The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🏏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... द वॉल राहुल द्रविड
विशेष लेख - असा खेळाडू पुन्हा होणे नाही
---------------------------------------
छत्तीसगढ सरकार आणि युनिसेफ यांच्या मदतीने गावात उघडय़ावर शौच करण्यावर पूर्णपणे प्रतिबंध आणणाऱ्या आणि प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तीस मुलांचं विशेष कौतुक करण्यासाठी मागच्या वर्षीच्या मे महिन्यात काही क्रिकेटपटू छत्तीसगढमध्ये गेले होते. इमरान ताहिर, जेपी डुमिनी, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि समालोचक इयान बिशप यांच्यासोबत आणखी एक धुरंधर त्यांच्यासोबत होता. दूर गावातील या चिमुरडय़ांना मात्र आपण नेमकं कोणाशी संवाद साधतोय याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती. त्यामुळे संवादादरम्यान एक मुलीने भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीला त्याचं नाव विचारलं आणि तेथे उपस्थित सर्वासोबत तोही मनसोक्तपणे हसू लागला. त्यानंतर दबक्या आवाजात त्याने मुलांना नाव सांगितलं, ‘मी राहुल द्रविड. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार.’

साधेपणा चोरीला गेल्याचे किंवा हरवल्याचे आजकालचे दिवस आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीने साधेपणाने वागण्यात कुणालाच फारसं नवल वाटत नसतं. पण सर्व सुखं ज्यांच्या पायाशी लोळण घेत असतात आणि समाज ज्यांना आदर्श मानतो अशा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा समोर आला तर मात्र त्याची चांगलीच चर्चा होते. बॉलीवूड आणि क्रिकेटवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. अमाप प्रसिद्धी आणि पैसा यामुळे या दोन क्षेत्रांत वावरणारी मंडळी कायम ढगातच असतात. असं असलं तरी त्याला काही अपवाद जरूर आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राहुल द्रविड. भारत सरकारद्वारे दिले जाणारे ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्याला गौरवण्यात आलंय. आपल्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत तंत्रशुद्ध आणि संयमी खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्रविडच्या नावावर कसोटीत तेरा हजारांहून जास्त तर एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजारांहून जास्त धावा जमा आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, उपकर्णधारपद त्याने सांभाळलेलं आहे. पण भारतीय क्रिकेट संघात असतानाही सामन्याची स्थिती, निकाल काहीही असो त्याने आपला संयम केव्हाही सुटू दिला नाही. टीव्हीच्या पडद्यावर जसा साधासरळ तो सर्वाना दिसला तसाच तो आपल्या खासगी आयुष्यातही वागत आलाय. असा हा जंटलमन काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसमवेत विज्ञान प्रदर्शनात रांगेत उभा असलेला पाहायला मिळाला. चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही किंवा आजूबाजूला सुरक्षारक्षकांचा गोतावळा नाही. एखाद्या सामान्य पालकांप्रमाणे तो रांगेत उभा असल्याचा फोटो एका खासगी ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आणि वाऱ्यासारखा पसरला. पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणाच्या किश्शांनी इंटरनेटच्या वॉल भरल्या. अनेकांनी केवळ हात जोडले तर काहींनी खासगी अनुभव, त्यांच्याकडे असलेले फोटो शेअर करत द्रविडच्या साधेपणाला सलाम ठोकला.

वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी दूरवरून आलेल्या आपल्या चाहत्यांना भेटणारा, विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारा, समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना आपलं नाव सांगणारा, बंगळूरु विश्वविद्यालयातर्फे दिली जाणारी मानद डॉक्टरेट प्रांजळपणे नाकारून माझ्या मेहनतीवर ती मिळवीन असं म्हणणारा, अंथरुणाला खिळलेल्या आपल्या चाहत्याला व्यग्र कार्यक्रमामुळे भेटू न शकलेला पण नंतर स्काइपद्वारे संवाद साधणारा, अंध क्रिकेटपटूंकडून मलाच अनेक गोष्टी शिकायला हव्यात अशी कबुली देणारा, पॅराऑलिम्पियन खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या द्रविडचे असे अनेक किस्से यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चिले गेले.

प्रतिमा तयार करणे आणि ती विकून पैसा कमवणे हादेखील आज एक व्यवसाय झाला आहे. आपण जे नाही ते नाटय़मय प्रसंगामधून सतत लोकांसमोर मांडून सहानुभूती मिळविणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. एखाद्या क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आणि तिथून पायउतार झाल्यावरही चर्चेत राहण्याचा अनेकांचा आटापिटा सुरू असतो. पण या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड हे नाव कायमच आदराने घेतलं जात होतं आणि यापुढेही घेतलं जाईल. संयम आणि साधेपणाचं हे मूर्तिमंत उदाहरण कायम असेच सुखद धक्के देत राहो हीच आशा.

(हा मूळ लेख १ डिसेंबर २०१७ रोजी लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता)

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
दिल्ली सलतनत : केंद्रीय प्रशासन..👆

मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
स्वामीजी जन्मतिथी तथा राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐

t.me/thempscupdate
#Current CCS...👆👆
#Current Black Box..👆
2019 : International Periodic Table Year by UNESCO..👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
100 वी घटनादुरुस्ती....भारत-बांगलादेश भूमी सीमा विधेयक....👆👆
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Sports
● खेलो इंडियाचे तिसरे पर्व आजपासून

- पर्व: तिसरे
- स्थळ: गुवाहाटी (आसाम)
- कालावधी: 10 ते 22 जानेवारी 2020
- उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक: आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास
- वयोगट: 17 आणि 21 वर्षांखालील
- सहभाग: 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 6800 पेक्षा जास्त खेळाडू 20 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील.
- महाराष्ट्र: 20 पैकी 19 प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल 751 खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.
- यजमान आसाम: विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून 656 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
- हरियाणानेही यंदा 682 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.

● शानदार उद्घाटन सोहळा
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सासूराजाय येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर रंगणार आहेत.
- या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन आणि ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात प्रावीण्य दाखवलेल्या ‘व्ही अनबिटेबल्स’ या मुंबईस्थित नृत्यपथकाची. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. अदाकारी पाहायला मिळणार आहे.
- आसामच्या संस्कृती आणि परंपरेची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात तब्बल 500 कलाकार सहभागी होणार आहेत.

● वैशिष्टय़े
- 13 दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 451 सुवर्णपदके जिंकण्याची संधी
- तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सायकलिंग, टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जुदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन बॉल.
- यंदा सायकलिंग आणि लॉन बॉल्स या दोन नव्या खेळांचा समावेश
- गुवाहाटीमधील आठ ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार

2018 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      हरियाणा  ३८     २६        ३८     १०२
२      महाराष्ट्र  ३६     ३२         ४३     १११
३      दिल्ली    २५     २९         ४०     ९४

2019 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      महाराष्ट्र    ८५     ६२     ८१     २२८
२      हरियाणा  ६२     ५६     ६०     १७८
३      दिल्ली      ४८     ३७     ५१     १३६
#EnB

वनजमिनीचा व्यापार करण्यासाठी नवी ‘हरित पत योजना’

वन सल्लागार समितीने ‘हरित पत योजना (ग्रीन क्रेडिट स्कीम)’ यास मान्यता दिली, ज्यायोगे वनजमिनीचा एक वस्तू म्हणून व्यापार करता येणार.

सध्याच्या यंत्रणेत जंगलाचे नुकसान होत असल्याने उद्योगांना पडीक जमीन शोधावी लागते आणि वन विभागाला निव्वळ वर्तमान मूल्य देण्याची गरज आहे. तर वेळोवेळी जंगलात वाढ करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही वनविभागाची जबाबदारी आहे.

नव्या योजनेमुळे रोपलागवडीची जबाबदारी व्यवस्थेच्या इतर घटकांकडेही सोपवली जाऊ शकणार, त्यामुळे अधिक प्रभावीपणे जंगलांचा विकास आणि त्याचबरोबर त्यावर विसंबून असलेला व्यापार यांना चालना मिळू शकणार.

ठळक बाबी

🔸योजना संस्था, खासगी कंपन्या आणि ग्रामीण वन समुदाय इत्यादींना पडीक जमीन ओळखणे आणि त्यावर वृक्षारोपण करण्याची परवानगी देते.

🔸वृक्षारोपणाच्या तीन वर्षानंतर, वनविभागाने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केल्यास ती जमीन भरपाई देणारी वन जमीन मानण्यास पात्र ठरणार.

🔸ज्या उद्योगाला वनजमीन हवी असेल ते जबाबदारी घेणार्‍या संस्थेकडे संपर्क साधून त्यांना त्याचा मोबदला देणार आणि पुढे ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित केली जाणार आणि वनजमीन म्हणून नोंद होणार. म्हणजेच ही योजना जंगलांना / वनांना एक वस्तू म्हणून व्यापार करण्यास मंजूरी देते.

‘हरित भारत अभियान’च्या अनुषंगाने ही योजना तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश्य 2020-30 या वर्षापर्यंत 2.523 अब्ज टन कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचे आहे. या योजनेत सध्याचा जंगलाव्यतिरिक्त 30 दशलक्ष हेक्टर जमिनीवर जंगल उभे करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे.
व्हिडीओ केवायसी करणारा भारत जगातील एकमेव देश...👇

मोबाइल व्हिडीओ संवादाद्वारे ‘नो युवर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रिया राबविण्यास बँका व फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमांत बदल केले आहेत.तर आधार व इतर ई-दस्तावेजांआधारे ई-केवायसी व डिजिटल केवायसी राबविण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.

सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेने केवायसीविषयक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे भारत व्हिडीओ केवायसीची परवानगी असलेला जगातील एकमेव देश ठरला आहे.
बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.

बिगर-बँक संस्थांना ई-केवायसीची परवानगी नाही. मात्र, प्रत्यक्ष आधार व क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना केवायसी प्रक्रिया राबविता येईल. आधारद्वारे ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यास कोर्टाने मनाई केल्यानंतर नवीन ग्राहक जोडणे मोबाइल वॉलेट कंपन्यांना कठीण झाले होते.

आरबीआयने म्हटले की, डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो घेणे व आधार असल्याचा वैध अधिकृत पुरावा घेणे. जिथे ऑफलाइन पडताळणी शक्य नाही, तिथे व्हिडीओ केवायसी राबविता येईल. अधिकृत अधिकारी लाइव्ह फोटो घेतील. जेथे फोटो घेतला, त्या स्थानाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेतली जाईल.