The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
#index Sustainablity : 77th /180
#index Child Flourishing : 131st

by UNICEF, WHO & Lancet

दरडोई कार्बन उत्सर्जन आणि देशातील मुलांच्या सुदृढ आरोग्यावर आधारित 👉शाश्वत निर्देशांकात भारत जगात ७७व्या क्रमांकावर👈 असल्याचे ताज्या अहवालात म्हटले आहे. मुलांसाठी जगण्याच्या सर्वोत्कृष्ट संधीचा विचार करणाऱ्या 👉पोषण निर्देशांकात देशाचा १३१वा क्रमांक👈 आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनिसेफ आणि द लॅन्सेट मेडिकल जर्नलने जगभरातील ४० तज्ज्ञांकडून पाहणी आणि अहवाल तयार केला आहे. तो बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात १८० देशांत पाहणी करण्यात आली. पोषण आहारात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या जगण्याच्या आणि वाढ होण्याच्या संधीची नोंद घेण्यात आली. त्यात मूलभूत आरोग्य, माता व बालकांचे आरोग्य, गरीबीचे प्रश्न आदींचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय शिक्षणातील यश, पोषणातील संधी, हिंसाचारापासून संरक्षण आदी घटकांचाही आधार घेण्यात आला.

शाश्वत निर्देशांक ठरविताना कार्बन उत्सर्जनाचे २०३०चे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. पोषण निर्देशांकात नॉर्वे अव्वल क्रमांकावर असून त्यानंतर दक्षिण कोरिया आणि नेदरलॅँड्सचे नाव आहे. मध्य आफ्रिका, सोमालियाची नावे तळात आहेत.

http://t.me/thempscupdate

#Reports : FATF (Grey List )
फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच कायम ठेवले असून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यात अपयश आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

दहशतवादी कारवायांना होणारे अर्थसाह्य़ रोखण्यात यश आल्याचा दावा करून ‘एफएटीएफ’च्या तावडीतून सुटका करून घेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

‘एफएटीएफ’च्या पॅरिसमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला करडय़ा यादीतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत व्यापक कृती योजना पूर्ण न केल्यास त्याचा पाकिस्तानच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणाऱ्या अर्थसाह्य़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफएटीएफ’ने केलेल्या २७ सूचनांपैकी पाकिस्तानने केवळ काही सूचनांचेच पालन केले आहे, याची ‘एफएटीएफ’ने नोंद घेतली. या दहशतवादी संघटनांचा भारतात हल्ले करण्यात हात आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत आपली व्यापक कृती योजना पूर्ण केली पाहिजे, असे ‘एफएटीएफ’ने म्हटले आहे.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यासारख्या संघटनांना पाकिस्तानकडून नियमित पाठिंबा मिळत असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट करून पकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची विनंती ‘एफएटीएफ’ला केली आहे. पाकिस्तानला मलेशियाने जोरदार पाठिंबा दिला असला तरी भारताने ठोस पुरावे दिल्याने त्याचा काहीच परिणाम होऊ शकलेला नाही.

👉पाकिस्तानला करडय़ा यादीतून पांढऱ्या यादीत प्रवेशासाठी ३९ पैकी १२ मतांची गरज आहे, 👈
तर 👉काळ्या यादीत जाणे टाळण्यासाठी पाकिस्तानला तीन देशांच्या पाठिंब्याची गरज आहे. ‘एफएटीएफ’च्या उपसमितीने पाकिस्तानला करडय़ा यादीत ठेवण्याची शिफारस तीन दिवसांपूर्वी केली होती.

🚨परिणाम काय?

पाकिस्तानला करडय़ा यादीत कायम ठेवण्यात आल्याने त्यांना आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक, एडीबी आणि युरोपीय समुदायाकडून आर्थिक साहाय्य मिळण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. ‘एफएटीएफ’च्या आदेशांचे पालन करण्यात अपयश आल्यास पाकिस्तानला उत्तर कोरिया आणि इराणसह ‘काळ्या यादी’त टाकले जाऊ शकते.

t.me/thempscupdate
#International #org : FATF..👆
Forwarded from The MPSC Update ©
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ "Chain Rule" 👇

https://telegram.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Chain Rule.wmv
112.6 MB
#Imp काल आपण पोस्ट केलेल्या मुद्द्यांवर लोकसत्ताचा आजचा अग्रलेख..👆👇

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#index Sustainablity : 77th /180
#index Child Flourishing : 131st

by UNICEF, WHO & Lancet

दरडोई कार्बन उत्सर्जन आणि देशातील मुलांच्या सुदृढ आरोग्यावर आधारित 👉शाश्वत निर्देशांकात भारत जगात ७७व्या क्रमांकावर👈 असल्याचे ताज्या अहवालात म्हटले आहे. मुलांसाठी जगण्याच्या सर्वोत्कृष्ट संधीचा विचार करणाऱ्या 👉पोषण निर्देशांकात देशाचा १३१वा क्रमांक👈 आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनिसेफ आणि द लॅन्सेट मेडिकल जर्नलने जगभरातील ४० तज्ज्ञांकडून पाहणी आणि अहवाल तयार केला आहे. तो बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात १८० देशांत पाहणी करण्यात आली. पोषण आहारात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या जगण्याच्या आणि वाढ होण्याच्या संधीची नोंद घेण्यात आली. त्यात मूलभूत आरोग्य, माता व बालकांचे आरोग्य, गरीबीचे प्रश्न आदींचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय शिक्षणातील यश, पोषणातील संधी, हिंसाचारापासून संरक्षण आदी घटकांचाही आधार घेण्यात आला.

शाश्वत निर्देशांक ठरविताना कार्बन उत्सर्जनाचे २०३०चे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. पोषण निर्देशांकात नॉर्वे अव्वल क्रमांकावर असून त्यानंतर दक्षिण कोरिया आणि नेदरलॅँड्सचे नाव आहे. मध्य आफ्रिका, सोमालियाची नावे तळात आहेत.

http://t.me/thempscupdate
#Inspirational

जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका.
----------------
एक प्रसिद्ध वक्त्याने हातात ५००/- रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली....
हॉलमध्ये बसलेल्या शेकडो लोकांना त्याने विचारले, “ही ५००/- रुपयाची नोट कोणाला पाहिजे...?”
हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले...
तो म्हणाला, “ मी ही नोट या हॉलमधील कोणा एका व्यक्तीलाच देईन, परंतु पहिले मला हे करुद्या...”
आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, “आता ही नोट कोणाला पाहिजे....?”
तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी हात वर केले....

“अच्छा”, तो म्हणाला, “आता मी हे करू का...?”
“आणि त्याने ती नोट खाली फेकून दिली आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला....
त्याने ती नोट उचलली तर ती नोट खूप चुरगळली होती आणि खूप घाणही झाली होती....
“वक्ता म्हणाला की , अजूनही कोण आहे का, की त्याला ही नोट हवी आहे....?”
“तरीसुद्धा हॉलमधील लोकांनी पुन्हा हात वर केले.....

“मित्रांनो,आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात,
कारण मी या नोटेबरोबर खूप काही केलं तरीदेखील ही नोट तुम्हाला हवी आहे, कारण या नोटेची किंमत अजूनही ५००/- रुपयेच आहे...”

जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो, कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात....
त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही....
परंतु जीवनात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असुद्या किंवा भविष्यात घडूद्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही...
तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका...

एक लक्षात ठेवा... जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका.
Do your best.
प्रयत्न करत रहा...

@thempscupdate