भाषांतरे होऊन देशभक्त क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. १९०९ मधे बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हु. अनंत कान्हेरे या क्रांतीकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरीसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.

अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भितीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले. काळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. १९३७ ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९४० मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतीकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १० मे १९५२ ला केली. २२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर अ. भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता. आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. महर्षी व्यास-वाल्मिकींच्या कुळातला अमर साहित्यकार व हाडाची काडे करणारा आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने प्रायोपवेशन करून (अन्नत्याग करून) २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये देहत्याग केला..!

http://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर..👆

सविस्तर माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/historymm
#SSE #eco #videos

👉परीक्षेला 1 महिना शिल्लक असताना #Revision साठी Smart Study आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त Flow-charts / Infographics / Maps / Videos पाहणे फायद्याचे ठरते.

🚨#Videos : सध्या मार्केट मध्ये अनेक Videos चा महापूर आला असल्याने फक्त मान्यताप्राप्त मार्गदर्शक/ Lecturers / 👉विशेषतः अनुभवी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ( ज्यांनी स्वतः MPSC राज्यसेवा/ UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा दिल्या असतील) 👈यांचेच Videos पाहा.

@thempscupdate
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ "#Banking : Monetary Policy" भाग-1👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ.... " नातेसंबंध...Blood Relations"...😊👆
#current शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास एक लाखाचा दंड

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ठाकरे सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य सरकारने सक्तीचं केलं असून या नियमांचं उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसं विधेयकच आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

राज्यांतील सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच पक्षीयांकडून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेत राज्यांतील सर्व शाळेत मराठीच्या अध्यापनाची सक्ती करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकानुसार शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यास शाळांनी टाळाटाळ केल्यास त्या शाळेच्या संस्थाप्रमुखांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी भाषा शाळांमध्ये शिकवणं सर्व शाळांना बंधनकारक ठरणार झालं आहे.
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from MADHUSUDAN N R P
मराठी भाषा दिवस (अन्य नावे: जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन;मराठी भाषा गौरव दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीलापाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.[१]भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो।जय मराठी

हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढ दिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय  मानतो मराठी

मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी. मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा💐💐


मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व , ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन "मराठी राजभाषा दिवस" साजरा केला जातो. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे. या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊया. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल तर आपला मित्र परिवार, कुटूंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर करू शकता. अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते. आपणच आपल्या मुलाबाळाना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया. आपणास मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा